प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurvediy Garbhasanskar
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मी संतुलनच्या गर्भसंस्कार पुस्तकानुसार सुरुवातीपासून काळजी घेतली आहे व याचा मला व माझ्या बाळाला खूप छान उपयोग झाला आहे. सध्या माझे बाळ सात महिन्यांचे आहे. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्याला ब्रह्मलीन घृत देऊ इच्छिते. ते किती प्रमाणात व कसे द्यावे हे कृपया कळवावे ही विनंती.....

- राधिका गावडे

उत्तर - गर्भसंस्कार करण्याचा फायदा झाला हे कळविल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाच वर्षांपर्यंत बालकांच्या मेंदूचा, बुद्धीचा अतिशय झपाट्याने विकास होत असतो. या दृष्टीने त्यांना ब्रह्मलीन घृत देणे उत्तम असते. अगदी तान्ह्या बाळाला बाळगुटीसह १-२ थेंब इतक्या प्रमाणात हे घृत देता येते. दर दोन महिन्यांनी २-२ थेंब मात्रा वाढवत नेता येते. त्यामुळे सात महिन्यांच्या बाळाला एक अष्टमांश चमचा, वर्षाच्या बाळाला पाव चमचा अशा क्रमाने पाचव्या वर्षापर्यंत अर्धा चमचा या प्रमाणात ब्रह्मलीन घृत देण्याचा फायदा होताना दिसतो. सोबत संतुलन बालामृत, बेबी मसाज तेल, सॅन अंजन (ब्लॅक) वगैरेंचा वापर करणेही उत्तम.

loading image
go to top