

shivaji maharaj
esakal
दसरा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात शस्त्रपूजन, आपट्याची पानं आणि सीमोल्लंघनाची परंपरा. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसऱ्याचं महत्त्व नेमकं काय होतं? हा दिवस केवळ धार्मिक विधींसाठी होता, की स्वराज्याच्या लष्करी मोहिमांशीही त्याचा जवळचा संबंध होता?
इतिहासातील काही महत्त्वाच्या नोंदी या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला मदत करतात. सभासद बखरीत दसऱ्यानंतर सैन्य मोहिमेवर निघत असल्याचा उल्लेख आढळतो. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील एका ग्रंथात विजयादशमीच्या सोहळ्याचं वर्णन आहे. तर साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या रोजनिशीत १८३३ साली साजरा झालेल्या दसऱ्याचे तपशीलही नोंदवलेले आहेत.
मग शिवरायांच्या काळात दसरा कसा साजरा होत असे? विजयादशमी आणि मराठ्यांच्या लष्करी मोहिमांचा नेमका संबंध काय होता? आणि ऐतिहासिक दस्तऐवजांतून दसऱ्याच्या परंपरेविषयी कोणती महत्त्वाची माहिती समोर येते?
आज आपण याच प्रश्नांची उत्तरं ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे जाणून घेणार आहोत. कारण हा केवळ एका सणाचा इतिहास नाही, तर मराठा साम्राज्याच्या परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि लष्करी जीवन समजून घेण्याचा एक महत्त्वाचा दुवा आहे....