सोम रेज्‌ 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 14 February 2020

आरोग्य, आरोग्य आणि आरोग्य. सध्या लोकांची शारीरिक आरोग्याविषयी समज बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. संपूर्ण आरोग्य व सर्वंकष उपचार म्हणजे शरीराचे आरोग्य, साधनसामुग्रीचे व अग्नी यांचे परिवर्तन शक्‍तीचे संतुलन आणि लोकसेवा, मैत्री, प्रेम यांचे आरोग्या आणि शेवटचे लक्ष्य आहे आत्मसंवाद व समाधान. संपूर्ण आरोग्यासाठी सोमसाधना ही सोपी, कुठल्याही बंधनाशिवाय सर्वांना करता येण्यासारखी साधना आहे. 
 

आरोग्य, आरोग्य आणि आरोग्य. सध्या लोकांची शारीरिक आरोग्याविषयी समज बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. संपूर्ण आरोग्य व सर्वंकष उपचार म्हणजे शरीराचे आरोग्य, साधनसामुग्रीचे व अग्नी यांचे परिवर्तन शक्‍तीचे संतुलन आणि लोकसेवा, मैत्री, प्रेम यांचे आरोग्या आणि शेवटचे लक्ष्य आहे आत्मसंवाद व समाधान. संपूर्ण आरोग्यासाठी सोमसाधना ही सोपी, कुठल्याही बंधनाशिवाय सर्वांना करता येण्यासारखी साधना आहे. 
 

शिव, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड या अर्थानेही सोम हा शब्द वापरला जातो. ‘मन एव मनुष्याणाम्’ असे म्हटले जाते आणि मनाचा कारक सोम (चंद्र) आहे. विश्रांतीनंतर कामाची सुरुवात करण्याचा निर्णय जो घेतला जातो त्या सोमवारसाठीचीही साधना यात समाविष्ट आहे. संगीतातील ‘सारेगम’मधील ‘सा’ व ‘म’ यांचाही समावेश यात आहे. ‘समत्वं योग उच्यते’ यातील समत्वही सोममुळे मिळू शकते. आणि समाधी ही परमोच्च अवस्थाही सोममुळे प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे सोमची महती आपल्याला कळू शकते. परंतु रेज्‌ म्हणजे काय? ‘रे’ या इंग्रजीतील शब्दाचा अर्थ आहे ‘किरण’. सूर्याकडून आलेल्या तेजाच्या किरणांपासून जन्माला आले ते रेज्‌. 

सोमसाधना हा सर्वांसाठी आवश्‍यक असा साधनाप्रकार आहे. काही व्यक्‍ती नुसता ॐकार जप करतात, अनेक जण योगासने करतात, परंतु प्रत्येक जण अग्निध्यान करेलच असे नाही. म्हणून सोमसाधना महत्त्वाची ठरते. शांतीसाठी, परमप्राप्तीसाठी, यशासाठी समाजसेवेचे व्रत घेणारे फार कमी असतात. 

‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे अन्नापासून सर्व मनुष्यमात्र, सर्व प्राणीमात्र तयार होतात असे म्हटले जाते. पण नुसते अन्न खाऊन चालते का? तर नाही. दोन वेळा भरपूर जेवले, अधे-मधेही काही खाल्ले, पण काहीही व्यायाम-योग केला नाही तर आरोग्य कसे राहणार? सूर्यापासून माणसाला शक्‍ती मिळाली तरी माणसाला अन्न घ्यावेच लागते (अन्न सूर्यप्रकाशामुळेच तयार झालेले असते). सर्व विश्व ॐकारव्याप्त आहे. प्रत्येक जाणती व्यक्‍ती किंवा डॉक्‍टर व्यायामाबद्दल विचारतात. तेव्हा अन्न सेवन करणे जितके आवश्‍यक आहे तितकाच आवश्‍यक आहे व्यायाम-योग.

