‘ड’चा अभाव

डॉ. अजय कंथारिया
Tuesday, 9 May 2017

जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता अलीकडे अनेकांमध्ये दिसून येत आहे. तसेच या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काही आजार उद्भवत असल्याचेही समोर येत आहे. हृदय व रक्तवाहिन्यांविषयक काही आजारांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत असलेले आढळले आहे.

जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता अलीकडे अनेकांमध्ये दिसून येत आहे. तसेच या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काही आजार उद्भवत असल्याचेही समोर येत आहे. हृदय व रक्तवाहिन्यांविषयक काही आजारांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत असलेले आढळले आहे.

संपूर्ण जगातील तीस ते पन्नास टक्के आरोग्यवान, मध्यम वयोगटातील व्यक्ती व वृद्ध व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. हृदयाच्या पेशींच्या आतील कॅल्शियमचे प्रमाण व कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हृदयाच्या पेशी अधिकतम कार्यक्षम करण्याकरिता ‘ड’ जीवनसत्त्व परिणामकारक ठरू शकते. अनेक वैज्ञानिक संशोधनांनी आता सिद्ध केले आहे की, 

या जीवनसत्त्वांची कमतरता हे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका व हृदयाघात यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्याविषयक आजारांमागील प्रमुख कारण बनले आहे.

हृदय व रक्तवाहिन्याविषयक आजार आणि जीवनसत्त्व ‘ड’ कमतरतेशी त्यांचा संबंध पाहू:

उच्च रक्तदाब : जीवनसत्त्व ‘ड’ कॅल्शिट्रायल स्वरूपात शरीराच्या सर्व पेशींवर परिणाम करते. ‘कॅल्शिट्रायल’चे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. वृद्ध महिलांमध्ये  ‘कॅल्शिट्रायल’मुळे रक्तदाब कमी असण्याबरोबरच त्यांच्या हृदयाचे ठोकेदेखील कमी होत असल्याचेही पाहणीत आढळले. फक्त कॅल्शिअमचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये हे लाभ दिसून आले नाहीत. 

हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार : रक्तवाहिन्या अरुंद करणाऱ्या मेदयुक्त पदार्थांची निर्मिती, कोलेस्ट्रॉलचे रक्तामधील प्रमाण, रक्तामधील स्निग्धाम्लांचे उच्च प्रमाण, मधुमेह व लठ्ठपणा यांसारखे हृदय व रक्तवाहिन्याविषयक आजारांकरिता जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांना हेमोडायलिसिससंदर्भात जीवनसत्त्व ‘ड’ सप्लीमेण्ट्‌स दिले असता, हृदय व रक्तवाहिन्याविषयक आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’चे प्रमाण कमी असल्यास, त्यांना हृदयविकार, हृदयविकाराचा झटका यांचा धोका वाढतो. 

हार्ट फेल्युअर : जीवनसत्त्व ‘ड’च्या कमतरतेमुळे हार्ड फेल्युअरचीसुद्धा शक्‍यता खूप वाढते. जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता शरीरामधील अनेक पेशींमधील दाहाला कारणीभूत आहे. जीवनसत्त्व ‘ड’ पुरेशा प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरामधील एकूण दाह कमी होत रोगप्रतिकार शक्तीला चालना मिळते, असे आढळून आले आहे.

हृदयाघात : हृदयाघात हा जीवनसत्त्व ‘ड’च्या कमतरतेमुळे उद्‌भवू शकणारा आणखी एक आजार आहे. जीवनसत्त्व ‘ड’च्या कमतरतेमुळे मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो. एमआरआयचा उपयोग करून मेंदूच्या इमेजिंग अभ्यासामधून हे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor article by Dr. Ajay Kantharia