प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

question answer
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मला बरेच दिवस पित्ताचा त्रास होतो आहे. संतुलनची पित्तशांती गोळी घेतल्यावर बराच फरक पडतो. पण जराही जागरण झाले किंवा जेवणाला उशीर झाला तर डोके चढते, उलट्या होऊ लागतात. मी काय करू शकते, यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.

- श्रीमती तृप्ती पाटील, डोंबिवली

उत्तर : पित्त वाढल्यास अशा प्रकारचे त्रास होणे स्वाभाविक असते. जागरण, चुकीचा आहार टाळणे इष्टच असते. संतुलनच्या पित्तशांती गोळ्या घेत आहात हे चांगलेच आहे. फार त्रास झाल्यास याच गोळ्या बारीक करून साय-साखरेत मिसळून घेतल्यास अधिक फायदा होताना दिसेल. अशा प्रकारच्या त्रासात संतुलन अविपत्तिकर चूर्ण सकाळ-संध्याकाळ घेतल्याचा फायदा होताना दिसतो. पोट साफ होत नसल्यास रात्रीच्या जेवणानंतर सॅनकूल चूर्णाचा उपयोग होऊ शकेल. बाहेरचे जेवण, आंबवलेले पदार्थ, जड कडधान्ये वगैरे आहार निदान रात्रीच्या वेळी घेणे टाळणे इष्ट. सिमला मिरची, बेबी कॉर्न, चीज वगैरे सध्या लोकप्रिय झालेल्या पित्तकारक गोष्टी टाळणे हितकर. असा प्रकारच्या त्रासांमध्ये वयाच्या हिशोबाने संतुलन पंचकर्म करवून घेतल्यास उत्तम परिणाम होताना दिसतो, अँटासिड्स, वेदनाशामक गोळ्या घेण्यातून सुटका होते. डोके दुखणे सुरू होणार आहे असे वाटल्यास संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल हलक्या हाताने डोक्याला चोळल्यास डोकेदुखीला प्रतिबंध होऊ शकेल.

माझी मुलगी १४ वर्षांची आहे, तिच्या डोक्यात सतत खाज येते. तिच्या डोक्यात कोंडा, उवा, लिखा काहीही नाही. डोके लाल वगैरे दिसत नाही. तिची अन्नावरची वासनापण गेलेली आहे. यासाठी काय करता येईल?

- सौ. आशा गोठे, सांगली

उत्तर : शरीरात पित्त वाढल्यास अशा प्रकारचे त्रास होताना दिसतात. अशा वेळी पित्तशामक उपाय करण्याचा उपयोग होतो. रोज धणे-जिऱ्याचे पाणी देण्याचा उपयोग होईल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ २-२ संतुलन पित्तशांती या गोळ्या देण्यानेही पित्त कमी व्हायला मदत मिळू शकेल. संतुलनचे स्त्री संतुलन कल्प कपभर दुधात घालून सकाळ-संध्याकाळ देणे, तसेच सॅनरोझसारखे रसायन देणे उत्तम ठरेल. केस धुण्याआधी आठवड्यातून १-२ वेळा कोरफडीच्या ताज्या गरात संतुलन पित्त हेअर पॅक मिसळून लावण्याचा तसेत संतुलन व्हिलेज हेअर तेल हलक्या हाताने केसांच्या मुळाशी चोळून लावण्याचा उपयोग होईल.

loading image
go to top