esakal | गर्भसंस्कार पुरस्कार 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Garbhsanskar-Award

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला आलेल्या बालकाचा गौरव व्हावा, त्याच्या माता-पित्यांनी केलेल्या संस्कारांची, घेतलेल्या परिश्रमांची पावती मिळावी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गर्भसंस्कारांचा अपला अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठीचे हे एक उत्तम व्यासपीठ होय.

गर्भसंस्कार पुरस्कार 2019

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला आलेल्या बालकाचा गौरव व्हावा, त्याच्या माता-पित्यांनी केलेल्या संस्कारांची, घेतलेल्या परिश्रमांची पावती मिळावी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गर्भसंस्कारांचा अपला अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठीचे हे एक उत्तम व्यासपीठ होय. या कार्यक्रमात गर्भसंस्कार करून जन्माला आलेल्या, उत्तम प्रगती असलेल्या दोन-तीन बालकांना विशेष निकषांच्या आधारावर ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ तर पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवणाऱ्या सर्वांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येईल. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात २०१७ या संपूर्ण वर्षात जन्म झालेल्या बालकांना सहभागी होता येईल, कृपया पालकांनी आपल्या बालकाच्या संपूर्ण प्रगती विषयीची माहिती खालील मुद्‌द्‌यांच्या मदतीने भरून १० जून २०१९ पूर्वी पाठवावी.

प्रवेशिका माहितीपत्रक 
१. बालकाचे व मातापित्यांचे  अ) संपूर्ण नाव,  ब) पत्ता,  क) ई-मेल,   ड) टेलिफोन नं., इ) मोबाईल नं.
२. माता-पित्याची जन्मतारीख व लग्नाची तारीख
३. माता-पित्याचे शिक्षण 
४. बालकाची जन्मतारीख, जन्मस्थळ व जन्मवेळ
५. अर्जाबरोबर माता-पिता व बालकाचे फोटो पाठवावे.
६. बालकाचा जन्म कितव्या आठवड्यात झाला? प्रसूतीचा प्रकार- नैसर्गिक का सीझर? सीझर झाले असल्यास कारण
७. जन्मतःच बालकाचे वजन व काही विशेष गुण 
८. गर्भधारणेपूर्वी माता-पित्यांनी कोणती काळजी घेतली व काय संस्कार केले?
९. गर्भधारणेच्या नऊ महिन्यांमध्ये कोणकोणते संस्कार केले व आहारात बदल, योगासने वगैरे काय काळजी घेतली?
१०. डोहाळे कुठल्या प्रकारचे होते? काही डोहाळे कडक होते का?
११. गर्भारपणात कोणती औषधे घेतली, कोणती ‘संतुलन उत्पादने’ घेतली?
१२. गर्भारपणात श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे ‘गर्भसंस्कार’ संगीत ऐकले होते का? 
१३. गर्भारपणात आईला काही विशेष अनुभव आले का?
१४. अपत्यामध्ये दिसलेले प्रगतीचे टप्पे व विशेष गुण (माईल स्टोन) यांची सविस्तर माहिती म्हणजे महिन्याप्रमाणे असलेले प्रगतीचे टप्पे उदा. टक लावून पाहणे, कुशीवर होणे, आई-बाबांना ओळखणे, पालथे पडणे, दात येणे, रांगणे, चालणे वगैरेंची माहिती द्यावी. 
१५. जन्मानंतर बाळाला ‘सुवर्णप्राशन संस्कार’ केला होता का? 
१६. बाळ-बाळंतिणीची काय काळजी घेतली? 
१७. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातील मार्गदर्शनाचा कितपत उपयोग करून घेतला?
१८. अपत्याच्या प्रगतीच्या टप्प्यांचे पुरावे म्हणून फोटो किंवा व्हिडिओ क्‍लिप्स असल्या तर त्याची सीडी, फोटो वगैरे पाठवावे. १९. ई-मेलने माहिती पाठवली, तरी अर्जाची हार्ड कॉपी (पेपरकॉपी) व फोटो अवश्‍य पाठवावे.

प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख - १० जून २०१९
कृपया नोंद घ्यावी - अपुरी माहिती अथवा माता-पिता व बालकाचे फोटो नसलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. व्हिडिओ सीडी पाठवली तरी फोटो नक्की पाठवावेत. गेल्या वर्षी भाग घेतलेल्यांना पुन्हा या वर्षी भाग घेता येणार नाही.
* तारखेत बदल झाल्यास तसे जाहीर केले जाईल.

माहिती पाठविण्याचा पत्ता
१. संतुलन आयुर्वेद, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५, दू. क्र. ०२११४ २८२२३२ / २८२१५२, ९६८९९२६००२ 
    इ मेल - atma@santulan.in
२. संतुलन आयुर्वेद, ११७०/ ५, कार्तिक चेंबर्स, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५   दू. क्र. ०२० ६५०० २३८९
३. संतुलन आयुर्वेद, १ ज्योती कुटिर, आदर्श लेन, मालाड (प.), मुंबई ४०० ०६४ दू. क्र.०२२ २८६३७७७९ 
४. संतुलन आयुर्वेद, चित्रबोध अपार्टमेंट, सीबल डिलक्‍स हॉटेलजवळ, नाशिक ४२२ ००५, दू. क्र. ०२५३ २३१९१५१ 
५. संतुलन आयुर्वेद, सकाळ पेपर्स बिल्डिंग, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर ४१६ ००८, दू. क्र. २३१ २६५२२९१