

WhatsApp New Year APK scam malicious greeting malware bank fraud alert 2026
esakal
नवीन वर्षाच्या निमित्ताने WhatsApp वर शुभेच्छांचा पूर येतो. मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या नंबरवरून Happy New Year 2026 असा मेसेज येतो आणि त्यात एक लिंक किंवा फाइल जोडलेली असते. "तुमच्यासाठी आलेल्या स्पेशल शुभेच्छा पाहण्यासाठी हे डाउनलोड करा" असे सांगितले जाते. पण इथच अलर्ट व्हा.. कारण हे एक मोठे जाळे आहे. असे मेसेज उघडले की तुमचे बँक खाते रिकामे होण्याचा धोका आहे. सध्या हा फसवणुकीचा प्रकार खूप वाढला आहे आणि पोलिसांनीही याबाबत इशारा दिला आहे.