प्रश्नोत्तरे

माझे वय ३६ वर्षे आहे. १०-१२ वर्षांपासून मी ‘आयटी’ क्षेत्रात काम करत असल्यामुळे सतत संगणकासमोर बसून राहावे लागते. काही दिवसांपासून डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो आहे.
Eye Problem
Eye Problemsakal
Updated on

माझे वय ३६ वर्षे आहे. १०-१२ वर्षांपासून मी ‘आयटी’ क्षेत्रात काम करत असल्यामुळे सतत संगणकासमोर बसून राहावे लागते. काही दिवसांपासून डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो आहे. रात्री झोपत असताना डोळे जळल्यासारखे वाटतात, तसेच शांत झोप लागत नाही. डोळ्यांचा नंबर तपासला असता नंबर नाही असे कळले. पण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे कळत नाही. यामुळे माझी चिडचिड जास्त प्रमाणात होते. सुटीच्या दिवशी संगणकावर काम न केल्यामुळे मला ताजेतवाने वाटते. याकरिता मला काय उपाय करता येईल हे सुचवावे.

- विजय मालुसरे, गुडगाव

उत्तर - ‘आयटी’ क्षेत्रातच नव्हे तर सध्या सगळ्यांच क्षेत्रांमध्ये संगणकाचा शिरकाव झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना असा त्रास होताना दिसतो. वरील प्रश्र्नात सांगितलेले सगळे उपाय आपणही नक्कीच करावे. त्याचबरोबरीने संगणकावर बसण्यापूर्वी संतुलनचे सॅन अंजन (क्लिअर), ज्यात रंग नाही असे अंजन, डोळ्यांमध्ये नक्की घालावे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी शक्य झाल्यास संतुलन पादाभ्यंग घृत व काशाच्या वाटीच्या साहाय्याने पादाभ्यंग करावा.

या दोन्ही उपायांमुळे डोळ्यांकडे जाणाऱ्या उष्णतेमुळे होणारा त्रास तसेच पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. २-३ तास संगणकावर काम केल्यावर शक्य झाल्यास खिडकीच्या बाहेर हिरवळ असल्यास तिच्याकडे १-२ मिनिटे नक्की बघावे. डोळ्यांचे व्यायाम नियमित करण्याचा फायदा होऊ शकेल. एकूणच समाजात आज डोळ्यांचे आरोग्य खालावत चाललेले आहे. डोळ्यांचा काही त्रास नसला तरी सांगितलेले हे उपाय केल्यास डोळ्यांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळू शकते.

मला १०-१२ वर्षांपासून चष्मा आहे. दोन वर्षांपासून मी लेन्स वापरायला लागल्यापासून डोळ्यांमध्ये कोरडेपणा जरा जास्तच जाणवतो. त्यामुळे लेन्स वापरावे की चष्मा हेच कळत नाही. डोळ्यांचा नंबर वाढावा अशी इच्छा नाही. याकरिता काही उपाय करता येतील का?

- श्रुती ठाकूर, पुणे

उत्तर - डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने लेन्सपेक्षा चष्मा वापरणे योग्य ठरते. लेन्स वापरण्यामुळे बहुतेकांना डोळ्यांत कोरडेपणा वाढलेला दिसतो. डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील अवयवाला सतत लेन्सचा स्पर्श होणे चांगले नाही.

लग्नकार्य, महत्त्वाचा समारंभ वगैरे असल्यास कधीतरी लेन्स वापरली तर चालू शकते, पण नेहमी चांगला दिसणारा चष्मा वापरणेच योग्य ठरते. डोळ्यांमधील उष्णता वाढू नये व ते कोरडे पडू नये यासाठी डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. रोज झोपण्याआधी संतुलन सुनयन तेलाचे १-२ थेंब डोळ्यांत घालणे चांगले.

डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या वा निरशा दुधाच्या घड्या ठेवणे चांगले. रात्री झोपण्याआधी नस्यसॅन घृतासारखे एखादे आयुर्वेदिक तूप नाकात नक्की घालावे, यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळते. डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवण्याकरता संतुलन सुनयन घृतासारखे एखादे तूप रोज नियमाने घ्यावे, तसेच तज्ज्ञ वैद्यांकडून सिद्ध स्नेहाच्या नेत्रबस्ती घेणेही उत्तम ठरेल. मोबाइल, टीव्ही वगैरैंच्या वापर कमीत कमी असावा, चालत्या वाहनांमध्ये अशा गॅजेट् चा वापर पूर्णपणे थांबवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com