प्रश्नोत्तरे

माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. त्याला डोक्यावर सोरायसिसचा त्रास आहे. त्याने २-३ वेळा केस पूर्णपणे काढले. तसेच बऱ्याच प्रकारची औषधेही केली, पण सोरायसिस कमी झालेला नाही.
Sickness
SicknessSakal

माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. त्याला डोक्यावर सोरायसिसचा त्रास आहे. त्याने २-३ वेळा केस पूर्णपणे काढले. तसेच बऱ्याच प्रकारची औषधेही केली, पण सोरायसिस कमी झालेला नाही, उलट डोक्यावरच्या केसांचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. या दोन्ही आजारांकरिता काही इलाज करता येईल का? केस कमी झाल्यामुळे त्याचा आत्मविश्र्वास कमी होत चालला आहे. कृपया मार्गदर्शन करावे?

- वंदना राहाणे, नवी मुंबई

सध्याच्या काळात सोरायसिस, एक्झिमा वगैरे रक्तातील ॲसिडिटी वाढल्यामुळे होणारे त्रास वाढलेले दिसतात. याच्या मुळाशी मानसिक ताण हे कारण असते. अभ्यास व नोकरीचा ताण आजच्या युवा पिढीला त्रास देत आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी रोज १० मिनिटे तरी प्राणायाम वा दीर्घश्र्वसन केलेले बरे, तसेच रात्री झोपत असताना संतुलनची योगनिद्रा ही सीडी ऐकण्याचा उपयोग होऊ शकेल.

शक्य झाल्यास दिवसा स्पिरीट ऑफ हार्मनीसारखी सीडी लावून ठेवण्याचा फायदा होऊ शकेल. रक्तातील दोष दूर करण्याकरता मंजिष्ठासॅन, मंजिसार आसव दिवसातून दोन वेळा घेण्याचा उपयोग होईल. तसेच पचन सुधारण्याकरता व पोट साफ होण्यासाठी संतुलन पित्तशांती, संतुलन अन्नयोग व रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्ण नक्की घ्यावे. केसांना ताकद मिळण्याच्या दृष्टीने मॅरोसॅन हे रसायन, हेअरसॅन गोळ्या घेण्याचा फायदा होईल.

आठवड्यातून २-३ वेळा तरी संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल केसांच्या मुळांना हलक्या हाताने चोळून लावावे. कच्चे मीठ, एकत्र करून दूध व फळे, रात्री खूप प्रमाणात कडधान्ये, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर, आंबवलेले पदार्थ आहारात कमीत कमी प्रमाणात असावेत.

माझे वय ४२ वर्षे आहे. गेली दोन वर्षे सतत माझे तोंड येते, तोंडात आलेले फोड कधी कधी जखमांचे स्वरूप घेतात. खाणे अवघड झालेले आहे, तिखट पूर्णपणे वर्ज्य करावे लागते. खाताना, पाणी गिळताना, बोलताना असह्य वेदना होतात. याकरिता खूप औषधे केली पण फरक पडत नाही. कृपया मार्गदर्शन करावे?

- प्रशांत शांडिल्य, बडोदा

तोंड येणे, तोंडात जखमा होणे हे शरीरात वाढलेल्या पित्तदोषाचे द्योतक आहे. कधीतरी अपचनामुळेही अशा प्रकारचा त्रास होताना दिसतो. सर्वप्रथम सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांती गोळ्या नियमाने घेणे सुरू करावे. त्याचबरोबर जेवणांनंतर एक-एक चमचा संतुलन अविपत्तिकर चूर्ण पाण्याबरोबर घेणे उत्तम. रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्ण घेणे फायदेशीर ठरेल. न्याहारीच्या वेळी संतुलन गुलकंद स्पेशल नियमाने घ्यावे.

रोज सकाळी व संध्याकाळी संतुलन सुमुख तेलासारख्या तेलाचा कवल धरणे उत्तम राहील. कवल कसा धरावा याची संपूर्ण माहिती डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर सुमुख तेलाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती पाहावी. कधीतरी जीवनसत्त्वाच्या करमतरतेमुळेसुद्धा अशा प्रकारचे त्रास होताना दिसतात, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आयुर्वेदाचे वैद्य व्यवस्थित तपासणी करून त्रासावर अजून काही उपचार करणे आवश्यक आहे का हे सांगू शकतील. त्यामुळे वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com