संसर्गजन्य रोग

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 8 February 2019

वातावरणात फार मोठा बदल हा सहसा या रोगांना पोषक असतो म्हणजे दिवसा ऊन, रात्री कडक थंडी किंवा उष्णता व दमटपणा यांचे एकत्रीकरण हे या सूक्ष्म जीवजंतू फोफावण्यास साहायक ठरते. याशिवाय प्रतिकारशक्‍ती, वाढता ताण, अनैसर्गिक व्यवहार, अशक्‍त धातू, मंदावलेला अग्नी, अशुद्धता या गोष्टी संसर्गज, उपसर्गज रोगांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. इतर कोणत्याही रोगाप्रमाणे हे रोग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे सर्वांत चांगले असते. 

वातावरणात फार मोठा बदल हा सहसा या रोगांना पोषक असतो म्हणजे दिवसा ऊन, रात्री कडक थंडी किंवा उष्णता व दमटपणा यांचे एकत्रीकरण हे या सूक्ष्म जीवजंतू फोफावण्यास साहायक ठरते. याशिवाय प्रतिकारशक्‍ती, वाढता ताण, अनैसर्गिक व्यवहार, अशक्‍त धातू, मंदावलेला अग्नी, अशुद्धता या गोष्टी संसर्गज, उपसर्गज रोगांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. इतर कोणत्याही रोगाप्रमाणे हे रोग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे सर्वांत चांगले असते. 

‘जंतुसंसर्ग’ किंवा ‘इन्फेक्‍शन’ हा शब्द सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. याचे कारण असे की खरोखरच जगात सर्वदूर नवीन नवीन नवीन प्रकारचे जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण वाढते आहे. या जंतूंचे नाव सहसा निरनिराळे असते. तो पहिल्यांदा कुठे सापडला, तो कसा पसरतो, त्याची लक्षणे काय असतात याची माहिती मिळू शकते. मात्र त्यावर निश्‍चित असा इलाज सहसा नसतो. चिकनगुनिया, इबोला, झिका, निपाह, स्वाईन फ्लू, अशी बरीचशी नावे आपण ऐकत असतो, वाचत असतो. नेमके उपचार नसल्याने या प्रकारच्या संसर्गाची सर्वांनाच धास्ती असते. आणि मग मनात प्रश्न येतो, आयुर्वेदात यासारख्या रोगांबद्दल काही सांगितले आहे का? 

उपसर्गज आणि संसर्गज असे रोगांचे मुख्य दोन प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत. हे दोन्ही एका व्यक्‍तीकडून दुसऱ्या व्यक्‍तीकडे संक्रामित होत असतात. 

उपसर्गजा ज्वरादिरोगपीडितजनसंपर्काद्‌ भवन्ति, संसर्गजाश्‍च देवादिद्रोहकजनसंपर्कात्‌ भवन्ति ।

... सुश्रुतसंहिता डल्हण टीका

ज्वरादी रोग झालेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आल्याने जे रोग होतात ते उपसर्गज रोग होत; तर देव, गुरु वगैरे पूज्य व्यक्‍तींचा अनादर करणाऱ्या व्यक्‍तींच्या संपर्कात राहण्याने जे रोग होतात, ते संसर्गज होत. 

उपसर्गज रोगांनाच आयुर्वेदात औपसर्गिक रोग असेही म्हटलेले आहे. औपसर्गिक रोगांची उदाहरणे सुश्रुतसंहितेत याप्रमाणे दिलेली आहेत,

कुष्ठं ज्वरश्‍च शोषश्‍च नेत्राभिष्यंद एव च ।
औपसर्गिकरोगाश्‍च संक्रामन्ति नरान्नरम्‌ ।।
...सुश्रुत निदानस्थान

त्वचारोग, ताप, शोष (क्षयरोग), डोळे येणे वगैरे रोग एका व्यक्‍तीकडून दुसऱ्या व्यक्‍तीकडे संक्रमित होत असल्याने ते औपसर्गिक होत.

 वारंवार शरीरस्पर्श होण्याने, रुग्ण व्यक्‍तीच्या निःश्वासाच्या संपर्कात येण्याने, सहभोजन करण्याने, एका शय्येवर झोपण्याने, एका आसनावर बसण्याने, दुसऱ्या व्यक्‍तीचे कपडे, माळा, लेप वगैरे गोष्टी धारण करण्याने, रोगग्रस्त व्यक्‍तीसह मैथुन करण्याने असे रोग संक्रमित होऊ शकतात.

संसर्गज रोगाचे निदान म्हणजे नेमके कारण समजणे त्यामानाने अवघड असते. कित्येकदा कारण समजते, पण उपचार माहिती नसतात किंवा केलेल्या उपचारांचा नेमका किती व कधी उपयोग होईल हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. आधुनिक विज्ञानात जीवाणू, विषाणू सांगितले आहेत त्यापैकी विषाणू म्हणजे प्रत्येक वेळा वेगळे रूप धारण करून येणाऱ्या सूक्ष्म जंतूंना आयुर्वेदात राक्षस, भूत, पिशाच वगैरे शब्दात वर्णन केलेले आहे असे म्हणता येते. उपसर्गज रोगांच्या लक्षणांची व्याप्ती फार मोठी असते. 

