यवतमाळ : पुसद विधानसभा मतदारसंघ नाईकांचा बालेकिल्ला. या मतदारसंघातील लढत कायमच चर्चेत राहिली आहे. काका-पुतण्या, चुलत बंधू यांच्यात याच मतदारसंघात लढाई झाली. यंदा दोन सख्ख्या भावांनीच एकमेकांविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहेत. यामुळे पुन्हा एकदा पुसद विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.