प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

माझे वय १७ वर्षे आहे. मी १२वीच्या परीक्षेला बसतो आहे. आत्तापर्यंत माझे अभ्यासात मन लागायचे तसेच मला उत्साहही वाटायचा.

प्रश्नोत्तरे

माझे वय १७ वर्षे आहे. मी १२ वीच्या परीक्षेला बसतो आहे. आत्तापर्यंत माझे अभ्यासात मन लागायचे तसेच मला उत्साहही वाटायचा. गेले १-२ महिने माझा मूड चांगला नसतो, सतत थकवा व आळस असतो, सकाळी उठण्याची इच्छा नाही. असे का होत असावे? यासाठी मला काय करता येईल?

- अभिषेक जोशी

उत्तर - सध्याच्या शिक्षणपद्धतीत १२ वीचे वर्ष खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहेच, पण मी असे सांगू इच्छिते की १२वीत कमी गुण मिळाले तरी आयुष्यात फार मोठा फरक पडतोच असे नाही. अभ्यास करण्यासाठी मेंदूला पुरेसा आराम मिळणेही आवश्यक असते. यादृष्टीने मोबाइल, टीव्हीचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा. मेंदूला ताकद मिळण्याच्या दृष्टीने संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे, रोज रात्र भर पाण्यात भिजवलेले ४-५ बदाम, आक्रोड, मनुका खाणे, नाश्त्याच्या वेळी लोणी व खडीसाखर घेणे. संतुलन शतदाम कल्प टाकून सकाळ-संध्याकाळ दूध घेणे उत्तम. मेंदूला विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने स्पिरिट ऑफ हार्मनी, ॐकार गणेश, समृद्धी वगैरे स्वास्थसंगीत ऐकणे उत्तम. रोज सकाळी दीर्घश्र्वसन, प्राणायाम करण्याचा मेंदूला फायदा होत असतो. आठवड्यातून २-३ वेळ पादाभ्यंग करणे, तसेच रात्री झोपण्यापूर्वी नस्यसॅन सिद्ध घृत नाकात टाकावे. संतुलन च्यवनप्राश, मॅरोसॅन सारखे रसायन नियमितपणे घेण्याचा उपयोग होताना दिसेल. लक्षणे अचानक दिसायला लागली आहेत त्यादृष्टीने एकदा रक्ताची तपासणी करणे योग्य ठरेल, रक्तातील व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी३ ची पातळी ठीक आहे हे एकदा पाहणे श्रेयस्कर ठरेल.

माझे वय ५४ वर्षे आहे. गेल्या ४-५ वर्षांत मला २-३ वेळा मूतखड्याचा त्रास झाला आहे. दोन वेळा यासाठी शस्त्रकर्मही करून झालेले आहे. सध्या परत तसा त्रास सुरू झालेला आहे, पोटात दुखते आहे, कंबरेजवळ कळा येत आहेत. पुन्हा शस्त्रकर्म करण्याची इच्छा नाही. काय उपाय करता येईल का?

- श्री. अमित शहा, पुणे

उत्तर - मूतखड्याचा त्रास वारंवार होऊ नये यासाठी उपचार घेणे आवश्यक असते. फक्त शस्त्रक्रियेने मूतखडा काढून टाकण्याचा उपयोग होत नाही. मूतखडा बनविण्याची शरीराला लागलेली सवय बदलणे आवश्यक असते. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. जलसंतुलन घालून २० मिनिटे उकळलेले पाणी प्यायल्यास शरीरातील एकूण द्रवाचे संतुलन राहण्यास मदत मिळते. वृक्काचे कार्य नीट चालण्यासाठी तसेच मूतखडे होण्याची प्रवृत्ती कमी करण्याकरता आयुर्वेदात पुनर्नवा, वरुण, पाषाणभेद, कूष्मांड, कंटकारी वगैरे वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे. त्यादृष्टीने पुनर्नवासव, महावरुणादी काढा वगैरेंचा वैद्यांच्या सल्ल्याने योजना करावी. रात्रीचे जागरण टाळावे. आहारात द्रवपदार्थ जास्त प्रमाणात असावेत. आहारातून टोमॅटो, मुळा, कॉफी, एरिएटेड शीतपेये टाळावी. शक्य असल्यास संतुलन पंचकर्म करून घेणे उत्तम. त्यात असे उपचार असतात जे वृक्काचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात.

टॅग्स :Family Doctorhealth