जागतिक हिपॅटायटिस दिन

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 11 August 2017

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

पित्ताशयाकडून अन्नमार्गात येणारे स्राव म्हणजेच पाचक पित्त काही कारणास्तव जेव्हा अडते तेव्हा ते अडलेले पित्त नेहमीप्रमाणे अन्नमार्गातून अधोगामी न होता उलट रस-रक्‍तधातूंपर्यंत पोचते व काविळीची लक्षणे दिसू लागतात. पित्ताशयात पित्ताचा खडा होण्याने, पित्ताच्या मार्गात कफदोष वाढल्याने, पित्तमार्गावर गाठ, गळू, ग्रंथी वगैरेंचा दाब पडल्याने किंवा कफज कृमींमुळे मार्गावरोध झाल्यानेही पित्ताचा नैसर्गिक मार्ग बंद होऊन ते कोठ्यात न येता शाखेत म्हणजे शरीरात इतस्ततः पसरते, यालाच शाखाश्रिता किंवा अवरोधजन्या कामला म्हणतात. 

पावसाळ्यामध्ये जंतुसंसर्गाची शक्‍यता वाढलेली असते म्हणूनच पाणी उकळूच पिणे, उघड्यावरचे अन्न न खाणे या प्रकारचे नियम पावसाळ्यात सर्वाधिक सांभाळावे लागतात. जंतुसंसर्ग कोणताही असो, तो आरोग्याला, शरीराला घातक असतोच. विशेषतः जेव्हा शरीरकार्याला जबाबदार असणाऱ्या अवयवापर्यंत जो जंतुसंसर्ग पोचू शकतो त्याचा प्रतिबंध करणे आणि झालाच तर त्यावर मुळापासून उपचार करणे, अवयवाची हानी होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. असाच एक जंतुसंसर्ग होणारा विकार म्हणजे हिपॅटायटिस. आजचा दिवस ‘जागतिक हिपॅटायटिस दिन‘ म्हणून ओळखला जातो. आयुर्वेदामध्ये ‘कामला’ नावाचा जो रोग समजावला आहे, त्याचाच एक प्रकार म्हणजे हिपॅटायटिस असे म्हणता येईल. 

‘कामान्‌ लाति इति कामला’ म्हणजे ज्या रोगात सर्व इच्छांचा लय होतो, काहीही करावेसे वाटत नाही तो रोग म्हणजे कामला होय.

आयुर्वेदात याचे मुख्य दोन प्रकार सांगितले आहेत. 
१. कोष्ठाश्रया अथवा बहुपित्ता
२. शाखाश्रया अथवा अवरोधजन्या

कोष्ठ म्हणजे कोठा. पित्त वाढविणाऱ्या आहार, आचरणामुळे अतिप्रमाणात वाढलेले पित्त जेव्हा कोठ्यामधून रस-रक्‍त-धातूंपर्यंत पोचते व लक्षणे उत्पन्न करते तेव्हा त्याला कोष्ठाश्रया अथवा बहुपित्ता कामला म्हणतात. यातली मुख्य लक्षणे अशी असतात,

त्वचा व चेहऱ्यावर पिवळेपणा दिसू लागतो.
डोळे पिवळे दिसू लागतात.
मल-मूत्राचा रंगही पिवळसर वा क्वचित लालसर होतो.
शरीराचा दाह होतो.
अन्नपचन नीट होत नाही, तोंड बेचव होते.
अशक्‍तता येते, हात-पाय गळून जातात.

पित्ताशयाकडून अन्नमार्गात येणारे स्राव म्हणजेच पाचक पित्त काही कारणास्तव जेव्हा अडते तेव्हा ते अडलेले पित्त नेहमीप्रमाणे अन्नमार्गातून अधोगामी न होता उलट रस-रक्‍तधातूंपर्यंत पोचते व या रोगाची लक्षणे दिसू लागतात. पित्ताशयात पित्ताचा खडा होण्याने, पित्ताच्या मार्गात कफदोष वाढल्याने, पित्तमार्गावर गाठ, गळू, ग्रंथी वगैरेंचा दाब पडल्याने किंवा कफज कृमींमुळे मार्गावरोध झाल्यानेही पित्ताचा नैसर्गिक मार्ग बंद होऊन ते कोठ्यात न येता शाखेत म्हणजे शरीरात इतस्ततः पसरते, यालाच शाखाश्रिता किंवा अवरोधजन्या कामला म्हणतात. हिची लक्षणे अशी असतात,

डोळे, त्वचा, मूत्र हळदीप्रमाणे गडद पिवळे होतात.
भूक लागत नाही, पोटात वायू धरतो, मलावष्टंभ होतो. 
हृदयाच्या ठिकाणी जडपणा प्रतीत होतो, ताप येतो  

मलप्रवृत्ती तिळाच्या पेंडेसारखी म्हणजे काळपट रंगाची होते. आतड्यांमधे मळ तयार होतो तेथपर्यंत पित्त पोचू न शकल्याने या प्रकारात मळामध्ये प्राकृत पिवळेपणाही नसतो. 

कामला होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, 
दूषित अन्न, अस्वच्छ पाणी
पित्तकर आहार, आचरण
दारू, तंबाखू वगैरे व्यसने
यकृताचा शोष होणे
रक्‍त कमी असताना पित्त वाढविणारे आहार व आचरण
पित्ताशयातील खड्यांमुळे पित्तमार्ग बंद होणे
यकृताचे कार्य बिघडणे
अतिप्रमाणात उपवास करणे किंवा भूक मारणे
बालकाच्या बाबतीत पित्तामुळे दूषित स्तन्यपान करण्याने
कफज कृमी होण्याने
रासायनिक, अनैसर्गिक, अशुद्ध विषद्रव्ये शरीरात प्रवेशित होण्याने

इतर कोणत्याही रोगाप्रमाणेच या रोगाचेही निदान लवकरात लवकर होणे आवश्‍यक असते. एकदा निदान झाले की कारणानुसार योग्य उपचार करून असलेला दोष सर्वप्रथम नाहीसा करणे ही उपचारांची पहिली पायरी, पुन्हा त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करणे ही उपचारांची दुसरी पायरी आणि अग्नी प्रदीप्त करणे, जंतुसंसर्गामुळे कमी झालेली यकृताची ताकद वाढवणे ही उपचारांची तिसरी पायरी असते. या तिन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी औषधोपचार आवश्‍यक असतातच; पण योग्य आहारयोजना व विश्रांती खूप महत्त्वाची असते.

या रोगात पथ्य म्हणून काही नियम पाळण्याची पद्धत आहे. औषधोपचार तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे आणि शिवाय खालील पथ्यकारक नियम पाळणे लवकर रोगमुक्‍त करणारे ठरते, 

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor World Hepatitis Day