स्त्रीसंतुलन!

दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीप्रतिष्ठा यासारखे विषय ऐरणीवर येत असले तरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही साक्षात ‘शक्ती’स्वरूप मानलेली आहे, पूजनीय मानलेली आहे.
Woman
WomanSakal
Summary

दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीप्रतिष्ठा यासारखे विषय ऐरणीवर येत असले तरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही साक्षात ‘शक्ती’स्वरूप मानलेली आहे, पूजनीय मानलेली आहे.

दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीप्रतिष्ठा यासारखे विषय ऐरणीवर येत असले तरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही साक्षात ‘शक्ती’स्वरूप मानलेली आहे, पूजनीय मानलेली आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्र एताः तु न पूज्यन्ते सर्वाः तत्र अफलाः क्रियाः॥’ जेथे स्त्रियांना योग्य मानसन्मान देऊन पूजनीय समजले जाते तेथे देवतांचा म्हणजे शक्तींचा वास असतो. याउलट जेथे स्त्रीला हीन लेखून तिच्यावर अत्याचार केला जातो तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात.

स्त्रीला हे परमोच्च स्थान निसर्गानेच दिलेले आहे, कारण सृजनाची शक्ती निसर्गाने स्त्रीलाच दिलेली आहे, मात्र हे सर्जन व्यवस्थित होण्याकरता स्त्रीची मानसिकता, स्त्रीचे शरीर, तिची हॉर्मोनल व्यवस्था याचेही निसर्गाने खूप वेगळ्या पद्धतीने नियोजन केलेले आहे. स्त्रीची पूजा करणे म्हणजेच निसर्गाने स्त्रीला दिलेल्या अधिकाराचा सन्मान राखणे, तिच्या स्त्रीत्वाची काळजी घेणे.

संपूर्ण विश्र्वात माया व परब्रह्म ही दोन अस्तित्वे कायम असतात. युगामागून युगे जातात तसेच वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतात, यालाच जगरहाटी म्हटले जाते. मात्र यात माया आणि परब्रह्माचे अस्तित्व कायमचे गृहीत धरलेले आहे. जड व शक्ती यांच्या मिलनातून अनुभवता येते ती माया. शक्तीमुळे जडाचे सातत्याने रूपांतर होत असते आणि त्यातून निर्माण होणारे जगही सातत्याने बदलत असते. म्हणून जगाला माया म्हणतात पण याचा अर्थ जगाला अस्तित्वच नसते असे नाही. स्त्रीजवळ वस्तुमान आहे व तिच्याजवळ शक्तीही आहे. त्यामुळे स्त्री जगात उत्पत्ती करू शकते व त्यामुळेच जग तयार होते. स्त्रीच स्त्रीला जन्म देते व स्त्रीच पुरुषालाही जन्म देते.

स्त्री ही आदिशक्ती समजली जाते. जगरहाटी चालू राहण्याच्या दृष्टीने जे जे आवश्‍यक आहे ते आदिशक्तीमुळेच उत्पन्न झालेले आहे. परब्रह्म ही त्यामागची संकल्पना आहे, परब्रह्म हे बीज आहे. पण त्या बीजाचा विकास करण्यासाठी आदिशक्ती लागतेच. यादृष्टीने भावी पिढी निरोगी व संपन्न होण्यासाठी स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन चांगले असणे आवश्यक असते. स्त्रीप्रतिष्ठा म्हणजे केवळ समानाधिकार किंवा नोकरीमध्ये, राजकारणामध्ये विशेष आरक्षण असा अर्थ घेणे योग्य नाही, तर स्त्रीप्रतिष्ठा म्हणजे समाजाची स्त्रीकडे आदराने पाहण्याची वृत्ती, स्त्री स्वावलंबी होण्याची मुभा, स्त्रीमधील स्त्रीत्व, स्त्रीमधील संवेदनशीलता जपण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी व स्वतः स्त्रीने केलेले प्रयत्न !

कित्येकदा स्त्री स्वतःच स्वतःच्या आरोग्याप्रती उदासीन असलेली दिसते. घरातील सर्वांना सुखी ठेवण्याचा आटापिटा करताना स्त्री स्वतः मात्र शिळेपाके खाऊन वा प्रसंगी उपाशी राहून स्वतःवर अन्याय करत असते, पण घरातील इतरांना सुखी करण्यातील आनंद तिला अधिक मोठा वाटतो. इतरांना काही देण्यात आनंद असतो हे तर खरेच पण त्याच वेळी असे करत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आरोग्याकडे काणाडोळा करून सोयीला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेतून मासिक पाळी लांबविण्यासाठी किंवा संततीनियमनासाठी गोळ्या घेतल्या जातात. पण त्यामुळे नैसर्गिक हॉर्मोन्स असंतुलित होऊन कंबरदुखी, लठ्ठपणा वगैरे समस्या उद्भवू शकतात.

