esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Incense

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वातावरणाची शुद्धी व्हावी यासाठी घरात धूप करावा असे आपण नेहमी सांगता. मात्र माझ्या नातीला साधी उदबत्ती लावली तरी लगेच शिंका येतात, घसा लाल होतो. यामुळे आम्ही घरात धूप करू शकत नाही. धुपाला काही पर्याय आहे का?

- श्री. अशोक जावळे

उत्तर - उदबत्ती असो किंवा धूप, त्यातील सर्व घटकद्रव्ये १०० टक्के नैसर्गिक, शुद्ध असतील तर त्यामुळे शिंका, घसा लाल होणे वगैरे त्रास होत नाहीत. बहुतेक उदबत्त्या रासायनिक सुगंध टाकून बनविलेल्या असतात, त्यामुळे वातावरण शुद्ध होण्याऐवजी उलटा परिणाम होऊ शकतो. संतुलनमध्ये हवा शुद्ध करण्यासाठी प्युरिफायर धूप, बालकांच्या प्रतिकारशक्तीसाठी टेंडरनेस धूप, पूजेसाठी वरशिप धूप, यशासाठी व्हिक्टरी धूप, संपूर्ण परिवाराच्या रक्षणासाठी परिवार कवच धूप व सुरक्षा धूप बनवले जातात. शरीरातील चक्रांच्या अनुषंगाने उदबत्त्याही बनविल्या आहेत. या सर्व उदबत्त्या व धूप हे उत्तम प्रतीच्या, कोणताही भेसळ नसलेल्या, १०० टक्के नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेले असतात, त्यामुळे या उदबत्त्या व धूप वापरणे चांगले.

माझे वय २५ वर्षे आहे. लहानपणापासूनच माझी त्वचा संवेदनशील आहे. खोटे दागिने घातले की लगेच ॲलर्जी येते, कान चिडतो, गळ्यावर पुरळ येते. सध्या मी सोन्या-चांदीशिवाय काही घालत नाही. पण यामागे काय कारण असावे व यावर काही उपचार करता येतो का?

- सौ. स्नेहा खोब्रागडे

उत्तर - दागिने खऱ्या चांदी-सोन्याचे घालणेच श्रेयस्कर. मात्र या प्रकारे ॲलर्जी येणे हे रक्तामध्ये दोष असल्याचे निदर्शक आहे. हा दोष मुळापासून बरा करणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक होय. यादृष्टीने काही दिवस मंजिष्ठासॅन गोळ्या, संतुलन यू. सी. चूर्ण सकाळ-संध्याकाळ घेण्याचा उपयोग होईल. कपभर पाण्यात पाव चमचा अनंतमूळ चूर्ण टाकून, पाच मिनिटांसाठी उकळून गाळून घेऊन तयार झालेला चहा रोज एकदा घेण्याने रक्तशुद्धी होण्यास मदत मिळते. दूध व फळे, मुगाची खिचडी व दूध, खारे पदार्थ दुधासह खाणे वगैरे विरुद्घ आहार टाळणे चांगले. मोहरी, हिंग, कुळीथ, ढोबळी मिरची, गवार, वांगे, टोमॅटो, दही, चीज, पनीर, अंडी, मांसाहार वगैरे टाळणे हे सुद्धा चांगले.

loading image