

डोंबिवली: शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी विश्वनाथ भोईर यांना दिली आहे. पक्षाकडून एबी फॉर्म मिळताच आमदार भोईर यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन इथली जनता आणि पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावू अशा शब्दांत शिवसेना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भोईर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.