

shivaji maharaj navy upto hormuz
esakal
अमेरिका–इस्रायल विरुद्ध इराण या तणावपूर्ण युद्धपरिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमागील मुख्य कारण म्हणजे इराणच्या नियंत्रणाखाली असलेला होर्मुज जलमार्ग. जगातील मोठ्या प्रमाणावर तेलवाहतूक याच मार्गाने होत असल्याने येथे निर्माण झालेल्या अडथळ्यांचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. सध्या या जलमार्गात अनेक व्यापारी जहाजे अडकून पडली असून त्यामध्ये भारतातील जहाजांचाही समावेश आहे.