

माझी मुलगी अमेरिकेत राहते. तिला आपल्या गर्भसंस्कार पुस्तकाचा खूप उपयोग झाला. तिचा मुलगा चार महिन्यांचा आहे.
माझी मुलगी अमेरिकेत राहते. तिला आपल्या गर्भसंस्कार पुस्तकाचा खूप उपयोग झाला. तिचा मुलगा चार महिन्यांचा आहे. सध्या बालामृत, बाळगुटी वगैरे सर्व औषधे सुरू आहेत. बाळाची तब्येतही उत्तम आहे. बालामृत किती दिवस द्यावे आणि कधीतरी सर्दी-खोकला झाला तर इतक्या छोट्या बाळाला कोणते औषध देता येते? कृपया मार्गदर्शन करावे. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे खूप आभार.....
- स्नेहा राठोड
उत्तर : गर्भसंस्कारांचा उपयोग झाल्याचे कळवल्याबद्दल आभार. बाळ पाच वर्षांच्या होईपर्यंत त्याला रोज एकदा चिमूटभर संतुलन बालामृत देणे उत्तम होय. यामुळे बाळाच्या एकंदर विकासाला हातभार लागतोच, बरोबरीने सुवर्णवर्ख, केशर यांच्यायोगे उत्तम बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता यांचाही लाभ होतो, प्रतिकारशक्ती उत्तम राहते आणि त्वचेवर, डोळ्यांमध्ये एक प्रकारची चमकही दिसते.
बाळगुटी दीड वर्षापर्यंत देणे चांगले. सर्दी-खोकला झाला तर लहान मुलांना सितोपलादी चूर्ण मधात मिसळून देण्याचा उपयोग होतो. ब्राँकोसॅन सिरपही देता येते. छातीत कफ जाणवत असला तर रुईच्या पानांनी किंवा ओव्याच्या पुरचुंडीने छाती-पाठीवर शेक करण्याचाही उत्तम उपयोग होताना दिसतो.
माझे वय ३० वर्षे आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून ‘फॅमिली डॉक्टर’चा अंक वाचतो. आम्हा सर्वांना यातील मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला आहे. महिन्यापूर्वी माझे पोट दुखत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली, त्यात पित्ताशयात खडे असल्याचे आढळले. कृपया यावर काही उपाय सुचवावा....
- अभिनव विश्वासराव
उत्तर : पित्ताशयात खडे हा सध्या मोठ्या प्रमाणावर आढळणारा विकार आहे. वेळी-अवेळी जेवणे, रात्रीची जागरणे, बाहेरचे खाणे, अन्नातून रासायनिक खते, रंग, प्रिझर्वेटिव्ह्ज पोटात जाणे अशी अनेक कारणे यामागे असतात. पित्ताशयात खडे असले तरी ते वाढू नयेत, त्यांच्यामुळे कोणताही समस्या किंवा त्रास होऊ नये आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते विरघळावेत यासाठी शरीरात पित्तदोष वाढणार नाही, साठून राहणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे.
या दृष्टीने दुपारचे जेवण १२ ते १च्या दरम्यान, संध्याकाळचे जेवण आठ-साडेआठच्या आत घेणे, आहारात ४-५ चमचे साजूक तूप घेणे; तळलेले, आंबवलेले, मसालेदार पदार्थ टाळणे आवश्यक. सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांती गोळ्या घेणे, झोपण्यापूर्वी अनविपत्तिकर वा सॅनकूल चूर्ण घेणे; १५ दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल तेल घेऊन पोट साफ करणे; पोटावर संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेलासारखे तेल लावणे हे उपाय योजण्याचा उपयोग होईल. आवळ्याच्या झाडाच्या पानांचे अर्धा-अर्धा चमचा चूर्ण सकाळ-संध्याकाळ घेण्यानेही पित्ताशयातील खडे विरघळतात असा अनुभव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.