तेल खावे तरी कुठले?

तेल खावे तरी कुठले?

शरीरातील पेशींना चरबीयुक्‍त आलेला कण खूप आवडीचा असतो आणि चरबीयुक्‍त अन्नाचा पेशी लगेच स्वीकार करतात. त्यामुळे आहारात तेल हवेच. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे म्हणतात, मात्र माणसाच्या सुखासाठी आवश्‍यक असणारे तेल शोधण्याचा प्रयत्न मात्र कोणी करत नाही. करडईचे तेल, शेंगदाण्याचे तेल, खोबऱ्याचे तेल, ऑलिव्हचे तेल, बदामाचे तेल, मोहरीचे तेल, जवसाचे तेल, राइस ब्रान ऑइल अशी अनेक प्रकारची तेले काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण खाण्यासाठी सर्वांत उत्तम तेल कोठले? शरीराला कुठलाही त्रास न करता, कुठलाही थोका न करता शरीराचे श्रेयस लक्षात घेऊन तुपातल्या स्वयंपाकाचीच प्रशस्ती केलेली आहे.

अभ्यंगं आचरेन्नित्यं स जराश्रमवातहा । 
दृष्टिप्रसादपुष्ट्यायुः स्वप्नसुत्वक्‍त्वदार्ढ्यकृत्‌ ।।

हे वचन उद्‌धृत केले की, प्रत्येक वेळी हुरूप येतो. वार्धक्‍यात अनुभव वाढलेला असतो या दृष्टीने वार्धक्‍य अनुभवापुरते चांगले आहे. परंतु शारीरिक ताकदीच्या दृष्टीने किंवा रोगप्रतिकारकशक्‍तीच्या दृष्टीने, स्वतःची कामे स्वतः करता येत नाहीत या दृष्टीने चांगले नाही. लहानपणी-तारुण्यात केलेल्या सर्व क्रिया संपूर्ण जीवनभर करता आल्या तर वार्धक्‍य पुढे ढकलले आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु त्यासाठी अभ्यंग तेलासारख्या गोष्टींची मदत घ्यावी लागते. काही लोक अभ्यंग मसाज आठवड्यातून एकदा करत असतील, काही लोक आठवड्यातून दोनदा करत असतील, तर काही तीनदा करत असतील. पण सर्वजण खाण्यासाठी तेल सकाळ-दुपार-संध्याकाळ वापरतात. 

मूळ मुद्दा तेल खाण्याच्या बाबतीतील आहे. एकूणच अनेकांनी समाजाचे तेल काढायचे ठरविल्यापासून प्रत्येक उद्योगसमूह सर्व वस्तूंचे तेल काढायचा प्रयत्न करतो. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे म्हणतात, मात्र माणसाच्या सुखासाठी आवश्‍यक असणारे तेल शोधण्याचा प्रयत्न मात्र कोणी करत नाही. करडईचे तेल, शेंगदाण्याचे तेल, खोबऱ्याचे तेल, ऑलिव्हचे तेल, बदामाचे तेल, मोहरीचे तेल, जवसाचे तेल, राइस ब्रान ऑइल अशी अनेक प्रकारची तेले काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. वेलची, लवंग, केशर वगैरे तेलासाठीच प्रसिद्ध असलेल्या सुगंधी पदार्थातील तेल काढून घेतले तरी उरलेला चोथा विकून दुप्पट फायदा मिळविता येतो. तेल काढून घेतल्यावर वेलची अखंड दिसावी, केशर चुरगळलेले दिसू नये, लवंग आहे तसा दिसावा यासाठी संशोधन केले गेले. जास्त दाबाच्या हवेचा वापर करून, वेगळी यंत्रसामग्री बनवून मूळ पदार्थाच्या आकाराला धोका न पोहोचू देता त्यातील तेल काढून घेण्याचे तंत्र शोधून काढण्यात आले. त्यामुळे आपल्याला स्वस्तात माल मिळू लागला असे वाटले तरी त्या मालाची उपयोगिता मात्र कमी झालेली होती. गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या औषध कंपन्यांना मात्र याचा फटका बसला. विकत घेतलेली वस्तू प्रयोगशाळेत पाठवून त्यात तेलाचे प्रमाण किती आहे हे शोधण्याची गरज वाटू लागली. आयुर्वेदाच्या परिभाषेत रस, वीर्य, गुण, विपाक पाहायचा असतो व त्याचे काही निकष ठरविलेले आहे. 

