निरोगी बाळंतपणासाठी व्यायाम 

डॉ कनुप्रिया राजेश्वर
Friday, 6 December 2019

व्यायाम तर नेहमी हवाच. पण, गरोदरपणातही व्यायाम केलाच पाहिजे. गर्भारपणामुळे शरीरात होणाऱ्या बदलांना आणि त्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्यांना व्यायामाच्या मदतीने सामोरे जाता येईल. 

 

स्त्रियांनो, तुम्ही कधी गरोदरपणात व्यायामाचा विचार केला आहे? केला नसेल, तर यापुढे विचार करा. यामुळे तुमच्या गरोदरपणाशी निगडित असलेल्या अनेक आरोग्य समस्या दूर ठेवण्यात मदत होऊ शकते. 
 

व्यायाम तर नेहमी हवाच. पण, गरोदरपणातही व्यायाम केलाच पाहिजे. गर्भारपणामुळे शरीरात होणाऱ्या बदलांना आणि त्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्यांना व्यायामाच्या मदतीने सामोरे जाता येईल. 

 

स्त्रियांनो, तुम्ही कधी गरोदरपणात व्यायामाचा विचार केला आहे? केला नसेल, तर यापुढे विचार करा. यामुळे तुमच्या गरोदरपणाशी निगडित असलेल्या अनेक आरोग्य समस्या दूर ठेवण्यात मदत होऊ शकते. 
 

गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा आहे. कारण, आपल्या शरीरात एक जीवन जोपासण्याचे वरदान केवळ स्त्रीला मिळाले आहे. हे जीवन ती अस्तित्वात आणू शकते. आपले बाळंतपण सुरळीत व्हावे, हे तर प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. गरोदरपणात फिजिओथेरपी घेतल्यास स्त्रियांचा बांधा उत्तम राहण्यास, तसेच निरोगी पद्धतीने बाळंत होण्यास मदत होते. गरोदरपणात व्यायाम करणे कसे उपयुक्त ठरू शकते हे पाहा. 

फिजिओथेरपी गरोदर स्त्रीसाठी कशी उपयुक्त ठरते? 
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात स्त्री अनेक हार्मोनल बदलांना सामोरी जाते आणि तिला गरोदरपणाशी निगडित अनेक लक्षणे जाणवत असतात (ही लक्षणे गरोदरपणाच्या प्रत्येक तिमाहीत बदलू शकतात). हे बदल नैसर्गिकरीत्या घडत असल्याने गरोदरपणात ते घडणे सामान्य समजले जाते. पण, स्त्रीच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर त्यांचा परिणाम होतोच. फिजिओथेरपी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करण्याचा मार्ग स्वीकारलेल्या स्त्रियांचा बांधाही उत्तम राहतो आणि त्यांचे बाळंतपणही सुरळीत होते. फिजिओथेरपीमुळे स्त्रियांना गरोदरपणाशी निगडित बहुतेक समस्यांचा सामना करण्यात मदत होते. त्याचप्रमाणे या काळात दुखापती होण्याची शक्यता कमी होते. या समस्यांमध्ये पाठदुखी, एखाद्या दुखापतीमुळे होणारा त्रास, नैराश्य, भीती किंवा चिंता आणि अगदी निद्रानाशाचाही समावेश असतो. 

