गॅस सिलिंडरचा दर नियंत्रित ठेणार; काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSakal
Summary

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.

डेहराडून - काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) राष्ट्रीय सरचिटणीस आणि स्टार प्रचारक प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी (Uttarakhand Assembly Election) पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) जारी केला. यात महिला मतदारांना (Women Voters) आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यात चार लाख रोजगार निर्मिती केली जाईल आणि गॅस सिलिंडरचा दर (Gas Cylinder Rate) हा पाचशेपेक्षा अधिक होणार नाही, असे आश्‍वासन दिले. गॅसवरील पुढील अंशदान सरकारकडून वहन केले जाईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

प्रियांका गांधी यांनी आज डेहराडून येथे एक निवडणूक प्रचारसभा आणि व्हर्च्युअल रॅलीला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपकडून विकासाऐवजी केवळ धर्माचीच गोष्ट केली जात असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. राज्यातील पर्यटनाला चालना दिली जाईल आणि पोलिस विभागातील भरतीत ४० टक्के महिलांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Priyanka Gandhi
निवडणूक प्रचार सभांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

जाहीरनाम्यातील आश्‍वासने

  • राज्यातील पर्यटनाला चालना देणार

  • जिल्ह्यात पर्यटन पोलिस असा वेगळा दल स्थापन करणार

  • सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास

  • कोरोना पीडित कुटुंबाला वार्षिक ४० हजार रुपये मदत देणार

  • चार लाख रोजगारनिर्मिती

  • दोनशे यूनिटपर्यंत मोफत वीज देणार

  • राज्यातील सर्व ज्येष्ठांना निवृत्ती वेतन देणार

  • उत्तराखंडमध्ये पहिली स्पोर्ट्स यूनिव्हर्सिटीची स्थापना केली जाईल.

  • पहिल्याच वर्षी ५७ हजार रिक्त जागा भरणार

उत्तराखंडच्या नागरिकांना रोजगार, आरोग्य, शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, उत्पन्नाची हमी देणे आणि महागाईपासून दिलासा देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. उत्तराखंडचा स्वाभिमान मजबूत करण्यासाठी आणि जनतेला सक्षम करणारे सरकार देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे.

- प्रियांका गांधी, सरचिटणीस, कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com