खाण्यासाठी सर्वांत उत्तम तेल कोठले? शरीराला कुठलाही त्रास न करता, कुठलाही धोका न करता शरीराचे श्रेयस लक्षात घेऊन तुपातल्या स्वयंपाकाचीच प्रशस्ती केलेली आहे. तेव्हा लोणी, तूप वापरूनच सहसा स्वयंपाक व्हावा. पण आज त्यातही अडचण उत्पन्न झालेली दिसते. कारण आज तूप म्हणून जो पदार्थ मिळतो, अगदी वनस्पतीज तूप नसले - ते ज्या प्रक्रियेने करायला हवे त्या प्रक्रियेने न केल्यामुळे ते तूप नसतेच. हा पदार्थ म्हणजे दुधातील काढलेल्या चरबीचे रूपांतर केलेला पदार्थ असतो. असे असताना स्वयंपाक करताना काय वापरणार? शिवाय प्रत्येकाला तुपात स्वयंपाक करणे चवीला रुचेलच आणि पैशाने परवडेल असे नाही. तरी पथ्य सांभाळायचे असेल त्या वेळी, आजारी व्यक्‍तींना साजूक तुपात केलेले पदार्थ देणे श्रेयस्कर ठरते. तुपाच्या खालोखाल कमी त्रास देणारे तेल हे खोबरेल तेल. परंतु खोबरेल तेलाची टिकण्याची क्षमता कमी असते, त्याला लवकर खवट वास येतो. त्यामुळे त्याची उपलब्धता हव्या त्या प्रमाणात होऊ शकत नाही. सर्वांत उत्तम तेल तिळाचे असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. तेव्हा अभ्यंगासाठी किंवा स्वयंपाकासाठी तेल वापरायचे असले तर तिळाचे तेल वापरावे. तेव्हा खाण्याचे पदार्थ बनवितानाही तिळाचे तेल वरच्या दर्जाचे ठरावे. परंतु तीळ उष्ण असतात, ते उष्ण प्रदेशात सेवनात आले असता बऱ्याच वेळा पित्तप्रकोप होतो, पित्त वाढते, शरीरावर पुटकुळ्या उठतात. तिळाचे सेवन केल्यावर पचन नीट झाले नाही तर मेदवृद्धी होते. अन्नपचन झाल्यावर तिळाच्या तेलापासून तयार झालेले पित्त अडचणीचे ठरते. म्हणून खाण्याचे पदार्थ बनविताना तिळाचे तेल सांभाळून वापरावे. तिळाच्या तेलात तळलेल्या गोष्टी अधिक प्रमाणात खाऊ नयेत.

अर्धवट तळून ठेवलेले पदार्थ पुन्हा तळून खाऊ नयेत. तसेच पुन्हा पुन्हा तापवलेले तेल वा तूप वापरू नये. म्हणजे तळण झाल्यावर उरलेले तेल वा तूप पुन्हा वापरू नये. तेल वा तूप पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील चांगले गुण संपुष्टात येतात. तिळाचे तेल उष्ण असल्यामुळे उष्ण हवामानाच्या प्रदेशात तिळाचे तेल खाता येत नाही. तेल गरम केल्यावर काही तरी जळल्यासाखा घाणेरडा वास येत असेल, केस व मांस जळल्यासारखा वास येत असेल किंवा तेल तापवले असता काळपट धूर येत असेल, तेलाला चिकटपणा आलेला असेल तर ते तेल खाण्यासाठी उपयोगाचे नसते. 

तेलाबद्दल असे काही मुद्दे कळल्यावर तेलच खाऊ नये असा अनेकांचा ग्रह होतो व त्यांचा ओव्हनमध्ये भाजलेले पदार्थ खाण्याकडे कल वाढतो. पण शेवटी पदार्थाला स्निग्धता आणण्यासाठी तेला-तुपाची गरज असतेच. शरीरातील पेशींना चरबीयुक्‍त आलेला कण खूप आवडीचा असतो आणि चरबीयुक्‍त अन्नाचा पेशी लगेच स्वीकार करतात. 

कालांतराने खाण्याच्या तेलांमध्ये भुईमुगाच्या तेलाचा समावेश झाला व ते अति लोकप्रिय झाले. भुईमूग हा तिळाच्या खालोखाल पित्तकर आहे. म्हणून खाण्यासाठी तेल वापरताना तिळाच्या तेलाऐवजी भुईमुगाचे तेल वापरणे त्यातल्या त्यात बरे. भुईमुगाच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाची पित्तकारकता कमी कशी करणार?  त्यासाठी आयुर्वेदाने शुद्धीची योजना सांगितली. तेल चांगले गाळून घेणे हा सोपा उपाय. नंतर शुद्धीसाठी मसाल्याचे पदार्थ, जिरे, धणे यांचा वापर करून तेलावर संस्कार करून पित्तदोष दूर करण्याचा प्रयोग सांगितला आहे. असा संस्कार करून असे म्हणता येईल काही वेळा खोबरेल तेल, भुईमुगाचे तेल, तिळाचे तेल, करडईचे तेल या क्रमाने तेल खाण्यासाठी  वापरता येईल. तेल वापरणे उत्तम आहे असे नाही परंतु संस्कार केल्यावर ते वापरण्यास योग्य व्हावे, तसेच तेल नीट गाळलेले असले, त्यातील चिकटपणा कमी केला तर त्याचा दोषही कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com