बाळंतपण व्यवस्थित होऊनही नंतरचे तीन महिने बाळंतिणीची काळजी न घेतल्यामुळे, सिझेरियन वगैरे झाले असताना पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे, गर्भारपणात काही विशिष्ट औषधे घ्यावी लागली असल्यास किंवा बाळंतपणानंतर आवश्यक असणारी योगासने, व्यायाम वगैरे टाळल्याने स्त्रीशरीरात असंतुलन होण्यास वा शरीर बेडौल होण्यास कारणीभूत होऊ शकतात.

स्त्रीला बऱ्याच वेळा एकाकीपणाचा त्रास होऊ शकतो, हॉर्मोनल सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पूर्वीच्या काळचे हळदी-कुंकू वगैरे प्रसंग स्त्रीचा एकाकीपणा घालविण्यास हातभार लावत असत. सुरूवातीस घरात कंटाळा वाटणे अशी सुरूवात होऊन नंतर डीप्रेशन पर्यंत मजल जाते, त्यासाठी घरात उत्सवाचे वातावरण असणे आवश्यकता असते. केस कापणे, शरीरालगत बसणारे घट्ट कपडे घालणे वगैरे नव-नव्या फॅशन्स करण्याने आरेग्यावर परिणाम होऊ शकतो. सतत जीन्ससारखे तंग कपडे वापरण्यामुळे मोकळी हवा न मिळाल्यामुळे उष्णतेमुळे तिच्या मूत्रवहसंस्था वा जननेंद्रियांना पुढे त्रास होऊ शकतो. कामावर जाणाऱ्या स्त्रिया बहुतेक वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत घट्ट कपड्यातच वावरतात, पण मोकळे व सैल कपडे घालणे आवश्यक असते. स्त्रीआरोग्यामध्ये गर्भाशयाच्या आरोग्याचे मोठे योगदान असते.

मासिक पाळीच्या नैसर्गिकतेबद्दल बऱ्याच स्त्रियांमध्ये अज्ञान असल्यामुळे, त्याबद्दल व्यवस्थित माहिती करून न घेतल्यामुळे प्रत्येक महिन्याला मासिक धर्म येतो आहे म्हणजे सर्व व्यवस्थित चालले आहे असे समजून स्त्री संतुष्ट असते. मानसिकतेमुळे, मनावर पडणाऱ्या ताणामुळे मासिक धर्मात बिघाड होत असतात.

स्त्रीचे जननेंद्रिय शरीराच्या आत असल्यामुळे त्याठिकाणी ओलावा राहुन इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते व या सर्वांचा परिपाक स्त्रीच्या मासिक धर्मात दोष उत्पन्न होण्यात होतो. ओटीपोटात दुखणे, कमी-जास्ती अंगावर जाणे अशा तऱ्हेचे त्रास दुर्लक्षिले गेल्याने, स्त्रीला गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते. तसेच अंडाशयावर सिस्ट होणे, गर्भाशयात गाठी होणे हेही त्रास होऊ शकतात. क्वचित प्रसंगी स्त्रीच्या गर्भाशयात गाठ झाली असता, संपूर्ण गर्भाशय काढून टाकल्यामुळे उरलेल्या आयुष्यात होणारे त्रास स्त्रीच्या आरोग्याला बाधक ठरू शकतात. मात्र आयुर्वेदाच्या नजरेतून या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवले, वेळेवर योग्य उपचार घेतले तर अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागत नाही.

स्त्रिया संवेदनशील, भावनाशील असल्यामुळे त्यांच्या मनाचा, हॉर्मोन्सचा समतोल साधण्यासाठी संगीत खूप कामाला येते. यादृष्टीने कोणते संगीत स्त्रीने ऐकावे, जेणेकरून तिचा मासिकधर्म, शरीरधारणा, तिच्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन होईल याचे मार्गदर्शन आपल्या शास्त्रात केलेले सापडते. असे ‘स्त्रीसंतुलन संगीत’ स्त्रीने नियमाने ऐकणे आवश्यक असते. घरात मुले असल्यास त्यांच्या निमित्ताने घरात काही समारंभ होत राहतात. पण एखाद्या घरात मूल-बाळ नसल्यास घरात अशा प्रसंगाची योजना करून मानसिक ताण कमी करून आनंदी वातावरण ठेवता येऊ शकते. मुलांना ज्ञान देऊन संस्यार करणारी सरस्वती, घरातील अनुशासन सांभाळणारी दुर्गा व सर्वांचे पोषण करणारी लक्ष्मी अशा स्त्रीचे आरोग्य संतुलन राहणे यातच सर्वांचे कल्याण असते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com