अभ्यंगाची साथ!

अभ्यंगासाठी साधे तेल न वापरता आयुर्वेदाच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेले तेल वापरणेच योग्य ठरते. शास्त्रोक्तरीत्या तयार केलेले तेल त्वचेत शोषले जाते.
Abhyang
AbhyangSakal
Summary

अभ्यंगासाठी साधे तेल न वापरता आयुर्वेदाच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेले तेल वापरणेच योग्य ठरते. शास्त्रोक्तरीत्या तयार केलेले तेल त्वचेत शोषले जाते.

- डॉ. मालविका तांबे

अभ्यंगासाठी साधे तेल न वापरता आयुर्वेदाच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेले तेल वापरणेच योग्य ठरते. शास्त्रोक्तरीत्या तयार केलेले तेल त्वचेत शोषले जाते, पर्यायाने असे तेल सिद्ध करताना वापरलेल्या वनस्पतींचे गुण अभ्यंगामुळे त्वचेमार्फत आत शोषले जातात, त्यामुळे असे तेल शरीरातील प्रत्येक धातू व स्रोतसाला मदतरूप ठरते. अभ्यंग संपूर्ण शरीराला केला जातो किंवा ज्या ठिकाणी काही त्रास आहे, त्या ठिकाणावर केला जातो.

दिनचर्येचे पालन आरोग्यगक्षणासाठी खूप मदत करते असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. दिनचर्येमध्ये अभ्यंगाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. अष्टांगसंग्रहातील एका सूत्रात म्हटलेले आहे, ‘अभ्यंगं आचरेन्नित्यं स जराश्रमवातहा। दृष्टिप्रसादपुष्ट्यायुः स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्यकृत्‌॥’ सर्वांनीच रोज अभ्यंग करणे उत्तम असते. अभ्यंगामुळे जरा (म्हातारपण), श्रम (थकवा) दूर राहतात तसेच वाताचे शमन होण्यास मदत होते, दृष्टी सुधारते, शरीरात ताकद वाढते, आयुष्याची वृद्धी होते, चांगली झोप येते आणि त्वचेचा वर्ण व आरोग्य सुधारते. अभ्यंगामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो, शरीरामध्ये रक्ताभिसरण वाढते, चेतासंस्थेची ताकद वाढते, हाडांचे व सांध्यांचे पोषण व्यवस्थित होते, शरीरसौष्ठव वाढते, मानसिकता सकारात्मक राहायला मदत मिळते, वाताशी संबंधित आजार-त्रास कमी होताना दिसतात. अभ्यंगासाठी साधे तेल न वापरता आयुर्वेदाच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेले तेल वापरणेच योग्य ठरते.

शास्त्रोक्तरीत्या तयार केलेले तेल त्वचेत शोषले जाते, पर्यायाने असे तेल सिद्ध करताना वापरलेल्या वनस्पतींचे गुण अभ्यंगामुळे त्वचेमार्फत आत शोषले जातात, त्यामुळे असे तेल शरीरातल प्रत्येक धातू व स्रोतसाला मदतरूप ठरते. अभ्यंग संपूर्ण शरीराला केला जातो किंवा ज्या ठिकाणी काही त्रास आहे त्या ठिकाणावर केला जातो. उदाहरणार्थ, शतावरी, हरिद्रा, सारिवा सारख्या विविध वातशामक व पोषक वनस्पती वापरून सिद्ध केलेले संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण शरीराला मदतरूप ठरते. यष्टी, निर्गुडी, चित्रक वगैरे अस्थिपोषक व वातशामक वनस्पती वापरून सिद्ध केलेले संतुलन शांती सिद्ध तेल हाडांना पोषक ठरते, तसेच सांधेदुखी कमी करण्यास उपयोगी ठरते. संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल सारिवा, देवदारू, मुस्ता वगैरे नसांना पोषक असणाऱ्या वनस्पती वापरून सिद्ध केलेले असल्यामुळे ते नसांना फायदेकारक ठरते, मणक्याच्या व नसांच्या त्रासांमध्ये मदत करते. तेल जेव्हा शरीराच्या विशिष्ट भागावर लावायचे असेल तेव्हा ते दिवसातील कोणत्याही वेळी लावले तरी चालते. परंतु संपूर्ण शरीराला अभ्यंग सकाळी करणे उत्तम ठरते. संपूर्ण शरीराला अभ्यंग केल्यामुळे शरीराची लवचिकता वाढून व्यायाम करणे सुलभ होते. सौष्ठव वाढविण्याकरता हिवाळ्यात तेल लावून व्यायाम करणे श्रेयस्कर ठरते. अभ्यंगानंतर ४५ ते ६० मिनिटांनी गरम वा कोमट पाण्याने स्नान करणे हितावह ठरते. हिवाळ्यात अभ्यंगानंतर स्वेदन करवून घेता आले तर सोनेपे सुहागा.

