गर्भसंस्कार पुरस्कार सन्मान मातृत्वाचा!

‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हा श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नयेच याच्या मार्गदर्शनाला आयुर्वेदात अधिक महत्त्व दिलेले आहे.
Ayurvediy Garbhasanskar
Ayurvediy GarbhasanskarSakal
Updated on
Summary

‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हा श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नयेच याच्या मार्गदर्शनाला आयुर्वेदात अधिक महत्त्व दिलेले आहे.

- डॉ. मालविका तांबे

‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हा श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नयेच याच्या मार्गदर्शनाला आयुर्वेदात अधिक महत्त्व दिलेले आहे. त्याचप्रमाणे ती. बाबा नेहमी म्हणत की अपत्याला आजार झाल्यावर उपचार करण्यासाठी पळापळ करण्यापेक्षा आरोग्यवान पिढीला जन्म देणे अधिक आवश्यक आहे. कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये गेली कित्येक वर्षे ते गर्भसंस्कार ही संकल्पना राबवत होते. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला जन्मापासून बालकांना मधुमेह, हृदयरोग, थायरॉइडचे विकार, त्वचेचे विकार, ॲलर्जी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी घेऊन संतुलनच्या दवाखान्यात येणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसून येते. हे पाहून गर्भसंस्काराचे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे हे श्री गुरुजींनी ठरविले.

या अदम्य इच्छेतूनच आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकाची संकल्पना साकार झाली. या पुस्तकाच्या माध्यमातून आयुर्वेदातील गर्भसंस्कारांचे शास्त्र अत्यंत सोप्या व जनसामान्यांना समजेल, उमगेल अशा भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकाच्या प्रकाशनापासून ते आजपर्यंत लाखो कुटुंबांनी यातील ज्ञानाचा लाभ करून घेतला. यात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले व त्याचे अप्रतिम परिणाम त्यांना त्याच्या बाळांमध्ये दिसून आले असे अनेक लोक आग्रहाने आजही सांगतात. आपल्याला एक छान, गोंडस, स्वस्थ, हसरं, बुद्धिसंपन्न बाळ व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. आयुर्वेदानुसार जन्माच्या वेळीच रूप, रंग, स्वभाव, प्रकृती, बुद्धिमत्ता, ग्रहणशक्ती, निर्णयक्षमता, वागणूक, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य या सगळ्यांचे मूळ रोवले गेलेले असते. त्यामुळे आपल्याला मूल हवे आहे हे दांपत्याने गर्भधारणा होण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे. यासाठी गर्भधारणा होण्यापूर्वी, संपूर्ण गर्भावस्थेत व प्रसूती झाल्यावरही व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक असते.

बीजसंस्कार हा गर्भसंस्कारातील सर्वांत महत्त्वाचा भाग. बीज (स्त्रीतील बीजांड व पुरुषातील शुक्राणू) म्हणजे माता-पित्याकडून बालकाकडे येणारी गुणसूत्रे. आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वी शास्त्रोक्त पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करवून घेतली तर बीजशुद्धी होण्यास मदत मिळते. सध्याचे आधुनिक शास्त्रही हेच सांगते की गुणसूत्रांवर आहार-आचरणाचा, वातावरणाचा प्रभाव दिसतो. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी केल्याने शरीरात असलेली विषद्रव्यांचा निचरा होतो, शरीराच्या चयापचय क्रियेत काही दोष असल्यास ते दूर होतात. अशा प्रकारे शुद्धी झाल्याने शरीरातील वीर्यधातू संपन्न होतो. पंचकर्मामध्ये शुक्रधातू संपन्न राहण्याकरता अर्थात वीर्यवृद्धी होण्याकरता शरीरशुद्धी करून झाल्यानंतर उभयतांमध्ये निरनिराळ्या बस्ती केल्या जातात, तसेच स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती, उत्तरधूप हे उपचार केले जातात.

