Nagpur East Assembly election 2024 : काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर पवार गट संतप्त
Nagpur East Vidhan sabha election 2024 : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे तिकीट देण्याची मागणी केली आहे. शरद पवार गटाने काँग्रेसच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे.
नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याची मागणी केलेली आहे. सलग १५ वर्षांपासून या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत आहे.