

natural remedies cough,
Sakal
बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, श्वसन विकार, पोटाचे विकार आणि त्वचेचे विकार होऊ शकतात.
आयुर्वेदानुसार, सर्दी-खोकल्यावर वाफ देणे, हळद-मिठाचे गार्गलिंग आणि शितोफलादी चुर्ण वापरणे फायदेशीर ठरते.
मुलांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आणि बाहेरचे अन्न टाळणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस वातावरणात बदल होतात. सकाळी थंडी. दुपारी थोडा पाऊस.यामुळे याचा शरीरावर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार लहान मुलांची प्रकृती ही कफप्रधान असते. यामुळे कफातील जास्त विकार दिसतात. श्वसनासंबंधित विकार जास्त आढळून येतात. यामुळे सर्दी, खोकला येणे, सारखे नाक वाहणे, नाक बंद होणे. तसेच कान फुटणे,कान दुखणे. नंतर घशासंबंधित विकार म्हणजे घसा दुखणे, अशी सर्व लक्षणे श्वसनासंबंधित पाहायला मिळतात.