शरीरशुद्धी झाल्यावर पौष्टिक आहार, रसायनसेवन सुरू ठेवून आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करून गर्भधारणेस उद्युक्त व्हावे असे सांगितले आहे. गर्भधारणा झाल्यावर गर्भवतीच्या आहाराची काळजी कशी घ्यावी, जेणेकरून बाळ व गर्भवती या दोघांचेही पोषण व्यवस्थित होईल याचे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. गर्भवतीची दिनचर्या कशी असावी, तिने कुठली योगासने करावीत, व्यायाम कुठले करावेत, नऊ महिन्यांत विशेष काळजी कोणती घ्यावी, मासानुमासिक आहार-औषध-रसायनयोजना कशी असावी, सर्वांगीण स्वास्थ्यासाठी तिने आपल्या दिनक्रमात ध्यान-धारणा-स्वास्थसंगीत यांचा समावेश कसा करावा, चांगल्या गोष्टींचे वाचन करावे वगैरे गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्थात गर्भावस्थेच्या या काळात दांपत्याला अनेक गोष्टींचे पालन करावे लागते. पण होणाऱ्या माता-पित्याने, विशेषतः गर्भवतीने, वेळ देऊन सर्व स्तरांवर केलेल्या प्रयत्नांमुळे गर्भसंस्कारित बालकांमध्ये एक वेगळीच चुणूक दिसते असा अनेकांचा अनुभव आहे.

आमचे बाळ ‘संतुलन बेबी’ आहे, अर्थात ‘गर्भसंस्कारित बाळ’ आहे असे अनेक पालक अत्यंत अभिमानाने सांगतात. आई-वडिलांनी केलेल्या या प्रयत्नांसाठी त्यांचे कौतुक करावे या भावनेने श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांनी गर्भसंस्कार पुरस्कार द्यायला सुरुवात केली. गेली १० वर्षे हा गर्भसंस्कारांचा सोहळा साजरा केला गेला. यावर्षी श्रीगुरुजीच्या जन्मदिनी म्हणजे २८ जून रोजी हा सोहळा साजरा केला जाणार आहे. श्रीगुरुजींच्या आशीर्वादाने संतुलन आयुर्वेद गर्भसंस्कारांचा हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न चालू ठेवणार आहे. हे गर्भसंस्कार पुरस्कार सोहळ्याचे ११वे वर्ष. या पुरस्कारासाठी काही निकष आहेत. मात-पित्याने गर्भधारणेपूर्वी काय काळजी घेतली, त्यांचे आहार-आचरण कसे होते, गर्भवतीला गर्भावस्थेत काही विशेष अनुभव आले का, प्रसूती कशी झाली, बाळाचे प्रगतीचे टप्पे कसे होते, बाळामध्ये काही विशेष गुण जाणवले का, बाळाचा संगीताला प्रतिसाद कसा होता वगैरे सर्व माहिती ऑन-लाईन, ऑडिओ-व्हिडिओ, फोटे वगैरेंसह मागवली जाते.

१ जानेवारी २०१९ ते ३० जून २०२१ या कालावधीत जन्मलेल्या बालकांना यंदाच्या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी आपले सविस्तर विवरण १५ जून पर्यंत पाठवावे. अधिक माहितीसाठी www.garbhasanskar.in या साइटला व्हिजट करावे. स्वस्थ व निरोगी मुले असणे ही उज्ज्वल भविष्यासाठी असणारी आवश्यकता आहे. व्यवस्थित गर्भसंस्कार करून बालके जन्माला आली तर समाजाचे उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. स्वर्णिम भविष्याकडे वाटचाल करण्याकरता श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ पुढील येणाऱ्या किती तरी पिढ्यांना होणार आहे. श्रीगुरुजींना श्रद्धांजली म्हणून समाजकल्याणाचे हे कार्य असेच अविरत चालू राहून समाजला सुदृढ, हुशार, विवेकशील, विचारशील नागरिक देऊ शकल्यास हे ज्ञान खऱ्या अर्थाने सार्थक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com