स्वभाव बदलण्यासाठी, चार-चौघांनी आपल्याला समाविष्ट करून घेण्यासाठी आपल्याला जे मन लागते, त्या मनाचा व प्राणशक्‍तीचा संबंध जवळचा असतो. भरपूर शक्‍ती व सतत हसतमुख असलेली व्यक्‍ती सहज स्वीकारली जाते. त्यासाठी असतो प्राणायाम. नुसत्या व्यायामावर चालत नाही, प्राणायामाचीही गरज असतेच. स्वतःला ओळखल्यावरच मनुष्याला खरी यशप्राप्ती होते. प्राप्ती, मग ती पैशांची असो, कीर्तीची असो, समाधानाची असो, त्यासाठी ‘स्व’ला जाणणे, स्वत्वापर्यंत पोहोचणे, कमीत कमी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू येणे आवश्‍यक असते. त्यासाठी ॐकार जप करावा लागतो. ऱ्हस्व ॐकार पोटाची काळजी घेतो, म्हणजे पचन नीट होते, पर्यायाने अन्नाचे रूपांतर प्राणशक्‍तीत होण्यासाठी मदत होते. दीर्घ ॐकार म्हणण्याने प्राणशक्‍तीचा शरीरात नीटपणे उपयोग करून घेण्यासाठी फायदा होतो. प्लुत ॐकार गायल्याने दुसऱ्यासाठी काहीतरी करावे, दुसऱ्याची सेवा करावी, आपल्याला मित्र असावेत, आपल्याला कुठल्याही तऱ्हेच्या अपेक्षा न ठेवता प्रेम करता यावे या गोष्टी साध्य होतात. अनुनासिकाचा उपयोग तेजासाठी, आत्मबोधासाठी, आत्मचिंतनासाठी, आत्म्याशी संभाषण साधण्यासाठी आणि सरतेशेवटी परमसमाधान देणाऱ्या समाधीसाठी होतो. सकाळी कोंबडा आरवताना तो कू-कूऽऽऽ-कूऽऽऽऽऽऽऽ असा आवाज काढतो तेव्हा लागलेला वेळ - पहिला ऱ्हस्व, दुसरा दीर्घ व तिसरा प्लुत मात्रेचा असतो, असे समजले जाते. कोंबड्याला कोणी ॐकाराची दीक्षा देत नाही किंवा ब्रह्मरंध्रापर्यंत जाणाऱ्या ॐकाराची उपासनाही करू शकत नाही. परंतु तरीही कोंबडा तिन्ही प्रकारचे ॐकार गातो हे नक्की. 

ॐकाराने आरोग्य मिळत असले तरी काही अंशी व्यायामाने व योगाने जे मिळणार आहे ते सोपे म्हणून करणे इष्ट असते. सगळेच काम एका ॐकाराने होत नाही. मंत्रजप करणारी मंडळी बऱ्याच वेळा रात्रंदिवस नुसता मंत्रजप करत राहतात, बरोबरीने काही कामधंदा करत नाहीत. मी लक्ष्मीचा मंत्र म्हटला पण मला त्याचा काही फायदा झाला नाही अशी त्यांची तक्रार असते. मंत्राला कर्माची जोड दिल्याशिवाय मंत्राचा उपयोग होत नाही. जेवढा मंत्र केला त्याच्या दशांश हवन, हवनाच्या दशांश अन्नदान करणे आवश्‍यक असते. तेव्हा नुसत्या मंत्राने काम होणार नाही. 

म्हणून सोम साधनेमध्ये, 
आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ 
धनम्‌ इच्छेत्‌ हुताशनात्‌ । 
ज्ञानं महेश्वरात्‌ इच्छेत्‌ 
मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌ ।। 

या चारीही अंगांचा विचार करून त्या गोष्टी सोमसाधनेत समाविष्ट केलेल्या आहेत. 
ज्या व्यक्‍ती सोमसाधना करतात ते सोम रेज्‌ एकमेकाला सकारात्मक स्पंदनाद्वारे मदत करतात. जो काही निसर्गाचा असमतोल झाला असले त्याला संतुलित करण्यासाठी किंवा दुष्ट विचारसरणीचे लोकांचे मनपरिवर्तन करण्यासाठीही सोमसाधनेचा उपयोग होतो. बीज पेरल्यावर लगेच रोप दिसत नाही, काही दिवसांनी दिसते; तसे सोमसाधना सुरू केल्यावर लगेच परिणाम दिसले नाहीत, तरी नंतर परिणाम दिसतातच. 

रोज एक तास सोम साधना केल्यावर झोपेचे तंत्र बदलून जाते, कमी वेळाची झोप पुरेशी होते. झोपेचा वेळ कमी झाल्यामुळे साधनेसाठी वेळ खर्च झाला अशी खंत उरत नाही. 
सध्या अनेक प्रकारचे जनपदोध्वंस पाहायला मिळतात, सामाजिक जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येतात, वेगवेगळ्या जीवननाशक तरंगांचे साम्राज्य पसरत आहे. अशा वेळी सोमसाधना खूप आवश्‍यक आहे. सोमसाधना सुरू केल्यावर त्यातील अनुभव इतरांबरोबर शेअर करण्यासाठी, त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी किंवा या संकल्पनेबरोबर जोडून घेण्यासाठी, आठवड्यातील एक दिवस सामुदायिक साधनेसाठी सोय केलेली आहे. 

आरोग्य, आरोग्य आणि आरोग्य. सध्या लोकांची शारीरिक आरोग्याविषयी समज बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. संपूर्ण आरोग्य व सर्वंकष उपचार म्हणजे शरीराचे आरोग्य, साधनसामुग्रीचे व अग्नी यांचे परिवर्तन शक्‍तीचे संतुलन आणि लोकसेवा, मैत्री, प्रेम यांचे आरोग्या आणि शेवटचे लक्ष्य आहे आत्मसंवाद व समाधान. संपूर्ण आरोग्यासाठी सोमसाधना ही सोपी, कुठल्याही बंधनाशिवाय सर्वांना करता येण्यासारखी साधना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Som Rays article written by Dr Shree Balaji Tambe