संस्कार फराळाचे 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 1 November 2019

दीपावलीचे चार दिवस बघता बघता पार पडतात, मात्र त्या दिवसातील उत्साह, आनंद नंतरही बरेच दिवस पुरणारा असतो. विशेषतः ऋतुमानाचा विचार केला तर दिवाळीनंतर येणारा हेमंत ऋतू, हवेतील गारवा हे सर्व विचारात घेता दीपावलीत शुभारंभ झालेला अभ्यंगादी उपचार, शरीरपोषक तरीही रुचकर आहार हे सर्व पुढे चालू ठेवणे आरोग्यासाठी पूरक असते. 
 

दीपावलीचे चार दिवस बघता बघता पार पडतात, मात्र त्या दिवसातील उत्साह, आनंद नंतरही बरेच दिवस पुरणारा असतो. विशेषतः ऋतुमानाचा विचार केला तर दिवाळीनंतर येणारा हेमंत ऋतू, हवेतील गारवा हे सर्व विचारात घेता दीपावलीत शुभारंभ झालेला अभ्यंगादी उपचार, शरीरपोषक तरीही रुचकर आहार हे सर्व पुढे चालू ठेवणे आरोग्यासाठी पूरक असते. 
 
दीपावलीचे चार दिवस बघता बघता पार पडतात, मात्र त्या दिवसातील उत्साह, आनंद नंतरही बरेच दिवस पुरणारा असतो. विशेषतः ऋतुमानाचा विचार केला तर दिवाळीनंतर येणारा हेमंत ऋतू, हवेतील गारवा हे सर्व विचारात घेता दीपावलीत शुभारंभ झालेला अभ्यंगादी उपचार, शरीरपोषक तरीही रुचकर आहार हे सर्व पुढे चालू ठेवणे आरोग्यासाठी पूरक असते. 

आज आपण आयुर्वेदात दिलेल्या काही विशेष पाककृती पाहणार आहोत. दिवाळी व त्यानंतर येणाऱ्या थंडीच्या दिवसात या पदार्थांचा आनंद घेता येईल. 

नारळाची खीर 
रव्याची किंवा तांदळाची खीर प्रसिद्ध आहे. आयुर्वेदात नारळाची खीर दिलेली आहे. 
नारिकेलं तनूकृत्य छिन्नं पयसि गोः पचेत्‌। सितागव्याज्यसंयुक्‍तं तत्पचेन्मृदुवह्निना ।। 
...निघण्टु रत्नाकर 
ओला नारळ बारीक खवावा व गाईच्या दुधात घालून ते दूध फार घट्ट होणार नाही व फार पातळ राहणार नाही अशा पद्धतीने मंद आचेवर शिजवावे. नंतर साखर व गाईचे तूप टाकून नारळाची खीर तयार करावी. 
नारिकेलोद्भवा क्षीरी स्निग्धा शीतातिपुष्टिदा। गुर्वी सुमधुरा वृष्या रक्‍तपित्तानिलापहा ।। 
...निघण्टु रत्नाकर 
नारळाची खीर शीतल असते, गुणांनी स्निग्ध व पचायला जड असते, चवीला अतिशय गोड असते, शुक्रधातूसाठी हितकर असते, वात-पित्तदोष कमी करते आणि धातुपोषक असते. 
नारळ अतिशय पौष्टिक असतो, वात-पित्तशामक असतो आणि शुक्रधातूसाठी हितकर असतो. अशा नारळासह गाईचे दूध, गाईचे तूप आणि साखर मिसळून तयार केलेली खीर नारळाचे सर्व गुण वृद्धिंगत करते.

लहान मुलांसाठी तसेच वयस्कर व्यक्‍तींसाठी ताकद नीट राहावी म्हणून नारळाची खीर उत्तम होय.

