अतिपोषणही घातकच!

Highly nutritious is dangerous
Highly nutritious is dangerous

पोषण हे वाईटच, पण अतिपोषणही तितकेच घातक आहे. गुटगुटीत असण्यापेक्षा सुटसुटीत असण्याला प्राधान्य द्यायला हवे. 
 

एकीकडे कुपोषणामुळे होणारा मृत्यू, तर दुसरीकडे अतिपोषणामुळे तरुण वयातच आजारांचे वाढत चाललेले प्रमाण हे बदलते चित्र समोर येऊ लागले आहे. बदलत्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्यामुळे कमी वयातच हृदयविकार, मधुमेह असे आजार वाढत सर्वच स्तरांमध्ये याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पुरेसा पोषक आहार न मिळाल्याने कुषोषणाचे शिकार ठरले आहेत, तर दुसरीकडे जंक फूडचे वाढत्या सेवनामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. 

अतिपोषणामुळे वाढतोय लठ्ठपणा 
अति प्रमाणात कॅलरीचे सेवन केल्याने लठ्ठपणाशी संबंधीत समस्या उद्भवतात. लठ्ठपणामुळे अनेक रोग होण्याची शक्यता वाढते. हृदयरोग आणि धमन्यांचे आजार, मधुमेह असे विविध आजार जडतात. लठ्ठपणासारख्या आजारावर मात करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. एकीकडे त्यांना पुरेसा पोषक आहार मिळत नसताना, दुसरीकडे शहरी भागात फास्टफूडचे प्रमाण वाढल्याने तरुण वयातच जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. 

अतिपोषणापासून वाचवायचे असेल तर संतुलित आहाराचे सेवन करा आणि जीवनशैलीत अचूक बदल करा, असे सुचवावेसे वाटते. 
- रेस्टॉरंट्समध्ये उच्च-कॅलरीयुक्त जेवण दिले जाते, ज्यामुळे वजन वाढणे किंवा लठ्ठपणा होऊ शकतो. म्हणूनच अशा खाण्याच्या सवयींपासून दूर राहणे गरजेचे असून निरोगी जीवनशैली अमलात आणणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, सूप आणि ग्रील्ड फिश असे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये खायला हरकत नाही, ज्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फॅट्सदेखील कमी असतात. बैठी जीवनशैली असणाऱ्यांनीदेखील वेळात वेळ काढून शारीरिक हालचाली आणि व्यायामाकडे लक्ष द्या. 

- प्रत्येक घास चावून चावून सावकाश खा. भूक नसताना खाल्ल्यास तसेच अधिक प्रमाणात खाणे हे देखील आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठल्यामुळे लठ्ठपणाचा शिकारी होऊ शकतो. म्हणून, हे पहा की जेव्हा तुम्हाला खरोखरच भूक लागली असेल तरच तुम्ही खा. 

- जंक फूड, फास्ट फूडचे सेवन करू नका. जर आपण आपल्या घरात अस्वास्थ्यकर अन्न साठवले तर आपण हे सर्व चुकीचे करीत आहात! जंक फूडने वजन वाढते. त्यामुळे त्यापासून लांब राहणे आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारात ताजी फळे तसेच पालेभाज्यांचा समावेश असावा. बेकरीचे पदार्थ, मैदायुक्त पदार्थ टाळणे योग्य आहे. बाहेर जे पदार्थ खातो त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांना संतुलित आहार द्या. 

- अन्नाचे गरजेपेक्षा जास्त सेवन करू नका. आपल्याला दररोज किती आहार घ्यावा, याबद्दल आहार तज्ज्ञांशी चर्चा करा. अति खाणे टाळण्यासाठी लहान प्लेट वापरा. आपण एखाद्या पार्टीत जात असल्यास आपण काय खावे हे आपण स्वतः ठरवावे आणि त्यामध्ये कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. संतुलित आहाराची निवड करा ते आपल्याला लठ्ठपणा दूर ठेवण्यास मदत करेल. 

आपल्या तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही क्रॅश डाएटचे अनुसरण करू नका. अतिरिक्त आहाराचा मारा न करता आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. संतुलित आहार आणि व्यायाम आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यात नक्कीच फायदेशीर ठरते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com