#FamilyDoctor तारुण्यपीटिकांनी हैराण? आहाराकडे लक्ष द्या!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 August 2018

महिला असो किंवा पुरुष आजकाल ‘पिंपल्स’ अनेकांच्या सौंदर्यात बाधा ठरत आहे. यावर अनेक महागडी सौंदर्यप्रसाधने वापरूनही हवा तसा परिणाम मिळत नाही. चेहऱ्यावर पुटकुळ्या आणि काळे ठिपके नकोसे असतात. तुम्ही आहाराची नीट निवड केली तर ‘पिंपल्स’वर नियंत्रण मिळवणे शक्‍य आहे. 

आपल्या आहाराचा नकळतपणे आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. पचनतंत्रातील बिघाड ‘पिंपल्स’च्या समस्येचे एक मोठे कारण आहे. यापासून सुटका मिळवायची असेल तर आहाराबाबत दक्ष असायलाच हवे. पुढील टिप्स फॉलो करा आणि मिळवा पिंपल्सवर नियंत्रण.

हे खाणे टाळा 
आहारात ग्लुटेन युक्त आहाराचा समावेश करणे टाळा. तो शरीरात जळजळ निर्माण करतो. पोटात आणि घशात जळजळ होण्याची समस्या असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करा. साखरेऐवजी मधासारख्या पर्यायाचा वापर करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. 

काय हवे आहारात?
गाजर, पालक, व्हेजिटेबल सूप, पपई, खरबुज, शिमला मिरची यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. यामुळे त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या त्वचेसाठी आवश्‍यक जीवनसत्त्वेही यातून मिळतील.

जेवणात फायबर असलेला आहार घ्या.  
मांसाहारी असाल तर, चिकन, अंडी, मासे यांसारख्या प्रोटीन देणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे शर्करेची पातळी संतुलित होण्यास मदत होईल. दही, मठ्ठा, ताक नियमित घेण्यास सुरुवात करा. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Tips Pay attention to diet