पित्त वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, रात्रपाळी करावी लागणाऱ्यांनी, अशक्‍तपणा जाणवणाऱ्यांना नारळाची खीर अधून मधून आहारात समाविष्ट करता येते.

नारळाची खीर वृष्य असल्याने शुक्राणूची ताकद व संख्या वाढविण्यासाठी उपयोगी पडू शकते, तसेच गर्भवतीसाठीही हितकर असते. 

घीवर 
घीवर म्हणून काही पाककृती आयुर्वेदाच्या ग्रंथात दिलेल्या आहेत. घावनाला मिळता-जुळता असा हा पदार्थ असून ते साखरेच्या पाकात घोळल्यामुळे गोड असतो. 
गोधूमचूर्णं सूक्ष्मं च स्वच्छं तस्मिन्घृतं क्षिपेत्‌ 
 यावत्तत्पिडतां गच्छेत्पश्चातद्दुग्धे विमर्यदयेत्‌  
फेलयित्वा द्रवीभूते ततः पात्रे घृतं न्यसेत्‌ । सशब्दे सुघृते तप्ते तस्य धारामुमासृजेत्‌ ।। 
यावच्च व्याप्य तत्पात्रं प्रसरेत्‌ घृतपूरकः ।
 यत्‌ किंचित्‌ ताम्रतां याते खण्डपङके निमज्जयेत्‌ ।। 

...निघण्टु रत्नाकर 
बारीक व स्वच्छ गव्हाचा रवा घ्यावा, त्यात थोडे थोडे घरचे साजूक तूप टाकून मुटकुळे तयार होईपर्यंत मळावे. हे मुटकुळे मोठ्या भांड्यात ठेवून त्यात दूध घालून नीट एकजीव करून पातळ करावे. घीवरपात्रात (लोखंडाची पसरट कढई) थोडे तूप घालून अग्नीवर ठेवावे. तूप गरम झाले की या पातळ पिठाची बारीक एकसारखी धार घीवरपात्रात धरून पातळ घीवर घालावा. नंतर तो शिजला व लाल झाला की साखरेच्या पाकात दोन्ही बाजूंनी बुडवावा. 
स वृष्यो गुरुर्हृद्यश्च बलकृत्‌ धातुवर्धनः । कफासृक्‌ मांसलकरो वातपित्तक्षयं हरेत्‌ ।। 
...निघण्टु रत्नाकर 
असा हा घीवर शुक्रधातूसाठी चांगला असतो, पचण्यास जड असतो. रुचकर असतो आणि हृदयासाठी चांगला असतो, सर्व धातूंचे वर्धन करतो, प्राकृत कफ, रक्‍त, मांस यांची पुष्टी करणारे असतो, वात-पित्तदोषांचे शमन करते, क्षयनाशकही असतो. 

देवाला प्रसाद म्हणून जे पंचामृत दाखवितात ते गोड असते. तिखट पंचामृताचीही अनेकांना माहिती असेल, पण आयुर्वेदातील पंचामृताची पाककृती त्याहूनही वेगळी आहे. 
षट्‌कर्षमार्द्रमरिचं किंचित्‌ छिन्नं च कारयेत्‌ । तैलपक्वं च तत्कार्यं तथा मेध्यर्धटंकिका ।। 
निशा शाणमिता चैतदपि तैलं विपाच्य च । कज्जलेन समं पिष्टं रसो जलयुतस्तथा ।। 
अम्लिका हिंगु लवणं सर्वं संमेलयेत्ततः । तप्ततैले विनिक्षिप्य मन्दं दर्व्या विचालयेत्‌ ।। किंचित्‌ विपाच्य पश्चात्तु नारिकेलरसं पुनः । दत्वा क्षणेन वोत्तार्यं तत्‌ पंचामृतमुच्यते ।। 

