शरीराचा आरसा

डॉ. मानसी पावसकर-मुळ्ये
Friday, 16 February 2018

शरीरात विषाणू अथवा जीवाणूंना प्रवेश करण्यासाठी जी द्वारेआहेत, त्यातील मुख हे प्रमुख द्वार आहे. आरोग्यासाठी या द्वाराची काळजी घेतलीच पाहिजे. 

मुखआरोग्याला शरीराचा आरसा म्हटले जाते हे योग्यच आहे. आपले मुख आपल्या शरीराचे मुख्य द्वार आहे. एक स्वच्छ तोंड केवळ सौंदर्यशास्त्रदृष्ट्या सुखकर नाही, परंतु आपल्या एकूण आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. रोगांचा फैलाव रोखण्यापासून, प्रतिबंध घालण्यामध्ये महत्वाची भूमिका मुखच बजावते. वैद्यकीय संशोधन असे सांगते की, दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष ककेले तर मधुमेह, हृदयरोग आणि हाडांच्या सामान्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

मधुमेह : जवळपास ५५ ते ६० या वयोगटातील पंचवीस टक्के लोकांना रक्तातील साखरेची पातळी उच्च आहे. 

बहुतांश लोकांना माहित आहे की, मधुमेहामुळे शरीराचे दुखणे बरे होण्यास विलंब होतो. यात तुमचे डोळे, नसा, मूत्रपिंडे व अगदी दात आणि हिरड्या यांचाही समावेश आहे. मधुमेही रुग्णांना नेहमी तोंड कोरडे पडण्याची जाणीव होत असते .याला झेरॉस्टोमिआ असे म्हणतात. ज्यामुळे दात किडण्याची प्रवृत्ती वाढते, हिरड्यांना सूज येऊ शकते. अर्थात अन्न  नीट चावता न आल्यामुळे संतुलित आहारावर वाईट परिणाम होतो. जर नियमितपणे तुम्ही दंतविषयक समस्यांची काळजी घेतली, योग्य आहाराचे सेवन केले, ताणतणावावर  नियंत्रण ठेवले व तुमच्या डॉक्‍टरांनी दिलेली औषधे घेतली तर तुमची ‘शुगर’ बऱ्यापैकी नियंत्रणात राहील. 

आहार : आपण काय व किती प्रमाणात खाता हे आपल्या संपूर्ण शरीराचे योग्य कार्य करण्यासही थेट संबंधित आहे. 

पन्नाशीतील बहुतांश लोकांमध्ये अस्थीच्या समस्या असतात. संधिवातामुळे मर्यादित हालचाली होतात. याच बरोबर आर्थिक समस्या, सामाजिक दूरता, मूड डिसऑर्डर, मद्य सेवन, निरनिराळी औषधे, दातांच्या आरोग्यातील निष्काळजीपणा या सर्वांचा पौष्टीक आहारावर परिणाम होतो. ज्यामुळे व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, कॅलसिम, आयर्न इत्यादि आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहे. या घटकांचे शोषण कमी पडून अशक्तपणा, मज्जातंतूंची हानी, स्नायूंच्या वेदना, दात किडणे, जीभ जळजळणे, तोंडात फोड येणे इत्यादी त्रास होतांना आढळते. तोंडावाटे आरोग्य आणि पौष्टिक आहार एकमेकांशी जोडलेले असतात. दात नसल्यामुळे अन्न व्यवस्थित चावणे अवघड जाते. त्याचप्रमाणे अपुऱ्या आणि अयोग्य आहारामुळे दातांच्या आणि तोंडांच्या समस्या उद्भवू शकतात. दूध, दही, चीज, पालक, रताळे, भेंडी, गाजर, कोबी ,जवस ,बदाम, (मांसाहारामध्ये अंडी, मासे) यांचा जेवणात समावेश असावा. अन्न हे आपण औषध म्हणून खावे, नाहीतर पुढे जाऊन आपणास औषधें हीच अन्न म्हणून खावी लागतील.  

हृदयाचे विकार - जे जीवाणू हिरड्यांच्या समस्या निर्माण करतात तेच जीवाणू मग हळूच रक्तात प्रवेश करतात. रक्ताच्या गाठी निर्माण करतात. त्यामुळे वाहिन्यांमधे अडथळे (ब्लॉकेज) निर्माण होण्याचा धोका वाढतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor mouth body virus