प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 22 September 2017

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. यातील प्रश्नोत्तरांचा आणि संतुलन उत्पादनांचा मला खूपच लाभ होत आहे. माझा प्रश्न असा आहे की, लहान बाळांना काजळ लावावे का नाही? डॉक्‍टर सांगतात की, काजळ लावू नये, हे खरे आहे का? बाळाला सॅन अंजन लावले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
... अंकिता

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. यातील प्रश्नोत्तरांचा आणि संतुलन उत्पादनांचा मला खूपच लाभ होत आहे. माझा प्रश्न असा आहे की, लहान बाळांना काजळ लावावे का नाही? डॉक्‍टर सांगतात की, काजळ लावू नये, हे खरे आहे का? बाळाला सॅन अंजन लावले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
... अंकिता

उत्तर - लहान बाळांना सॅन अंजन (ब्लॅक) हे अंजन नक्की लावता येते. हे अंजन काजळासारखे दिसत असले, काजळासारखेच वापरायचे असले तरी बाजारात मिळणाऱ्या काजळापेक्षा खूप वेगळे आहे. यात कुठलेही केमिकल द्रव्य नाही किंवा हे तयार करण्यासाठी कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नाही. उलट शुद्ध साजूक तुपाच्या निरांजनाची काजळी पकडून त्यात डोळ्यांना हितकर द्रव्यांनी संस्कारित तूप, मोती भस्म वगैरे इतर नेत्र्य द्रव्ये मिसळून हे अंजन तयार केले जाते. त्यामुळे हे लहान मुलांच्या डोळ्यात घालता येते. सध्या डोळ्यांचे त्रास, कमी वयात चष्मा लागणे वगैरे त्रास झपाट्याने वाढत आहेत. याला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा एक साधा पण प्रभावी उपाय होय. सहसा अंघोळ, धुरीनंतर बाळ झोपते, त्या वेळी स्वच्छ बोटाने हळुवारपणे बाळाच्या डोळ्यात ‘सॅन अंजन (ब्लॅक)’ सहजपणे घालता येते.  

माझ्या वडिलांना आपण खोकल्यासाठी जो औषधोपचार सुचवला, त्याचा त्यांना खूपच उपयोग झाला. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. माझे वय ३९ वर्षे आहे. माझी पाळी नियमित येते, चारच दिवस अंगावरून जाते मात्र कधी कधी रक्‍तस्राव खूप होतो. मध्यंतरी रक्‍ताच्या कमतरतेमुळे मला रक्‍त द्यावे लागले होते. मात्र तेव्हापासून केस झपाट्याने पांढरे व्हायला लागले आहेत, गळतही आहेत, चेहरा काळवंडला आहे. हे सर्व त्रास रक्‍ताची कमतरता असल्याने होतात असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. सूर्यनमस्कार किंवा इतर आसने करावीत काय? 
... संगीता सोनावणे.  

उत्तर - सूर्यनमस्कार अवश्‍य करावेत. योगासनांचाही स्त्रीसंतुलनासाठी उत्तम उपयोग होत असतो. संतुलन क्रियायोगापैकी समर्पण, स्थैर्य, अमृत क्रिया वगैरे करण्याचाही फायदा होईल. तसेच नैसर्गिक द्रव्यांच्या मदतीने रक्‍त वाढविण्यासाठी आणि मुख्य म्हणजे पाळीत रक्‍तस्राव योग्य प्रमाणात होण्यासाठी उपचार घ्यायला हवेत. यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू नियमित वापरणे, ‘संतुलन फेमिफिट सिरप’, पुष्यानुग चूर्ण, ‘अशोक-ॲलो सॅन गोळ्या’ घेणे चांगले. रोज साळीच्या लाह्या खाण्याने, तांदळाचे धुवण घेण्यानेही गर्भाशयातील उष्णता कमी होऊन रक्‍तस्राव योग्य प्रमाणात होण्यास मदत मिळेल. रक्‍ताच्या कमतरतेवर रोज मोरावळा घेण्याचा, ‘सॅनरोझ’ रसायन घेण्याचा उपयोग होईल. डाळिंब, सफरचंद, पालक, केशर यांचा आहारात समावेश करणे, स्वयंपाक करताना लोखंडाचा तवा, पळी, कढई वापरणे हे सुद्धा उत्तम. केसांच्या आरोग्यासाठी ‘हेअरसॅन गोळ्या’ घेण्याचा आणि ‘संतुलन व्हिलेज हेअर तेल’ लावण्याचा तसेच केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण वापरण्याचा फायदा होईल.

माझे वय ५८ वर्षे असून माझ्या डोळ्यांतून अधूनमधून पाणी येते. डोळ्यातून नाकापर्यंत जाणाऱ्या नळ्या व्यवस्थित असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. कधी कधी शिंका आल्या तर नाकातूनही पाणी येते. कृपया काही औषधे, उपचार सुचवावेत. मी सॅन अंजन (क्‍लिअर) वापरतो आहे. 
... सतीशकुमार  
उत्तर -
अंजन वापरणे चांगलेच आहे. बरोबरीने काही दिवस गरम पाण्याबरोबर ‘संतुलन सितोपलादी चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून एक-दोन वेळी गरम पाण्यात तुळशीची पाने, ओवा, गवती चहा टाकून त्याचा वाफारा घेण्यानेही बरे वाटेल. घरात सकाळ-संध्याकाळ धूप करण्याने, विशेषतः ज्या खोलीत असाल त्या ठिकाणी ‘संतुलन टेंडरनेस धूप’ जाळल्यानेही शिंका येणे, नाक गळणे, डोळ्यातून पाणी येणे हे त्रास कमी होतील. आवश्‍यकता वाटली तर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे चांगले.

मला थायरॉईडचा त्रास आहे. सध्या १२५ मिलिची गोळी चालू आहे. माझी दोन्ही बाळंतपणे शस्त्रकर्माने झाली. बाळंपणानंतर विश्रांती, खाण्यापिण्यात काळजी घेता आली नाही. तेव्हापासून वजन वाढले आहे. अभ्यंग तेल नियमित वापरले, चालायला गेले तर बरे वाटते. थोडाही खंड पडला तर वजन पुन्हा वाढते. गेल्या वर्षापासून तर जराही वारे लागले तर हाडे दुखतात, अंग सुजते. कृपया मार्गदर्शन करावे.                  ... मानसी जाधव  
उत्तर -
या प्रकारे बाळंतवाताचा त्रास व्हायला नको म्हणून खरे तर वेळेवर म्हणजे प्रसूतीनंतरच सर्व काळजी घ्यायचा असते. आताही हा वाढलेला वात कमी करण्यासाठीच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नियमित अभ्यंग उत्तम आहेच, बरोबरीने ‘संतुलन वातबल गोळ्या’, पुनर्नवासव, ‘संतुलन संदेश आसव’ घेण्याचा उपयोग होईल. ‘फेमिसॅन तेला’चा पिचू तसेच आठवड्यातून एक-दोन वेळा ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेण्यानेही गर्भाशयात वाढलेला वात कमी होण्यास मदत मिळेल. थायरॉईडची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपाय असतात. यासाठी वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आवश्‍यक होय. तत्पूर्वी स्वयंपाकात किंवा वरून घेण्यासाठी सैंधव मीठ वापरण्यास सुरवात करता येईल. नियमित चालणे, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, ज्योतीत्राटक करण्याचाही उपयोग होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer