प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मला गेल्या चार-पाच महिन्यांपासून चक्कर येण्याचा त्रास होतो आहे. उशीवर मान टेकवली की अर्धा-एक मिनीट जोरात चक्कर येते. कानात बोटे घातली व डोळे गच्च मिटून घेतले तरी चक्कर येते. हल्ली त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. यावर काही उपाय आहे का?
- देशमुख 

उत्तर -  चक्कर ही वातदोषाशी संबंधित आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. प्रत्यक्षातही मानेला नियमित ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावले, कानात ‘संतुलन श्रुती तेला’सारखे वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेल टाकले तर, अशा प्रकारे चक्कर येण्याचे प्रमाण कमी होताना दिसते. याशिवाय नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. वातशमनासाठी ‘संतुलन वातबल’ गोळ्या, ब्राह्मीपासून बनविलेल्या ‘सॅन ब्राह्मी’ या गोळ्या घेण्याचाही फायदा होईल. या उपायांचा उपयोग होईलच, परंतु चक्कर येण्यामागे अजून काही मोठे कारण तर नाही ना, मेंदूपर्यंत रक्‍ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित होते आहे ना, याची खात्री करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणेसुद्धा आवश्‍यक.

-------------------------------------------------------------

मी  तीन वर्षांपूर्वी पाय घसरून लहानशा खड्ड्यात पडलो होते. त्या वेळी खड्ड्याचा काठ माझ्या कंबरेच्या मणक्‍याला लागला होता. नंतर वर्षभर काहीच त्रास झाला नाही. मात्र त्यानंतर दोन्ही तळपायांना, पोटऱ्यांना मुंग्या येण्यास सुरुवात झाली. आता या ठिकाणी वेदनाही होतात, बधिरपणा जाणवतो. सतत वेदना सहन कराव्या लागल्याने तब्येतही खालावली आहे. कृपया मार्गदर्शन करावे. - कदम

उत्तर - अपघातानंतर सुरू झालेला त्रास आणि एकंदर त्रासाची तीव्रता लक्षात घेता यावर प्रत्यक्ष प्रकृती दाखवून योग्य उपचार सुरू करणे, बस्ती, स्पाइन पोटली वगैरे उपचार करून घेणे हेच श्रेयस्कर. बरोबरीने पाठीच्या कण्यावर ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, ‘मॅरोसॅन रसायन’, ‘संतुलन वातबल’ या गोळ्या घेणे या उपायांचा उपयोग होईल. पायांना नियमित अभ्यंग, तळपायांना पादाभ्यंग करण्यानेही पायांचा बधिरपणा, मुंग्या हे त्रास कमी होतील. तरीही एकदा वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम होय.

-------------------------------------------------------------

मी   २५ वर्षांचा युवक असून माझा बांधा मध्यम आहे. शरीराने धडधाकट दिसत असलो तरी मी आतून सुस्त आहे. तसेच माझे मन फार चंचल आहे. दिवसभर अनेक विचार माझ्या मनात येतात. तरी शरीराची सुस्ती व मनाचा चंचलपणा कमी करण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे.
- चंदू करंजुले

उत्तर -  निरोगी आणि उत्साहाने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी शक्‍ती आणि स्फूर्ती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. शक्‍ती कमी पडली तर मनही सैरभैर होते. यासाठी रोज सकाळी प्रकृतीला व वयाला साजेसे काहीतरी रसायन घेण्याचा उपयोग होईल. उदा. च्यवनप्राश, पंचामृत, ‘संतुलन चैतन्य कल्प’ घेता येईल. याबरोबरीने शरीर-मनाला स्फूर्ती येण्यासाठी रोज सकाळी लवकर उठणे, नियमित चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे, अनुलोम-विलोम प्राणायाम करणे हे उपाय योजता येतील. योग्य प्रकारे म्हटलेला ॐकार ऐकणे, बरोबरीने म्हणणे, संतुलन ओम्‌ मेडिटेशन अर्थात ‘सोम’ ध्यान करण्यास सुरुवात करण्यानेही बघता बघता मनाचा चंचलपणा, शरीराचा जडपणा, निरुत्साह वगैरे तक्रारी कमी होतात असा अनुभव आहे. 

-------------------------------------------------------------
मी   ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. माझी समस्या अशी आहे की मला दिवसभर पुष्कळ घाम येतो व शौचाला साफ होत नाही. मला बाकी मोठा आजार नाही. कृपया मार्गदर्शन करावे.  
- ज्ञानदेव 

उत्तर -  पुष्कळ घाम येण्याने शरीरातील जलतत्त्व अतिप्रमाणात कमी झाले तर त्यामुळे थकवाही येऊ शकतो. शरीरात उष्णता वाढल्याने अतिघाम येत असला तर प्रवाळपंचामृत, कामदुधा घेण्याचा उपयोग होईल. उशिरासव, ‘अनंतसॅन’, पुनर्नवाघनवटी या गोळ्या घेण्याने लघवी मोकळी झाली तर त्यामुळे सुद्धा घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. स्नान करताना अंगाला कुळथाच्या पिठात ‘सॅन मसाज पावडर’सारखे सुगंधी उटणे मिसळून लावणे, ज्या ठिकाणी जास्त घाम येतो म्हणजे काखेत वगैरे स्नानानंतर तुरटीचा खडा फिरविणे, यामुळेही घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. शौचाला साफ व्हावी यासाठी आहारात साजूक तुपाचा योग्य प्रमाणात समावेश करण्याचा उपयोग होईल. काही दिवस रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅन कूल चूर्ण’ घेण्याचा, जेवताना अगोदर उकळलेले गरम पाणी पिण्याचाही उपयोग होईल. 

-------------------------------------------------------------

मा झे वय ४० वर्षे असून मला पित्ताचा त्रास होतो. तिखट व मसालेदार पदार्थ खाल्ल्यास छातीत तसेच घशात जळजळ होते. तसेच पित्त झाले असताना कानही गरम होतात. कृपया उपचार सुचवावा.
- मीरा

उत्तर -  पित्त वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यावर संयम ठेवणेच श्रेयस्कर होय. बरोबरीने कान गरम होतील इतक्‍या प्रमाणात पित्त वाढू नये यासाठी सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा या गोळ्या घेता येतील. देशी गुलाब व खडीसाखर यांच्यापासून सूर्यप्रकाशात तयार केलेला खात्रीचा गुलकंद, उदा. ‘संतुलन गुलकंद’ एक-एक चमचा खाणे, दुधाबरोबर ‘संतुलन शतानंत’ कल्प घेणे यामुळेही पित्त आटोक्‍यात राहण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तूप लावणे, नाभी व नाभीभोवती ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला’सारखे शीतल वीर्याचे व आतपर्यंत जिरण्याची क्षमता असणारे तेल लावणे या उपायांनी  पित्त संतुलनात राहण्यास मदत मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com