...निघण्टु रत्नाकर 
हिरवी मिरी किंवा हिरवी मिरची घेऊन तिचे तुकडे करावेत. एका नारळाचे दूध काढावे, त्यात आवश्‍यक तेवढे पाणी मिसळावे, त्यात मिरचीचे तुकडे, चिंच, हिंग, मीठ वगैरे घालावे. तेल तापवून त्यात मेथ्या व थोडी हळद घालून फोडणी तयार करावी. फोडणीत वरील पातळ मिश्रण ओतावे. पळीने ढवळून थोडे शिजवावे, वरून पुन्हा थोडे नारळाचे दूध घालावे, क्षणभर झाकण ठेवून उतरवावे. ह्याला पंचामृत म्हणतात. 
हे पंचामृत अतिशय रुचकर, भूक वाढविणारे असते, सर्दी, खोकला, दमा वगैरे कफदोषामुळे झालेल्या रोगात अतिशय हितकर असते. 

मुगाचे वडे 
तिखट-मिठाच्या पदार्थांमध्ये मुगाची भजी, उडदाचे वडे अग्रणी असतात. पाककृतीनुसार या गोष्टी करून बघितल्या तर त्या नक्कीच आवडतील. 
लवणमरिचहिङ्घुशृङ्घबेरैः समुपचितो वरमृद्गजः सुपक्वः । अतिसुरभिघृतेऽथवा सुतैले विशति मुखे वटकः सुपुण्यभाजाम्‌ ।। 
मुगाची डाळ पाण्यात भिजत घालावी व नंतर वाटून घ्यावी. यात मीठ, मिरे, हिंग, आले हे पदार्थ घालावेत व वाटलेल्या डाळीचे वडे करावेत. हे वडे तुपात वा तेलात तळावेत. 
मौद्गौ वटो गुरु रुच्यो वातपित्तास्रदो मतः । श्‍लेष्मलः पुष्टिबलकृत्‌ शुक्रलो बलदोऽल्पतृट्‌ ।
...निघण्टु रत्नाकर 
मुगाचे वडे रुचकर, वात-पित्तशामक, कफवर्धक असतात, पचायला थोडे जड असतात, शरीरपुष्टी करतात, ताकद वाढवितात, शुक्रवर्धक असतात. इतर वडे खाल्ल्याने जेवढी तहात तहान होते तेवढी तहान तहान मुगाचे वडे खाल्ल्यानंतर होत नाही. 

उडदाचे वडे 
याच पद्धतीने उडदाचेही वडे करतात. म्हणजे उडदाची डाळ पाण्यात भिजत घालावी व नंतर वाटून घेऊन त्यात मीठ, मिरे, हिंग, हे पदार्थ घालावेत व वडे करावेत आणि तूप वा तेलात तळावेत. 
पवनारुचिदैन्यजये भटकःक्षयकार्दितकम्पमरुत्कटकः । रसनातलरङ्घधरो वटककफपित्तविकारकरो वटकः ।। 
उडदाचे वडे वातशामक असतात, तोंडाचा बेचवपणा दूर करतात, दुर्बलता, क्षय, अर्दित (चेहऱ्याचा अर्धांगवायू) यामध्ये हितकर असतात. मात्र कफ वाढवितात, पित्तविकार करणारे असतात. 
दधिमध्ये कृतश्चेत्स्यात्स एव वटकः शुभः । स्त्रीप्रसंगे हितो बल्यः पुंसां धातुविवर्धकः ।। वातपीडां जयेत्‌ रक्‍तपित्तश्‍लेष्मकरो ह्यसौ । 
...निघण्टु रत्नाकर 
उडदाची डाळ वाटून दह्यात मिसळूनही वडे करता येतात, असे उडदाचे वडे बल वाढवितात, विशेषतः पुरुषाची शक्‍ती वाढवितात, धातूंचे पोषण करतात. वातामुळे होणाऱ्या वेदना दूर करतात, मात्र कफदोष व रक्‍तविकार करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rites of `Faraal` article written by Dr ShriBalaji Tambe