esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Knee Problem

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझी मुलगी २० वर्षांची आहे. तिला मासिक पाळी वेळेवर येते, पण पहिल्या दोन दिवसात खूप पोट दुखते, वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. तिचा हा त्रास कमी करण्यासाठी काही उपाय सुचवाल का? मी आपली आभारी राहीन.

- सौ. राजश्री खाडे

उत्तर - सध्याच्या पिढीमध्ये हा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. मात्र, आयुर्वेदाच्या मदतीने अशा त्रासामध्ये उत्तम परिणाम बघायला मिळताना दिसतात. पाळीमध्ये पोट दुखते तेव्हा तसेच पाळीच्या अगोदर आठ दिवसांपासून ओटीपोटावर संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल लावणे व गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेणे यामुळे वातदोषाचे शमन होऊन त्रास कमी होण्यास मदत मिळेल. अशोक- ॲलो सॅन, मंजिष्ठासॅन गोळ्या घेण्याने तसेच जेवणांनंतर फेमिनाईन बॅलन्स आसव २-२ चमचे प्रमाणात घेण्यानेही बरे वाटेल. फुलपाखरू, संतुलन समर्पण, अनुलोम- विलोम यासारखी योगासने करण्यानेही स्त्रीसंतुलनाला उत्तम मदत मिळते आणि पाळीसंबंधातील त्रास बरे होतात असा अनुभव आहे.

माझे वय ६५ वर्षे आहे. मी सुरुवातीपासून फॅमिली डॉक्टरचा वाचक आहे. व त्यामुळे माझे आरोग्य व्यवस्थित आहे. कोणतीच ॲलोपॅथिक औषधे घ्यावी लागत नाहीत. आपले मनापासून धन्यवाद, गेल्या महिन्यापासून मला एकच त्रास होतो आहे तो असा, सकाळी उठल्यावर डाव्या पायाची टाच दुखते, जमिनीवर पाय टेकवता येत नाही. मात्र स्नान वगैरे होईपर्यंत दुखणे हळूहळू पूर्णपणे थांबते. कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री. सुधाकर डोईफोडे

उत्तर - फॅमिली डॉक्टरमधील मार्गदर्शनाचा उपयोग होत असल्याचे कळवल्याबद्दल आभार. थोडे दिवस पुढील उपचार केले तर तक्रारीमध्ये नक्की सुधारणा होईल. आयुर्वेदात यास वातकंटक म्हणजे वातामुळे टाचेमध्ये काटा टोचल्याप्रमाणे वेदना होणारा त्रास असे संबोधले आहे. तेव्हा वातसंतुलनासाठी संतुलनच्या वातबल गोळ्या, कॅल्सिसॅन गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. दोन मुठी वाळू किंवा समुद्रकाठावरची रेती कढईमध्ये गरम करावी. जाडसर सुती कापडात बांधून त्याची पुरचुंडी तयार करून टाच दुखते त्या ठिकाणी अगोदर संतुलन शांती सिद्ध तेल लावून वरून ५-७ मिनिटांसाठी शेक करावा. हा उपचार एक दिवसाआड या पद्धतीने केला तरी त्यामुळे उपयोग होईल.

loading image
go to top