
मी ३८ वर्षांची आहे. गेले २-३ महिने मला महिन्यातून ८-१० दिवस रक्तस्राव होतो आहे. हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्या की तात्पुरते बरे वाटते.
प्रश्र्न १ - मी ३८ वर्षांची आहे. गेले २-३ महिने मला महिन्यातून ८-१० दिवस रक्तस्राव होतो आहे. हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्या की तात्पुरते बरे वाटते. मागच्या वर्षीही असाच त्रास झाला होता. त्रास थांबला नाही तर गर्भाशय काढावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मला शस्त्रक्रिया करून घेण्याची खूप भीती वाटते. आपण काही उपाय सुचवावा....
- सुनीता खरे, नगर
उत्तर - शरीरामध्ये हॉर्मोन्सचे असंतुलन झाले की अशा प्रकारचा त्रास होऊ लागतो. हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्याने तेवढ्यापुरते बरे वाटले तरी त्रास मुळातून बरा होत नाही, त्यामुळे वारंवार अशाच प्रकारचा त्रास होतो. शरीरातील पित्तदोषाचे संतुलन करणे आवश्यक आहे. पाळीच्या चौथ्या दिवसापासून आठवडाभर किंवा रक्तस्राव थांबेपर्यंत मेंदीची ताजी पाने वाटून सुपारीच्या आकाराची गोळी करून, त्यात थोडे तूप घालून उडदाच्या खिरीबरोबर खावी. तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन पुष्यानुग चूर्ण मधात मिसळून घेतल्यास फायदा होऊ शकेल. तुरटीची लाही घरी बनवून मधात मिसळून घेण्याचा उपयोग होऊ शकतो. संतुनलचे फेमिफिट सिरप घेण्याचा फायदा होऊ शकतो. रक्तस्राव थांबलेल्या दिवसांमध्ये फेमिसॅन तेलासारख्या सिद्ध तेलाचा किंवा आयुर्वेदिक तुपाचा योनीभागी पिचू ठेवण्याचा उपयोग होऊ शकेल. होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन हॉर्मोन्सचे संतुलन करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून गर्भाशयासारखा महत्त्वाचा अवयव काढून टाकण्याची वेळ येणार नाही.
प्रश्र्न २ - मी ५६ वर्षांची गृहिणी आहे. गेली १५ वर्षे मला मधुमेहाचा त्रास आहे. गेली सहा वर्षे रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेऊन मी कंटाळले आहे. माझ्या आई- वडिलांनाही मधुमेहाचा त्रास होता, त्यांना पुढे पॅरालिसिसपर्यंत त्रास झालेले आहेत. मला या सगळ्याचा खूप मानसिक त्रास होतो. मी डाएट सांभाळण्याचा खूप प्रयत्न करते, पण डाएट पाळता येत नाही. माझी या आजारापासून सुटका कशी होऊ शकेल?...
- सौ. अय्यर, पुणे
उत्तर - घराण्यामध्ये मधुमेहाचा इतिहास आहे, तसेच तुम्हाला गेली अनेक वर्षे मला मधुमेहाचा त्रास आहे व इन्सुलिनही सुरू झालेले आहे, या सगळ्यांचा विचार करता आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. नियंत्रित व योग्य आहार, नियमित व्यायाम याला पर्याय नाही. सकाळी लवकर उठून चालायला जाणे, पोहणे, योगासने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आहार सुपाच्य व मधुमेहाच्या अनुषंगानेच घ्यावा. जंक फूड, तळलेले पदार्थ, अति तिखट-आंबट पदार्थ टाळणे योग्य. संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेतल्यास चयापचय क्रियेशी निगडित त्रास कमी होण्यास मदत मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो व थोडे नियम पाळावे लागतात; परंतु याचा अनेकांना चांगला अनुभव आलेला आहे. रोजच्या दिनक्रियेत पादाभ्यंगसारखा सोपा उपाय घरच्या घरी नक्की करावा, ज्यामुळे अशा प्रकारचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.