घसादुखी, सर्दी, डोळे येणे, अशा साध्या त्रासांपासून ते ताप येणे (फ्लू, मलेरिया, टायफॉइड  वगैरे विविध रोग यात अंतर्भूत होतात), कांजिण्या, प्लेग, विशिष्ट प्रकारची कावीळ, कॉलरा, पोलिओ असे अनेक संसर्गजन्य रोग असतात. चिकन गुनिया, मॅड काऊ डिसीझ, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू वगैरे रोगही संसर्गजन्य असतात. मनुष्याप्रमाणे प्राण्यांना, वनस्पतींनासुद्धा अशाप्रकारे काही विशिष्ट संसर्ग होऊ शकतात

वातावरणात फार मोठा बदल हा सहसा या रोगांना पोषक असतो म्हणजे दिवसा ऊन, रात्री कडक थंडी किंवा उष्णता व दमटपणा यांचे एकत्रीकरण हे या सूक्ष्म जीवजंतू फोफावण्यास साहायक ठरते. याशिवाय प्रतिकारशक्‍ती, वाढता ताण, अनैसर्गिक व्यवहार, अशक्‍त धातू, मंदावलेला अग्नी, अशुद्धता या गोष्टी संसर्गज, उपसर्गज रोगांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. इतर कोणत्याही रोगाप्रमाणे हे रोग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे सर्वांत चांगले असते. या दृष्टीने पुढील उपाय सुचवता येतील. 

 पिण्याचे पाणी गाळून घेतलेले तर असावेच, पण पंधरा-वीस मिनिटांसाठी व्यवस्थित उकळलेले असावे. पाणी उकळताना त्यात वाळा, चंदनासारखी सुगंधी द्रव्ये टाकल्यास ते अधिक निर्जंतुक होण्यास हातभार लागतो.   शिळे, उघडे राहिलेले पाणी पिणे टाळणे. 

 घरामध्ये, शक्‍य असल्यास घराच्या आसपासही धूप करणे. घरात सकाळ, संध्याकाळ देवासमोर दिवा लावणे, सुगंधी फूल वाहून उदबत्ती लावणे ही प्रथा धार्मिक वा अध्यात्मिक स्वरूपाची वाटली तरी यामागे वातावरण शुद्ध होणे, आसमंतातील जीवजंतूंचा व दुष्ट शक्‍तींचा नाश होणे हाही उद्देश असतो. हा उद्देश सफल होण्यासाठी खऱ्या साजूक तुपाचा दिवा, नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेली उदबत्ती जाळायला हवी. तीक्ष्ण रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या अनैसर्गिक सुगंधी उदबत्त्यांमुळे जीवजंतूंचा, साथीच्या रोगांचा प्रतिबंध होणे तर दूरच, उलट शिंका वा दम्याचा त्रासही होऊ शकतो. पेटत्या निखाऱ्यावर गुग्गुळ, लाख, कापूर, कडुनिंब, वेखंड वगैरे द्रव्ये किंवा अनेक उत्तमोत्तम जंतुनाशक वनस्पतीद्रव्यांपासून तयार केलेले ‘संतुलन प्युरिफायर’ धूप मिश्रण जाळणेही उत्तम होय.

तुळस, कडुनिंब वगैरे झाडे घराच्या आसपास लावण्याने वातावरण शुद्ध राहून संक्रमणापासून दूर राहणे शक्‍य होते.  

अन्न हेही अत्यंत संवेदनशील असते. उघड्यावरचे, नीट स्वच्छता न ठेवता बनविलेले अन्न खाणे म्हणजे साथीच्या रोगांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

कपडे स्वच्छ, नीट धुतलेले, नीट वाळलेले असावेत. दमट कपडे घातल्याने, कुबट वास येणारे कपडे घातल्याने शरीराला जंतुसंसर्ग सहज होऊ शकतो. 

बाहेरून घरात आल्यावर हात-पाय अवश्‍य धुवावेत. बूट, चपला घातलेल्या असल्या तरी पायांवर पाणी अवश्‍य घ्यायला हवे. खाण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवायला हवेत. 

स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात नीट स्वच्छता पाळायला हवी. बाळंतपणानंतरही धुरी वगैरे नियमित घ्यायला हवी. अशा अवस्थेत साथीच्या रोगांचा त्रास लवकर होऊ शकतो.

वातशामक सुगंधी द्रव्यांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे, सुगंधी, जंतुनाशक द्रव्यांपासून बनविलेल्या उटण्याने अंघोळ करणे, अंघोळीनंतर सुगंधी उटी लावणे या आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे जंतुसंरक्षक कवचच असते. साथीचे होऊ नयेत व फैलावू नयेत यासाठी वैयक्‍तिक पातळीवर हे उपाय योजणे उत्तम होय.

