esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Turmeric

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझी नात तीन वर्षांची आहे. पावसाळ्यात तिला ॲलर्जिक खोकला व सर्दी सुरू झाली आहे, नाक सतत चोंदते. थंड पेये, आइस्क्रीम, चॉकलेट खाल्ल्यास त्रास वाढतो. पण ती ऐकत नाही. आत्तापर्यंत तीन वेळा डॉक्टरांकडे घेऊन गेलो पण फरक पडत नाही. कृपया मार्गदर्शन करावे..

- सौ. वैशाली तुपे

उत्तर – लहान मुलांच्या श्र्वसनसंस्थेची काळजी घेणे व व्यवस्थित उपचार करणे अत्यंत आवश्यक असते. आले, गवती चहा, तुळशीची २-३ पाने, खडीसाखर घालून तयार केलेले हर्बल टी सारखे पेय देणे फायदेशीर ठरेल. हळदीचे दूध देण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो. हळदीचे दूध कसे करावे याची प्रक्रिया खालील दिलेल्या लिंकमध्ये आहे. त्याचबरोबर सकाळ-संध्याकाळ संतुलन सितोपलादी चूर्ण मधात मिसळून देणे, अर्धा अर्धा चमचा च्यवनप्राश तसेच सॅनरोझ सारखे रसायन देणेही उत्तम ठरेल. थंड पेये, आइस्क्रीम वगैरे खाल्ल्याने अशा प्रकारचे त्रास नेहमीच वाढतात, परंतु तिला न रागावता प्रेमाने समजवावे. तसेच, काही चुकीचा पदार्थ खाल्ल्यास निदान दोन घोट गरम पाणी नक्की प्यायला द्यावे. इतर वेळी सुद्धा गरम किंवा किमान कोमट पाणी प्यायला दिलेले चांगले. दिवसातून २-३ वेळा नस्यसॅनसारख्या घृत्याचे १-२ थेंब नाकात टाकण्याचाही उपयोग होताना दिसतो.

माझे बाळ तीन महिन्यांचे आहे. तो बालामृत फार आवडीने घेतो आणि त्याचा उत्तम परिणाम दिसतो आहे. संतुलनची बाळगुटी सुरू करायची आहे, तर ती कुठल्या वेळी देऊ? बालामृत व बाळगुटी यांमध्ये किती वेळ अंतर ठेवायला हवे?- सौ. प्रिया अमृते

उत्तर – बाळाला बालामृत आवडते ही चांगली गोष्ट आहे. अशा रसायनाचे उत्तम परिणाम नेहमीच संतुलनमध्ये येणाऱ्या बाळांमध्ये दिसतात. बालामृत हे रसायन वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत देणे योग्य ठरते. बाळाला बाळगुटी जन्मानंतर ७ - १० व्या दिवसानंतर सुरू करता येते. तेव्हा आपण आपल्या बाळाला बाळगुटी लगेचच सुरू करावी. त्याचीही बाळाच्या पचनासाठी, त्याच्या एकूण वाढीस व प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होताना दिसते. बाळगुटी वर्ष-सव्वावर्ष सुरू ठेवावी. वेळेचे तसे बंधन नाही पण साधारण सकाळच्या वेळी बालामृत मधात मिसळून चाटवावे व त्यानंतर बाळगुटी आईच्या दुधात वा मधात मिसळून द्यावी. जमल्यास बाळगुटी परत संध्याकाळी दिली तरी चालते. बालामृत व बाळगुटी यामध्ये वेळेचे अंतर ठेवायची गरज नसते, परंतु दोन्हींचे मिश्रण करून एकत्र देऊ नये.

loading image
go to top