
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. भाजपने विद्यमान आमदार मदन येरावार यांच्यावर चौथ्यांदा विश्वास दाखवत उमेदवारी दिली, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने बाळासाहेब मंगुळकर यांना संधी दिली. या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात होते, मात्र मुख्य स्पर्धा भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होती.
या स्पर्धेत काँग्रेसचे बाळासाहेब मंगुळकर यांचा ११ हजार ३८१ मतांनी विजय झाला. त्यांना १ लाख १७ हजार मते मिळाली. तर भाजपचे मदन येरावारांचा पराभव झाला. येरावार यांना १०६१२३ मते मिळाली