आरोग्य टिप्स

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 June 2018

पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी
सतत बदलते हवामान, वातावरणातील कोंदटपणा यामुळे पावसाळ्यात आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. ते टाळायचे असेल तर भरपूर पाणी प्या, वनौषधीयुक्त चहा, जिवाणूविरोधी गुणधर्म असलेली औषधे आवर्जून घ्या. नियमित सकस, ताजे आणि शक्‍यतो गरम आणि पचायला हलके जेवण घ्या. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.

  • आहार पचनास हलका असावा.
  • हरभराडाळ, उडीदडाळ यांचे पदार्थ नकोत.
  • उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.
  • पावसाळ्यात थंड व दमट वातावरणामुळे सर्दी, खोकला, दमा, संधिशूल (सांधेदुखी), पोट बिघडणे अशा छोट्या मोठ्या तक्रारी उद्‌भवतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन चिकित्सा करून घेणे आवश्‍यक आहे.
  • सर्दी झाल्यावर प्रथम करायचा साधा उपाय म्हणजे गरम पाणी प्यावे.
  • गरम तव्यावर कापड गरम करून कपाळ, कानशील शेकावे. डोक्‍याला रुमाल बांधल्यामुळे सर्दीमुळे दुखणारे डोके किंवा जडपणा कमी होतो. 
  • बऱ्याचदा कपडे विशेषतः अंतर्वस्त्रे ओलसर असलेली घातली जातात. त्यामुळे जांघेमध्ये, जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी खाज येते, आग होते. हे टाळण्यासाठी वाळलेले, कोरडे कपडे घालावेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Tips