प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 December 2019

मला असे विचारायचे आहे की, माझे बाळ दीड वर्षाचे आहे, पण त्याचे वजन कमी आहे. तो नीट जेवतो, पण त्याचे वजन कमीच राहते. सध्या त्याचे वजन साडेसहा किलो आहे. कृपया वजन वाढण्यासाठी काही मार्गदर्शन करावे. 
..... पवार 

मला असे विचारायचे आहे की, माझे बाळ दीड वर्षाचे आहे, पण त्याचे वजन कमी आहे. तो नीट जेवतो, पण त्याचे वजन कमीच राहते. सध्या त्याचे वजन साडेसहा किलो आहे. कृपया वजन वाढण्यासाठी काही मार्गदर्शन करावे. 
..... पवार 
   वयाच्या मानाने बाळाचे वजन कमी आहे हे खरे. खाल्लेले अंगी लागावे, पचनशक्‍ती सुधारावी यासाठी बाळाला अर्धा-अर्धा चमचा संतुलन बाल हर्बल सिरप देण्याचा फायदा होईल. अंगाला नियमित अभ्यंग करण्यानेही वजन वाढण्यास मदत मिळेल. बाळाला रोज एक भिजविलेला बदाम व पाव खारीक उगाळून तयार केलेले मिश्रण देण्याचा उपयोग होईल. आहारात साजूक तुपाचा अंतर्भाव करणे, संतुलन चैतन्य कल्प घालून दूध देणे हेसुद्धा चांगले. 

 

मी ज्येष्ठ नागरिक आहे. मी दै. 'सकाळ'ची 'फॅमिली डॉक्‍टर' पुरवणी नियमित वाचते. त्याचा मला खूप फायदा होतो. माझा प्रश्न असा आहे की, पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यात दोन चमचे तूप घेतले तरी उपयोग झाला नाही, तरीसुद्धा तूप नियमितपणे घेत राहावे का? का बरोबरीने अजून काही घ्यायला हवे? कृपया यावर उपाय सूचवावा. मी टॉनिक म्हणून च्यवनप्राश घेते, हे योग्य आहे का? 
..... उषा 
    च्यवनप्राश नियमित घेणे चांगले आहेच, फक्‍त तो शास्त्रशुद्ध पद्धतीने व उत्तम प्रतीच्या द्रव्यांपासून, ताज्या आवळ्यांपासून तयार केलेला असावा. कारण तेव्हाच च्यवनप्राशचा रसायन म्हणून उपयोग होताना दिसतो. पोटातील कोरडेपणा कमी होण्यासाठी काही दिवस नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दोन चमचे साजूक तूप व चिमूटभर मीठ मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र पोट साफ होण्यासाठी तेवढे पुरेसे नसेल तर एक-दोन चमचे अविपत्तिकर चूर्ण किंवा 'सॅनकूल' चूर्ण घेणे चांगले. यामुळे कोरडेपणा व उष्णता कमी झाली की मग आपोआप पोट साफ होऊ लागेल. पचनशक्‍ती सुधारण्यासाठी जेवणानंतर 'संतुलन अन्नयोग' गोळ्या घेणे हेसुद्धा चांगले. 

 

दर शुक्रवारी प्रसिद्ध होणारी 'सकाळ'ची 'फॅमिली डॉक्‍टर' पुरवणी नियमित वाचते. माझ्या तोंडात उजव्या बाजूच्या वरच्या हिरडीवर एक मांसाचा गोळा आला आहे. त्याचा मला काही त्रास होत नाही, परंतु यावर काही उपाय करता येईल का? तसेच माझ्या पोटऱ्या व कंबरसुद्धा खूप दुखते. कृपया उपाय सुचवावा. 
.... नीता 
    त्रास देत नसला तरी असे होण्यामागचे कारण, गाठीचे स्वरूप समजणे आवश्‍यक होय. यादृष्टीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, त्यांच्या सल्ल्याने आवश्‍यक त्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. बरोबरीने रोज सकाळी सुमुख तेलाचा गंडूष तोंडात धरून ठेवण्याचा उपाय सुरू करता येईल. पोटऱ्या व कंबर दुखते त्यावर नियमित तेल लावणे चांगले. या दृष्टीने अनुक्रमे 'संतुलन अभ्यंग सिद्ध तेल' व 'संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल' लावता येईल. संतुलन 'वातबल गोळ्या', दशमूलारिष्ट, 'मॅरोसॅन' हे वातशामक योग घेण्यानेही बरे वाटेल. ढोबळी मिरची, वांगे, गवार, वाटाणा, चवळी, चणे वगैरे वातूळ गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर. 

 

मी 'फॅमिली डॉक्‍टर'ची नियमित वाचक आहे. माझे वय 52 वर्षे आहे. माझे पाय खूप दुखतात व थकल्यासारखे वाटते. मला अंगावरून पांढरे जाण्याचाही त्रास आहे. मी मधून मधून पंचामृत घेते. पंचामृत कोणीही घेऊ शकते का? फेमिसॅन तेलाचा पिचू संध्याकाळी किंवा दिवसा वापरला तर चालतो का? कृपया मार्गदर्शन करावे. 
.... स्नेहा 
    अंगावरून जाणे थांबले की आपोआप थकवा व पाय दुखण्याची तक्रार दूर होईल. फेमिसॅन तेल नियमित वापरणे उत्तम होय. दिवसासुद्धा जेव्हा फारशी हालचाल करायची नसेल तेव्हा 'फेमिसॅन तेला'चा पिचू वापरण्यास हरकत नाही. बरोबरीने आठवड्यातून दोनदा शक्‍ती धुपाची धुरी खालून घेण्याचाही उपयोग होईल. काही दिवस अशोक ऍलो सॅन या गोळ्या तसेच अर्धा अर्धा चमचा पुष्यानुग चूर्ण मधात मिसळून घेण्याचा व वरून तांदळाचे धुवण घेण्याचाही उपयोग होईल. शतावरी कल्प घालून दूध, सकाळ-संध्याकाळ सॅन रोझ रसायन घेण्याचाही फायदा होईल. पंचामृत कोणीही घेऊ शकते. आपणही ते नियमित घेणे चांगले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe