
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधी महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे जवळपास १५० बंडखोरांनी राज्यभरात गोंधळ माजवला आहे. अशा वेळी एक संकल्पना चर्चेत आली आहे - 'सांगली पॅटर्न'. नागपूर, पुण्यातील पर्वती आणि इतर महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये या पॅटर्नची चर्चा होत आहे. पण सांगली पॅटर्न म्हणजे नेमकं काय? लोकसभेत सांगलीत काय घडलं की त्याचा विधानसभेत इतका गाजावाजा होतोय? हे समजून घेऊया.