

JPSC OMR Scam Sparks Massive Student Protest in Jharkhand
esakal
झारखंडमध्ये असा काही स्कॅम समोर आलाय... की तो ऐकल्यावर तुमच्या विचार करण्याच्या शक्तीलाही धक्का बसेल!
अहो, फक्त पेपरमध्ये घोटाळा झाला असं नाही... तर काही उमेदवारांनी किती प्रश्न सोडवले, किती बरोबर केले, तरीही त्यांचं सिलेक्शन कसं झालं... हा सगळा खेळच आता समोर येतोय...
झारखंडमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे आधी समजून घ्या...
काही दिवसांपूर्वी JPSC म्हणजेच Jharkhand Public Service Commission ने परीक्षा घेतली. तब्बल ३६,००० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. आता इथून खरी गोष्ट सुरू होते... निकाल लागल्यानंतर काही OMR शीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यात एका उमेदवाराने १०० पैकी फक्त ३८ प्रश्न सोडवले होते.