प्रश्नोत्तरे

Questions
Questions

माझी मुलगी सोळा महिन्यांची आहे. तिला डाऊन सिंड्रोम आहे. ती एक महिन्याची असल्यापासून आम्ही तिला सोने उगाळून देतो आहोत. वयानुसार याचे प्रमाण वाढवायचे असते का? तसेच आम्ही रोज तिला पाव चमचा ब्रह्मलीन घृत देतो आहोत. ते सुद्धा वयानुसार वाढवायचे असते का? तिच्या बौद्धिक वाढीसाठी याशिवाय काही औषधे आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे. .... अपर्णा माळी 
उत्तर - मुळात डाऊन सिंड्रोम हा एक अवघड विकार आहे, त्यामुळे यावर वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर उपचार सुरू करणे श्रेयस्कर होय. सोने उगाळून देणे हा बाळ सहा महिन्यांपर्यंत करायचा संस्कार असतो. बरोबरीने मूल दोन-अडीच वर्षांचे होईपर्यंत "संतुलन बालामृत' देणे उत्तम असते. त्यानंतर मूल पाच वर्षांचे होईपर्यंत अर्धा चमचा व नंतर एक चमचा "संतुलन अमृतशतकरा' देणे उत्तम असते. "संतुलन ब्रह्मलीन घृत'सुद्धा दोन वर्षांपर्यंत पाव चमचा, पाच वर्षांपर्यंत अर्धा चमचा आणि त्यानंतर रोज एक चमचा या प्रमाणे देता येते, तर मोठ्या माणसांनी सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा घ्यायचे असते. बरोबरीने शतावरी कल्प, "सॅन ब्राह्मी गोळ्या', "ब्रह्मलीन तेल' ही औषधे सुरू करणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यंग, नस्य, शिरोपिचूसारखे उपचार करून घेणे, रोज सकाळी पंचामृत देणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे हे उत्तम होय. 

मी "फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीची नियमित वाचक आहे. मला आपले सल्ले खूप आवडतात. माझे वय चौदा वर्षे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या उजव्या कानातून पू व पाणी येते. होमिओपॅथिक औषधांनी तात्पुरते बरे वाटते. डॉक्‍टरांनी शस्त्रकर्म करण्यास सुचवले आहे. मात्र शस्त्रकर्मानंतरही पुन्हा त्रास होऊ शकतो असे मी ऐकले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ..... येशी 
उत्तर - गरज असेल तेव्हा शस्त्रकर्म करून घ्यायला हरकत नसावी, पण औषधोपचाराला वेळ व संधी न देता सरळ शस्त्रकर्माचा पर्याय निवडणे चांगले नाही. त्यामुळे सारासार विचार करून योग्य निर्णय घेणे चांगले. कानाच्या अशा तक्रारीवर "कर्णधूपन' म्हणजे कानाला औषधी धुरी देणे आणि सर्दी-खोकल्याची प्रवृत्ती असल्यास ती नाहीशी करणे हे महत्त्वाचे असते. अनेकांना यामुळे पूर्णपणे बरेही वाटते. तेव्हा एक दिवसाआड किंवा सुरवातीला काही दिवस रोजच कानाला वावडिंग, गुग्गुळ, ओवा, हळद, धूप वगैरे द्रव्यांचे मिश्रण किंवा तयार "संतुलन प्युरिफायर धुपा'ची पाच मिनिटांसाठी धुरी देता येईल. तसेच सकाळ संध्याकाळ मधाबरोबर सितोपलादी चूर्ण घेण्याचा तसेच "ब्रॉंकोसॅन सिरप' घेण्याचा उपयोग होईल. दही, खवा, लोणी, सिताफळ, फणस, पेरू, चिकू वगैरे कफकारक गोष्टी आहारातून टाळणे चांगले. 

मी 38 वर्षांची विवाहित स्त्री आहे. मला दोन मुले आहेत. एक वर्षापासून माझे अंग दुखते, तसेच सांधे दुखतात. हात-पाय तर फारच दुखतात. कृपया यावर काही औषध सुचवावे. ... मीना जाधव 
उत्तर - अंग दुखणे, सांधे दुखणे ही सहसा अति श्रम होत असल्याची आणि त्यामुळे शरीरात वातदोष वाढत असल्याची निदर्शक लक्षणे असतात. रात्री झोप मिळत नसली व ती भरून काढण्यासाठी दुपारी झोपायची सवय असली, तर त्यातूनही असे त्रास उद्‌भवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात विश्रांती घेणे, रात्री पुरेसे झोपणे, दिवसा झोपणे टाळणे हेसुद्धा चांगले. बरोबरीने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना "संतुलन शांती तेला'सारखे तेल लावणे, काही दिवस "संतुलन वातबल गोळ्या', "कॅल्सिसॅन गोळ्या' घेणे, तसेच रोज सकाळी च्यवनप्राश, "सॅन रोझ'सारखे रसायन घेणेसुद्धा चांगले. 

माझी मुलगी वीस वर्षांची आहे. तिला फक्‍त उन्हाळ्यात घशातून रक्‍त पडते. तपासण्या केल्या तर त्यात काही दोष सापडला नाही. आम्ही सर्वजण आपल्या मार्गदर्शनानुसार रोज पंचामृत घेत असतो. तिलासुद्धा पंचामृत दिले तर चालेल का? तिचे वजनही थोडे कमी आहे. ... संदीप सावंत 
उत्तर - मुलीला पंचामृत देणे चांगलेच आहे. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढू नये यासाठी आधीपासूनच रोज मोरावळा किंवा गुलकंद घेणे चांगले. तसेच ज्येष्ठमधाचा काढा करून दोन चमचे तुपाबरोबर घेण्याचाही उपयोग होईल. काढा करण्यासाठी अंगठ्याच्या आकाराच्या ज्येष्ठमधाच्या दोन काड्या चेचून घ्याव्यात, त्यात चार कप पाणी घालून ते एक कप उरेपर्यंत मंद आचेवर उकळून गाळून घ्यावे व त्यात दोन चमचे तूप मिसळून ते घोट घोट प्यावे. उन्हाळ्यात तसेच एरवीसुद्धा पादाभ्यंग करणे चांगले. वरील उपायांनी उष्णता कमी झाली की वजन वाढणे शक्‍य होईल. बरोबरीने दुधाबरोबर शतावरी कल्प घेण्याचाही उपयोग होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com