अभ्यंग करतेवेळी तेल साधारणपणे शरीराच्या तापमानाचे असावे, अर्थात ३८ ते ४० डिग्री सेंटिग्रेड तापमानाचे असणे उत्तम. वनस्पती घालून सिद्ध केलेल्या तेलांवर अग्निसंस्कार झालेला असतो, त्यामुळे असे तेल पुन्हा अग्नीवर गरम करणे योग्य नसते. जरूरीपुरते तेल वाटीत वा छोट्या भांड्यात घेऊन वाटी व भांडे गरम पाण्यात ठेवून गरम करणे श्रेयस्कर ठरते. सध्याच्या काळात मिळणाऱ्या विशेष वॉर्मर्समध्ये ठेवूनही तेल जरूरीपुरते गरम करता येते. अभ्यंग किती वेळ करावा, असा प्रश्र्न नेहमी विचारला जातो. आपल्याला असलेल्या सवडीनुसार कमीत कमी १० मिनिटे ते एक तास अभ्यंगासाठी देता येतो. अभ्यंगासाठी किती तेल वापरावे याचे उत्तर त्वचेचा कोरडेपणा, प्रकृती (वातप्रकृती असल्यास जास्ती व कफप्रकृती असल्यास कमी तेल पुरते), ज्याला तेल लावायचे आहे त्याचे वय, रोग वगैरें गोष्टींवर अवलंबून असते. रोज संपूर्ण शरीराला अभ्यंग करण शक्य नसल्यास आलटून पालटून शरीराच्या भागांवर अभ्यंग करावा. संगणकावर काम करणाऱ्यांचे मनगट व कोपरा यांवर रोज तेल लावणे हितावह ठरते. चाळिशीनंतर शरीराचे वजन उचलणारे गुडघे, टाचा यांवर रोज वेळ काढून थोडे तेल लावलेले उत्तम. सध्या घरात पंखा वा एसी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे शक्यतो रात्री झोपताना तेल लावलेले नसावे. रात्री झोपताना तेल लावलेले असले तर पंख्याचा वा एसीचा झोत सरळ शरीरावर येणार नाही, तसेच खोलीतील तापमान फार कमी नाही याची काळजी घेणे आवश्यक असते, अन्यथा कफ वाढून इतर त्रास उद्भवण्याची शक्यता असते. अभ्यंग केव्हा टाळावा?

  • तापात शरीरात अग्नीचे असंतुलन झालेले असल्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असल्यामुळे अंगात ताप असल्यास अभ्यंग टाळणे इष्ट ठरते.

  • शरीरावर सूज आलेली असल्यास वा शरीरावर मुका मार लागलेला असल्यास अभ्यंग करणे टाळावे. अशा वेळी संतुलन रोझ ब्युटी तेलासारखे तेल हलक्या हाताने लावावे, पण अशा वेळी रगडू नये.

  • फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी मसाज करू नये वा तेथे तेल लावू नये. पण प्लॅस्टर लावलेले असल्यास आजूबाजूला हलक्या हाताने तेल लावण्याचा फायदा होतो.

  • गर्भावस्थाकाळात स्वतः हलक्या हाताने तेल लावणे उत्तम ठरते. याबद्दलचे विस्तारपूर्वक मार्गदर्शन आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात केलेले आहे. परिचारिकेकडून मसाज घ्यायचा असल्यात तीन महिन्यांनंतरच घ्यावा. या विषयीचे ज्ञान असलेल्या परिचारिकेकडूनच मसाज घ्यावा.

  • कुठल्याही प्रकारची व्यग्रता, चिंता असल्यास मसाज टाळणेच योग्य ठरते. मसाज घेण्यापूर्वी मन शांत होण्यासाठी स्वास्थ्यसंगीत ऐकणे, चांगल्या गोष्टींचा विचार करणे, चिंतेला परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरते. यामुळे मन शांत झाल्यावरच मसाज घेणे योग्य. तेलाचा अभ्यंग करण्यामुळे शरीरातील वातदोष कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे जून ते सस्टेंबर या काळात जमेल तितक्या वेळी अभ्यंग घेणे योग्य ठरते. तसेच थंडीच्या काळातही शरीराला तेल लावल्यास शरीराचे स्वास्थ्य टिकून राहायला अभ्यंगाची साथ मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com