असे संसर्गजन्य रोग पसरू नयेत, आसमंतातील विषद्रव्यांचा नाश व्हावा यासाठी आयुर्वेदात विशिष्ट अगद तयार करायला सांगितले आहेत. हे अगद सेवन करण्यास तर उत्तम असतातच, पण गावातील नगारे, पताका, तोरणे वगैरेंवर यांचा लेप लावावा असे सांगितले आहे. 

अनेन दुन्दुभिं लिम्पेत्‌ पताकां तोरणानि च ।
श्रवणाद्दर्शनाद्‌ स्पर्शात्‌ विषात्‌ संप्रातमुच्यते ।।

लेप लावून नगारा वाजवला की त्याच्या नादामार्फत, लेपयुक्‍त पताकांच्या नुसत्या दर्शनाने आणि लेप लावलेल्या तोरणांच्या स्पर्शाने विषद्रव्य नष्ट होतात असे सुश्रुत संहितेत सांगितलेले आहे. क्षारागद नावाचा अगद धावडा, राळ, शिरीष, तिनिश, पळस, कडुनिंब, पाटला, पांगारा, आम्र, उंबर, मदनफळ, अर्जुन, श्‍लेष्मातक, अंकोळ, आवळा, बहावा, कूटज, शमी, कवठ, आपटा, रुई, करंज, निवडुंग, बिब्बा, टेंटू, ज्येष्ठमध, शेवगा, साग, मूर्वा, भूर्जवृक्ष, लोध्र, कोकिलाक्ष, खैर या वृक्षांच्या क्षारापासून, सुवर्ण वगैरे सप्तधातूंच्या भस्मांपासून व पिपळमूळ, तांदुळजा, दालचिनी, पुत्रंजीवी, हळद, वेखंड वगैरे वनस्पती चूर्णांपासून क्षारपाक विधीने सिद्ध करून तयार केलेला असतो. काही विशिष्ट अगद (विषनाशक, जंतुनाशक द्रव्यांपासून बनविलेला योग) उदा. महागन्धहस्ती अगद नुसता घरात ठेवण्याने दुष्ट जीवजंतूंचा प्रवेश होण्यास प्रतिबंध होतो असेही संदर्भ आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतात. 

रोगाची साथ आली की रोगग्रस्त व्यक्‍तीला तर औषध घेणे भाग असतेच, तसेच रोग होऊ नये म्हणून इतरांनाही प्रतिबंधात्मक औषधे घेता येतात. उदा. डोळे येण्याची साथ येते तेव्हा त्रास होण्याअगोदरच डोळे त्रिफळ्याच्या पाण्याने धुता येतात. सकाळ संध्याकाळ डोळ्यांवर गार पाण्याचे हबके मारता येतात. डोळ्यांची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने त्रिफळा-मध-तुपाचे मिश्रण घेण्याचाही फायदा होतो. सर्दी-ताप वगैरेची साथ असेल तर सितोपलादीसारखे चूर्ण अगोदरपासून घेता येते; तुळशी, गवती चहा, आले, पुदिना वगैरे द्रव्यांपासून बनवलेला काढा घेता येतो. जुलाबाची साथ आली असताना जेवणापूर्वी आल्या-लिंबाचा रस घेता येतो, संजीवनी गुटी, लवणभास्कर चूर्ण, कुटजघनवटी वगैरे औषधी योगांनी पचनसंस्थेची प्रतिकारशक्‍ती वाढवता येते. 

स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी...
सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी स्वाइन फ्लूची लागण झालेली समजते. यावर प्रतिबंधात्मक म्हणून आणि निदान झालेले असले तरी इतर उपचारांच्या बरोबरीने पुढील काढा करून घेता येतो. गुळवेल, सुंठ, पर्पटक, काडेचिराइत, बृहती, कंटकारी, धणे, हळद व तुळस या नऊ गोष्टी समप्रमाणात एकत्र करून ठेवाव्या. यातील २५ ग्रॅम मिश्रणात चार कप पाणी टाकून ते अर्धा कप उरेपर्यंत उकळावे व गाळून घेऊन तयार झालेला काढा घ्यावा. प्रतिबंधात्मक म्हणून काढा घ्यायचा असला तर तो निम्म्या प्रमाणात घ्यावा व दिवसातून एकदा घ्यावा. मात्र रोगाचे निदान झाले असेल तर पूर्ण प्रमाणात व दिवसातून दोनदा घ्यावा. अशा प्रकारे संसर्गजन्य रोग होऊ नयेत म्हणून काळजी घेणे सर्वांत चांगले, तरीही तब्येतीकडे लक्ष ठेवणे, वेळेवर निदान करून योग्य उपचार घेणे, इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी दक्ष राहणे हे उत्तम होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infectious diseases