प्रश्नोत्तरे

माझे वय ३५ वर्षे आहे. मला आठवड्यातून एकदा तरी पित्ताचा त्रास होतो. खूप डोके दुखते, ग्लानी आल्यासारखे होते, काही करायची इच्छा होत नाही, तसेत मानही खूप दुखते.
Sickness
SicknessSakal
Summary

माझे वय ३५ वर्षे आहे. मला आठवड्यातून एकदा तरी पित्ताचा त्रास होतो. खूप डोके दुखते, ग्लानी आल्यासारखे होते, काही करायची इच्छा होत नाही, तसेत मानही खूप दुखते.

प्रश्र्न १ - माझे वय ३५ वर्षे आहे. मला आठवड्यातून एकदा तरी पित्ताचा त्रास होतो. खूप डोके दुखते, ग्लानी आल्यासारखे होते, काही करायची इच्छा होत नाही, तसेत मानही खूप दुखते. कृपया यावर उपाय सुचवावा. मी नेहमी संगणकावरही काम करते, त्यामुळे सतत डोळ्यांमध्येही जळजळ जाणवत असते. याचा व डोके दुखण्याचा-पित्ताचा काही संबंध असू शकतो का?

- मोनिका रेपाळे, पुणे

उत्तर - सध्याच्या काळात संगणकावर काम करणाऱ्या, विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या शरीरात पित्तदोषाचा त्रास मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. रात्रीची जागरणे. झोप व्यवस्थित न होणे, मानसिक ताण यांचाही दुष्परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होताना दिसतो. शरीराची उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने रोज सकाळी अनाशेपोटी एक ग्लास कोमट पाणी नक्की घ्यावे. तसेच संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन अविपत्तिकर चूर्ण, चांगल्या देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला संतुलन गुलकंद स्पेशल, ज्यात प्रवाळ वगैरेसारखी पित्तशामक द्रव्ये टाकलेली असतात, घेण्याचा फायदा होऊ शकेल.

रोज रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करून घेणे उत्तम. यासाठी संतुलन पादाभ्यंग घृत लावून शुद्ध काशाच्या वाटीने पादाभ्यंग अधिक उपयोग होईल. तेलकट, खूप तिखट किंवा चमचमीत पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. कडधान्ये व आंबवलेल्या पदार्थांचा वापर कमीत कमी प्रमाणातच असावा. रोज नियमाने डोळ्यांत संतुलन सुनयन तेलाचा १-१ थेंब घालण्याचा तसेच पाठीवर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल लावण्यानेही कोरडेपणा कमी होऊन डोळ्यांची व नसांची ताकद वाढून आपल्याला होणार त्रास कमी व्हायला मदत होऊ शकेल.

प्रश्र्न २ - काही दिवसांपासून माझे वजन वाढायला तसेच प्रचंड थकवा जाणवायला सुरुवात झाली होती. तपासण्या केल्यावर थायरॉइडचे असंतुलन निदर्शनास आले आहे. माझ्या १० मैत्रिणींपैकी आम्हा जवळ जवळ ८ जणी थायरॉइडने ग्रासित आहोत. सध्या थायरॉइडचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. असे होऊ नये किंवा झाल्यावर काय उपाय करता येतील?

- मेधा पटवर्धन, पुणे

उत्तर - बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या बरेच आजार समाजात वाढू लागलेले आहेत. थायरॉइडचे असंतुलन हा त्यातीलच एक. आयुर्वेदानुसार शरीरातील हॉर्मोनरूपी अग्नी चुकीच्या जीवनशैलीमुळे बिघडल्यामुळे अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. सहसा याच्याच वात व पित्त या दोन्हींचे असंतुलन झालेले दिसते. थायरॉइडसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आहार व दिनचर्या याबद्दल जागरूक राहणे उत्तम. सूर्योदयाच्या सुमारास प्राणायाम व योगासनांचा अंतर्भाव दिनचर्येत नक्की असावा. तसेच चालायला जाणे हेही उत्तम. वाटाणा, चवळी, छोले, फुलकोबी, पत्ताकोबी वगैरे वात-पित्तवर्धक गोष्टी आहारातून गोष्टी टाळाव्या.

शरीरात अग्नीचे कार्य व्यवस्थित होण्याकरता नैसर्गिक खडे मीठ वापरणे योग्य ठरते. स्त्रीची मासिक पाळी व्यवस्थित असणे हे तिच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित असण्याचे द्योतक आहे. पाळी नियमित येणे व योग्य प्रमाणात रक्तस्राव होणे आवश्यक असते. या ना त्या कारणाने सध्या पाळीत असणाऱ्या बिघाडाकडे दुर्लक्ष केले जाते. पाळीत काही बिघाड आढळला तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. हॉर्मोन्सचे किंवा थायरॉइडचे असंतुलन दिसायला लागल्यावर औषधे व उपचारांची योजना प्रकृती व वयानुसार करावी लागते. अशा केसेसमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म करून नंतर उत्तरबस्ती करून घेण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. रोज फेमिसॅन तेलासारख्या तेलाचा पिचू ठेवणे उत्तम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com