Manipur Election Results Live : भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल; 29 जागांवर आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manipur Assembly Election Results

Manipur : भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल; 29 जागांवर आघाडी

Manipur Assembly Election Results : मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठीचे निकाल हाती येऊ लागेल आहेत. राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेच्या जवळ जाताना दिसतंय. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 6 व इतर पक्षांच्या उमेदवारांनी 24 जागांवर आघाडी घेतलीय. तर, राज्यात जनता दलानं खातं उघडलं असून तिपईमुख मतदारसंघातून ​​नंगुसनलूर सानाते विजयी झाले आहेत. तसेच भाजपचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हेनगांग मतदारसंघातून विजय मिळवला असून काँग्रेसचे पी शरतचंद्र यांचा जवळपास 18,271 मतांनी पराभव केलाय. त्याचबरोबर किशमथोंग विधानसभा मतदारसंघातून रिपाइंचे उमेदवार महेश्वर थौनॉजम निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदारसंघात 403 मतांनी आघाडी घेतलीय. तर, अपक्ष उमेदवार सपम निशिकांत सिंग यांना त्यांनी पिछाडीवर टाकलंय. या निवडणुकीचे इत्यंभूत लाईव्ह अपडेट्स फक्त 'सकाळ'वर..

भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. आमचे राष्ट्रीय नेते पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आम्ही मणिपूरमध्ये विजयी झालो आहोत, असं सांगत त्यांनी जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार मानलेत.

इंफाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळं नेत्यांसोबत पक्ष कार्यालयासमोर डान्स करुन विजय साजरा केला.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंह यांनी थौबल मतदारसंघात विजय मिळवलाय, तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनीही हेनगांग विधानसभा मतदारसंघातून 18721 मतांनी विजयी मिळवलाय.

मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठीचे निकाल हाती येऊ लागेल आहेत. राज्यात पुन्हा एकदा भाजप (BJP) सत्तेच्या जवळ जाताना दिसतंय. सुरुवातीच्या कलानुसार भाजपनं आतापर्यंत 60 पैकी 28 जागी जिंकल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत.

ECI च्या ताज्या आकडेवारीनुसार, सत्ताधारी भाजप मणिपूर राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी सज्ज झालंय. कारण, आतापर्यंत भाजपनं 12 जागा जिंकल्या असून इतर 12 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हेनगांग मतदारसंघात काँग्रेसच्या पी शरतचंद्र सिंह यांचा 18,271 मतांनी पराभव केलाय.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. यावर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्ही वेळ घेणार असल्याचं सांगितलंय. संपूर्ण निकाल येऊ द्या. आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील, असंही ते म्हणाले.

मणिपूरमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळताना दिसत आहे. सीएम एन बिरेन सिंह हेनगांग मतदारसंघातून 18,271 मतांनी निवडून आले आहेत. दरम्यान, एन बिरेन सिंह यांच्या इंफाळ येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केलीय.

किशमथोंग विधानसभा मतदारसंघातून रिपाइंचे उमेदवार महेश्वर थौनॉजम निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदारसंघात 403 मतांनी आघाडी घेतलीय. तर, अपक्ष उमेदवार सपम निशिकांत सिंग यांना त्यांनी पिछाडीवर टाकलंय.

मणिपूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून 31 जागांवर पक्षानं आघाडी घेतलीय. तर, काँग्रेसचे उमेदवार 7 जागांवर आघाडीवर आहेत.

वाबगई मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. उसम देबेन सिंह विजयी झाले आहेत.

मणिपूरमधील तिपईमुख मतदारसंघातून जनता दल युनायटेडचे ​​नंगुसनलूर सानाते विजयी झाले आहेत.

दुपारी 12 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार, मणिपूरमध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे.

हेरॉक जागेवर भाजपची आघाडी कायम आहे. पक्षाचे उमेदवार टी राधेश्याम सिंह हे काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा आघाडीवर आहेत.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) मणिपूरमध्ये 22 जागांवर आघाडी घेऊन क्लीन स्वीपकडं कूच करत आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हेनगांग जिंकलं असून काँग्रेसचे पी शरतचंद्र यांचा जवळपास 18,000 मतांच्या फरकानं पराभव केलाय.

मणिपूर : आरपीआय आठवले गटाचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं समजतंय.

मणिपुरात भाजपची 30 जागांवर आघाडी, तर काँग्रेस 9, एनपीपी 1, एनपीएफ 4 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर आहे.

मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, तर काँग्रेसची पराभवाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचं चित्र आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी काँग्रेस फक्त 8 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 27 जागांवर पुढं असून त्यांना 6 जागांचा फायदा होताना दिसत आहे.

भाजप सलग दुसऱ्यांदा विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असून मुख्यमंत्री बिरेन सिंह सध्या 15 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

मणिपूरच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओकराम इबोबी सिंह यांना थौबल मतदारसंघातील भाजप उमेदवाराकडून कडवी टक्कर दिली जात आहे. भाजपचे उमेदवार एल. बसंता सिंह त्यांच्यापासून केवळ 800 मतांनी पिछाडीवर आहेत.

भाजप नेते आणि मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या हेंगाग मतदारसंघातून आघाडी कायम ठेवलीय. ते काँग्रेस प्रतिस्पर्ध्यापेक्षा जवळपास 11,000 मतांनी आघाडीवर आहेत.

मणिपूरमध्ये 60 सदस्यीय विधानसभेत भाजप 27, तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 24 जागांवर आघाडीवर आहे.

Manipur Election Results : बहुमतासाठी भाजपला हव्यात फक्त 3 जागा; 28 जागांवर घेतली आघाडी, काँग्रेसला 9 जागा

Manipur Election Results : भाजप 25, काँग्रेस 12, एनपीपी 10, एनपीएफ 5 आणि इतर 8 जागांवर आघाडीवर आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हेनगांग मतदारसंघातून 2,598 मतांनी आघाडीवर आहेत.

