विशेष : लठ्ठपणा! | Obesity and overweight

लठ्ठपणामुळे केवळ सौंदर्य बिघडते असे नाही तर अन्य आजारांनाही त्यामुळे घर मिळते. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजार आणि अपायांबद्दल आपण मागील लेखात माहिती घेतली होती.
Obesity
ObesitySakal

दररोज एक तास व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहते तसेच हृदयाची कार्यक्षमताही वाढते. योग्य आहार, योग आणि व्यायामामुळे आपण वजनावर नियंत्रण मिळवू शकतो.

लठ्ठपणामुळे केवळ सौंदर्य बिघडते असे नाही तर अन्य आजारांनाही त्यामुळे घर मिळते. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजार आणि अपायांबद्दल आपण मागील लेखात माहिती घेतली होती, या लेखात तो कमी करण्याच्या उपचारांविषयी माहिती घेऊया ! लठ्ठपणावर वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत. लठ्ठपणा देह सौंदऱ्याला बाधा पोहोचवतो. लठ्ठपणा कधी एकटा येत नाही तर येताना तो आपल्याबरोबर १०० व्याधींना घेऊन येतो. प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य शास्त्रानुसार मूल्यमापन करून कोणता उपचार योग्य आहे याविषयी सविस्तर सल्ला घेणे आवश्यक आहे.

लठ्ठपणा आपल्या शरीरापासून दूर रहावा या अनुषंगाने आपण सर्वप्रथम आहाराच्या मुलतत्वांची माहिती घेऊया -

  • दररोज तीन लिटर पाणी प्यावे.

  • आहारामध्ये मैद्याच्या व बेकरीच्या पदार्थांचे सेवन करू नये.

  • जंकफूड, अती तेलकट-तिखट पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करू नयेत.

  • वजन कमी करण्यासाठी शरीराची उपासमार करू नये.

  • धान्य व धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे प्रमाण आहारात कमी असावे.

  • प्रथिने जास्त असलेले पदार्थ आहारामध्ये मुबलक प्रमाणात असावेत.

आहारासंबंधी सूचना

  • शरीरामध्ये जास्तीच्या चरबीचे प्रमाण घटवण्यासाठी आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक असते पण हे बदल करून घेण्याआधी शरीर बदलाची माहिती, शरीरातील ठिसूळपणा व शरीराची कार्यक्षमता हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

  • आहारामध्ये विचित्र बदल करून किंवा अति डाएट करून वजन कमी करणे ही पद्धत योग्य नसून उलट घातकच आहे. त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.

  • आहाराविषयी माहिती घेताना वैद्यकीय सल्ल्यानुसार किंवा आहार तज्ञांकडूनच ती घेणे आवश्यक आहे.

  • आहार हे एक औषध आहे आहे ज्यामुळे आपले शरीर व्यवस्थित चालण्यासाठी उपयोग होतो, पण त्या आहाराचा अतिरेक सुद्धा करु नये.

  • शरीरातील चरबी कमी करणे किंवा वजन घटवणे हे सुंदर दिसण्यापुरते मर्यादित कधीच नसावे तर आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढवणे आणि आजारांचे प्रमाण कमी करणे यासाठी असावे.

वजन कमी करण्यासाठी एका विशिष्ट पातळीपर्यंत डाएट, व्यायाम व योग्य औषधे यांचा उपयोग होऊ शकतो. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्यास शरीराची तसेच हृदयाची कार्यक्षमता वाढते. परंतु वजन कमी करणे आणि नंतर ते वाढू न देणे यासाठी किमान एक तासाचा व्यायाम जरुरी आहे. योग्य आहार, योग आणि व्यायामामुळे आपण वजनावर नियंत्रण मिळवू शकतो.

परंतु हे वजन मर्यादेबाहेर गेल्यास पुढील उपचार पद्धती महत्वाच्या ठरतात..

शस्त्रक्रियात्मक उपचार

ज्यावेळी चयापचय (मेटाबोलीजम) बिघडून एका विशिष्ट पातळीच्या पुढे समस्या दिसून येतात त्यावेळी हा उपाय उत्तम ठरतो. यामध्ये पचन संस्थेच्या रचनेमध्ये काही विशिष्ट बदल घडवून चयापचय सुधारण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. हे उपचार दुर्बिणीद्वारे केले जातात. या उपचारानंतर रुग्णालयात दोन-तीन दिवस राहावे लागते. लठ्ठपणाची गुरुकिल्ली चयापचयच आहे.

बॅरिॲट्रिक सर्जरीचे प्रकार

  • स्लीव्ह गेस्ट्रेकटॉमी

  • गॅस्ट्रिक बायपास

  • गॅस्ट्रिक बंडिंग

  • ड्युओडनल स्विच डायव्हर्जन

यातील ''स्लीव्ह गेस्ट्रेकटॉमी'' या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेची आपण माहिती घेऊया-

ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जाते. यामध्ये जिथून भुकेची भावना निर्माण होते असा पोटाचा भाग कापून काढून टाकला जातो. पण जरी पोटाचा भाग काढून टाकला तरी सुद्धा रुग्णाचे पोषणमूल्य पूर्ण स्वरूपात राखले जाते. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे एका वर्षामध्ये जास्तीच्या वजनापैकी ५० ते ८० टक्के वजन कमी होते. मधुमेह, उच्च रक्तदाब आटोक्यात येऊन तो बरा होऊ शकतो. बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेनंतर अनेक आजार कमी होतात. उदा. या शस्त्रक्रियेनंतर मधुमेह व इन्शुलिन असणाऱ्या ८० % रुग्णांचे इन्सुलिन कायमचे बंद होते.

लठ्ठपणा कमी होण्याचे फायदे

  • लठ्ठपणामुळे होणाऱ्या सगळ्या व्याधी कमी होतात.

  • आधी पासून असणाऱ्या व्याधी वाढत नाहीत.

  • व्याधींसाठी लागणारी औषधे कमी होतात.

  • शारीरिक अवयवांचे आरोग्य व कार्यक्षमता सुधारते.

  • आयुष्य वाढते.

  • हालचालींमध्ये चपळता व उत्साह वाढतो.

  • आत्मविश्वास वाढल्यामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होते.

एका जागतिक अहवालानुसार लठ्ठपणा कमी झाल्यानंतर एका व्यक्तीची ४० ते ६० % आर्थिक बचतही होते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीचे शास्त्रीय उपचार घेतल्याने आपण लठ्ठपणातून कायमचे बाहेर येऊ शकता. संतुलित आहार आणि योग्य व्यायाम करून आपण स्वतःला या लठ्ठपणा पासून दूर ठेवून निरोगी आयुष्य जगू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com