देशाचं कल्याण हाच जीवनाचा मंत्र - पंतप्रधान मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाच राज्यांतील निकालानंतर बोलताना पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या भाजप कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन करेन असं म्हटलं आहे.

देशाचं कल्याण हाच जीवनाचा मंत्र - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - पाच राज्यातील निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपला मोठा विजय मिळाला. यामध्ये उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड या राज्यात एकहाती सत्ता मिळवली, तर गोव्यात मगोप आणि अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार आहेत. पाच राज्यांमध्ये निवडणुकीतील मोठ्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

जेपी नड्डा म्हणाले की,''३७ वर्षांनी उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा एखाद्या पक्षाला सत्ता मिळाली आहे. उत्तराखंड हे राज्य जेव्हापासून अस्तित्वात आले तेव्हापासून सरकार बदलले. पण मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली. तिथल्या जनतेने पुन्हा एकदा भाजपला निवडून दिलं. मणिपूरमध्ये आमचे सरकार स्थापन होणार आहे. गोव्यात यावेळी हॅटट्रिक करणार आहे. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. ''

''जिथं आपण चार राज्यात बहुमतासह उभा आहे. त्यातच आसामच्या म्युनसिपल बोर्डातही मोठं यश मिळालं. तसंच पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. जनतेनं भाजपला खूप आशीर्वाद दिला आहे. पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.'' असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी आज उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीचा आहे. या निवडणुकीत भाग घेणाऱ्या सर्व मतदारांचे अभिनंदन करतो. त्यांच्या या निर्णय़ासाठी मतदारांचे आभार मानतो. विशेषत: आमच्या माता-भगिनी, तरुणांनी ज्या पद्धतीने भाजपला भरपूर समर्थन दिलं यातून खूप मोठा संदेश मिळाला आहे. पहिल्यांदा मतदान केलेल्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि भाजपचा विजय निश्चित केला.

निवडणुकीवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले. भाजपच्या त्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक ज्यांनी दिवसरात्र न बघता या निवडणुकीत मोठं कष्ट केलं. आमच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचं मन जिंकण्यात यश मिळवलं. तसंच पूर्ण पक्षाचे नेतृत्व केलं आणि कार्यकर्त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या जेपी नड्डा यांचेही अभिनंदन पंतप्रधान मोदींनी केलं.

योगींनी सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली ते महत्त्वाचं आहे. भाजपची निती, भाजपाचे निर्णयांवर विश्वास हा या निवडणुकीच्या निकालातून दिसून येत आहे. भाजप सरकारच्या कामावर जनतेचा विश्वास असल्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचं मोदींनी म्हटलं.

वीज, पाणी, गॅस, टेलिफोन यासह मुलभूत सुविधांवर सामान्य जनतेला सरकारी कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यांना पैसे द्यावे लागत होते. देशात गरीबांच्या नावावर घोषणा अनेक झाल्या, योजनासुद्धा खूप झाल्या. मात्र त्या योजनांचा लाभार्थी होता, त्याला त्याचा लाभ मिळावा, तोसुद्धा कोणत्याही त्रासाशिवाय, यासाठी चांगलं प्रशासन सरकार गरजेचं असतं. ही बाब भाजपला माहिती आहे. मी मुख्यमंत्री राहिलो आहे त्यामुळे मला माहिती आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी काय करावं लागतं हे माहिती असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

दोन दशकाहून अधिक काळ सरकार म्हणून काम केलं आहे. देशाचं कल्याण हाच जीवनाचा मंत्र असून तो काम करण्याची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलं. शंभर टक्के लाभार्थ्यापर्यंत पोहोचू, देशातील माता-भगिनींना नमस्कार करतो की निवडणुकीच्या निकालात त्यांचे मोठे योगदान आहे. आमचं सौभाग्य आहे की भाजपला माता-भगिनींनी इतकं प्रेम दिलं की जिथं जिथं महिला मतदारांनी जास्त मते दिली तिथे भाजपला मोठा विजय मिळाला असल्याचंही मोदी म्हणाले.

मी गुजरातमध्ये असताना काही घटना घडायच्या तेव्हा सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जायची. आजही अशा काही घटना घडतात तेव्हा मोदीजी तुमच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा तुमच्यासारख्या माता भगिनींच्या सुरक्षेचं कवच असताना कसली भीती असे मोदी म्हणाले.

पंजाबच्या भाजप कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करेन. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत ज्या प्रकारे पक्षाचा झेंडा फडकावला आहे तो येत्या काळात पंजाबमध्ये भाजपच्या मजबुतीला, देशाच्या मजबुतीला निश्चित करेल. सीमावर्ती राज्य असल्यानं फुटीरतावादी राजकारणातून दूर ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावून भाजप कार्यकर्ते काम करतील. भाजपचे प्रत्येक कार्यकर्ते त्यांची जबाबदारी पार पाडतील. हा विश्वास मी पंजाबच्या जनतेला देवू इच्छितो.

Web Title: Assembly Election Result 2022 Pm Modi Speech After Win 4 States

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top