गरोदरपणात व्यायामाची भूमिका काय असते? 
व्यायामाचा फायदा स्नायूंना अनेक मार्गांनी होऊ शकतो. गरोदरपणाचे वजन संपूर्ण काळ वाहण्यासाठी स्नायूंची बळकटी वाढणे आवश्यक असते. ते व्यायामामुळे शक्य होते. शरीर अनेकविध हार्मोनल बदलांमधून जात असल्याने त्याचे काही दुष्परिणामही होतात. यावर योग्य मदत घेणेच सुरक्षित आहे. पूर्वीपासून योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करत राहिल्यास हे परिणाम हाताळणे सोपे होते. बाळंतपण सर्वसाधारण पद्धतीने म्हणजे योनीय पद्धतीने होण्यासाठी लागणारी शक्ती संबंधित स्त्रीला मिळवून देण्यात व्यायामाची भूमिका मोठी आहे. हार्मोन्समधून होणारे स्रावही दुष्परिणाम करतात. त्यामुळे हे सर्व हाताळण्यासाठी स्त्रीला गरोदरपणाच्या प्रत्येक तिमाहीत वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करावे लागू शकतात. दररोज व्यायाम केल्यास नैराश्य, ताण, चिंता यापासून आपण दूर राहू शकतो. गरोदर स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी व हृदयगती आटोक्यात राहते. त्याचप्रमाणे श्वसनाच्या समस्याही दूर होतात. सध्याच्या काळात अनेक स्त्रियांना ‘जेस्टेशनल डायबेटिस’ (गर्भारपणातील मधुमेह) होतो. स्त्रियांना अनेकदा या आरोग्य समस्या समजतच नाहीत आणि मग त्या दूर करणे कठीण होऊन बसते. गरोदरपणात किरकोळ तक्रारींसाठी वारंवार औषधेही सुचवली जात नाहीत. गरोदरपणातील लक्षणांचे त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन झाले पाहिजे. म्हणूनच येथे फिजिओथेरपी खूप महत्त्वाची आहे. वेदना व अन्य समस्यांचे हे पारंपरिक पद्धतीने केलेले व्यवस्थापन आहे. 
आई पुरेशी सशक्त असेल आणि बाकी सगळे सामान्य असेल, तरी  सर्वसाधारण योनीय पद्धतीने बाळंत होण्यासाठी शक्ती लागते. ही शक्ती या नऊ महिन्यांतच उभी करणे आवश्यक असते. कारण,गरोदरपणाची लक्षणे तर नैसर्गिकच असतात. ती जाणवतच राहणार. दररोज व्यायाम केल्यामुळे एण्डोर्फिन्ससारखे आनंदी हार्मोन स्रवतात. या हार्मोनची गर्भार अवस्थेत खूप आवश्यकता असते. या हार्मोनमुळे `मूड स्विंग्ज`सारखी समस्या सुलभतेने सोडवता येते. हे आनंदी हार्मोन्स नैसर्गिक वेदनाशामक औषधांसारखे असतात. 

गरोदरपणात स्त्रीने फिजिओथेरपी तज्ज्ञाकडे केव्हा जावे?  
शक्य तेवढ्या लवकर व्यायाम सुरू करणे उत्तम ठरते. मात्र, सध्याच्या काळात पहिले दोन महिने तर डॉक्टरांकडे जाईपर्यंतच उलटलेले असतात. तिसऱ्या महिन्यापासून व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. संभाव्य मातांनी शक्य तेवढ्या लवकर फिजिओथेरपी सुरू करावी. 
प्रसूतीच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या स्नायूंना बळकटी देणारे व नंतर स्त्रीला निरोगी बाळंतपणासाठी मदत करणारे व्यायाम कोणते? 

गरोदर स्त्रिया केगेल्स करू शकतात व ते त्यांनी केलेही पाहिजेत. हा सर्वांत सुरक्षित व्यायाम आहे. अर्थात, प्रत्येक स्त्रीची आरोग्यविषयक परिस्थिती वेगळी असते. तेव्हा प्रत्येकीने फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यानुसार तसेच तज्ज्ञांनी जसे सांगितले आहे, तसे अचूक व्यायाम केले पाहिजेत. 
 

याचा अर्थ असा की, गरोदरपणात होणाऱ्या बदलांवर व्यायामाच्या स्वरूपात व्यवस्थित उपचार झाले नाहीत, तर ते बदल कायमस्वरूपी ठरू शकतात व ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. उदाहरणार्थ, या काळात निर्माण होणाऱ्या पाठदुखीसारख्या काही समस्या स्त्रियांना आयुष्यभर सतावत राहतात. म्हणूनच, तुम्ही गरोदरपणात व्यायाम करत नसाल, तर तुम्हाला ‘मसलोस्केलेटल’ (अस्थी व स्नायूविषयक) समस्या निर्माण होण्याचा धोका खूप अधिक आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exercise for Healthy Childbirth article written by Dr Kanupriya Rajeshwar