Manipur Election Results Live : मणिपुरात भाजपची स्पष्ट बहुमताकडं वाटचाल; 29 जागांवर आघाडी, काँग्रेस 8, तर इतरांना 21 जागा

Manipur Election Results : भाजप 24, काँग्रेस 8 तर इतरांची 21 जागांवर आघाडी (वेळ 9 : 44)

मी परमेश्वराला प्रार्थना केलीय. आगामी पाच वर्षात राज्यात शांतता नांदू दे आणि विकासाची काम होवू देत. मणिपूरमध्ये भाजप पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करेल : बिरेन सिंह

भाजपचे एन बिरेन सिंह तर काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंह थौबल विधानसभा जागेवरुन आघाडीवर आहेत.

Former Cong CM Ibobi Singh

Former Cong CM Ibobi Singh

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आघाडीवर असल्याचं कळतंय.

Manipur Election Results : तासभराच्या प्रतीक्षेनंतर मणिपुरात काँग्रेस 6 तर भाजपनं 22 जागांवर आघाडी घेतलीय. (वेळ 9 : 20)

Manipur Election Results : भाजप 22, काँग्रेस 1 तर इतरांची 6 जागांवर आघाडी (वेळ 9 : 11)

तासभरातील कल : भाजप 18, काँग्रेस 1 तर इतरांची 6 जागांवर आघाडी (वेळ 9 : 03)

तासभराच्या कलांमध्ये भाजप 16, काँग्रेस 1 तर इतरांची 7 जागांवर आघाडी (वेळ 8 : 50)

मणिपुरात भाजपची जोरदार मुसंडी; 11 जागांवर आघाडी, काँग्रेस 1 जागेवर

सुरुवातीचा कल : भाजप 5, काँग्रेस 1, इतरांची 5 जागांवर आघाडी

Manipur Election Results Live : मणिपुरात भाजप 8 तर काँग्रेसने 3 जागांवर आघाडी घेतलीय.

Manipur Assembly Election Results

Manipur Assembly Election Results

Manipur Election Results Live : मणिपुरात प्रथम पोस्टल मतमोजणीस सुरुवात झालीय.

  • मणिपूरमध्ये आठ वाजता मतमोजणी सुरु होणार असून सर्व तयारी झाली आहे.

  • मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी पहिला टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्च 2022 रोजी पार पडले असून, याचा निकाल आज लागणार आहे. सध्या विधानसभेत भाजपचे (BJP) 28, काँग्रेस 15, NPP 4, NPF 4, तृणमूल 1 आणि 1 अपक्ष सदस्य आहेत. विधानसभेच्या 7 जागा अजूनही रिक्त आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात साधारण 78 टक्के तर, दुसऱ्या टप्प्यात 76.04 टक्के मतदान पार पडलं होतं.

  • मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा असून हे 16 जिल्हे असलेले राज्य आहे. सध्या येथे 12 वी विधानसभा अस्तित्वात आहे. सध्या याठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचं सरकार असून एन बिरेन सिंग मुख्यमंत्री आहेत. मणिपूरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक 2017 मध्ये 2 टप्प्यात पार पडली होती, ज्यामध्ये एकूण 86.63% मतदान झालं होतं. या निवडणुकीत काँग्रेसला 28, भाजपला 21, NPF ला 4, NPP ला 4, LJP ला 1, तृणमूलला 1 आणि अपक्षांना 1 जागा मिळाली होती. त्यानंतर इथं भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं, ज्यामध्ये NPF, NPP आणि LJP यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली.

  • मणिपूरमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनं 22 पैकी चार विधानसभा जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. यामध्ये चंदेल, माओ, ताडुबी, तामेंगलाँग या जागांचा समावेश आहे. 2017 पासून मेघालय आणि मणिपूर या दोन्ही ठिकाणी भाजपचा मित्रपक्ष असलेला NPP यावेळी मणिपूरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. 2017 मध्ये भाजपनं 21 जागा मिळवल्या होत्या आणि NPP आणि नागा पीपल्स फ्रंट (NPF) यासह विविध पक्षांसह युती सरकार स्थापन केल्यानंतर प्रथमच राज्यात सत्तेवर आलं होतं.

विधानसभा जागांची यादी (घाटी)

40 विधानसभा मतदारसंघ

खुंद्रकपाम

हिंगांग

खुराई

क्षेत्रीगांव

थोंगजू

केइराओ

एंड्रो

लामलाई

थंगमीबंद

उरीपोक

सगोलबंद

किशमथोंग

सिंगजामेइ

याइस्कुल

वांगखेई

सेकमाई

लमसांग

कोंथौजामी

पटसोइ

लंगथाबली

नौरिया पखंगलक्पास

वांगोई

मयंग इम्फाल

नंबोल

ओइनामो

बिश्नुपूर

मोइरांगो

थांगा

कुम्बिक

लिलोंग

थौबल

वांगखेम

हिरोक

वांगजिंग तेनथा

खंगाबोक

वबगई

काकचिंग

हियांग्लाम

सुगनू

जिरीबाम

20 विधानसभा मतदारसंघ (हिल्स क्षेत्र)

चंदेल

टेंग्नौपाल

फुंग्यार

उखरूल

चिंगाई

सैकुल

करोंग

माओ

तदुबी

कांगपोकपी

सैतु

तामेई

तामेंगलांग

नुंगबा

तिपाईमुख

थानलोन

हेंगलेप

छुरछंदपुर

साइकोट

सिंघाट

Web Title: Manipur Election Result 2022 Live Updates Bjp Congress Ngp Npp N Biren Singh Okram Ibobi Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top