गोमूत्र

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 7 December 2018

गोमूत्र औषधी गुणांनी परिपूर्ण असते. आयुर्वेदाच्या सगळ्या मूळ संहितांमध्ये गोमूत्राचे औषधी गुण दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही गोमूत्राची उपयुक्‍तता जगात सर्वदूर सिद्ध होते आहे. 

अथर्ववेदात गोमूत्राचा उल्लेख सापडतो. आयुर्वेदात तर गोमूत्राची आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच प्रशंसा केलेली आहे. आयुर्वेदाच्या सगळ्या मूळ संहितांमध्ये गोमूत्राचे औषधी गुण दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही गोमूत्राची उपयुक्‍तता जगात सर्वदूर सिद्ध होते आहे. 

गोमूत्र म्हणजे गाईचे मूत्र. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या, कचरा, उकिरड्यावर काहीही खाणाऱ्या गाईचे गोमूत्र औषध म्हणून वापरता येत नाही. जी गाय सूर्यप्रकाशात हिंडते, मोकळ्या कुरणात सोडलेली असते, तिचे गोमूत्र औषधी गुणांनी परिपूर्ण असते. त्यातल्या त्यात जी गाय काळ्या रंगाची आहे,  जिची वासरे जिवंत आहेत, तिचे गोमूत्र औषधासाठी उत्तम समजले जाते. शक्‍यतो सकाळी गाय जेव्हा पहिल्यांदा मूत्रविसर्जन करते तेव्हा अगदी सुरुवातीचे नाही आणि अगदी शेवटचे नाही, असे मधल्या धारेचे गोमूत्र गोळा करायचे असते. 

औषधी गुणधर्म
अशा गोमूत्राचे औषधी गुणधर्म आयुर्वेदामध्ये पुढीलप्रमाणे दिलेले आहेत...  
गोमूत्रं कटु तीक्ष्णोष्णं क्षारं तिक्‍तकषायकम्‌ । 
लघ्वग्नि दीपनं मेध्यं पित्तकृत्कफवातहृत्‌ ।।
...भावप्रकाश

गोमूत्र चवीला तिखट, खारट, कडू, विर्याने उष्ण व तीक्ष्ण गुणाचे असते, पचायला हलके, अग्नी प्रदीप्त करणारे, पित्त वाढविणारे, पण कफ व वातदोषाचे शमन करणारे, मेधावर्धक असते. 

कटु तिक्‍तं सक्षारम्‌ उष्णं तीक्ष्णं लघु लेखनं सरं दीपनं मेध्यं पित्तकरं कफवातघ्नं त्वग्दोषहरम्‌ ।

चवीला तिखट, कडू, खारट, वीर्याने उष्ण, पचण्यास हलके, गुणाने तीक्ष्ण, मेदधातू कमी करणारे, सारक, दीपन म्हणजे अग्नी प्रदीप्त करणारे, मेधा म्हणजे आकलनशक्‍ती वाढविणारे,  पित्तकर, परंतु कफदोष व वातदोष कमी करणारे आणि त्वचादोष दूर करणारे असे गोमूत्र असते. 

स्थौल्ये उपयुज्यमानेषु ऐकं द्रव्यम्‌ ।
...सुश्रुत सूत्रस्थान
स्थौल्य कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांपैकी एक द्रव्य म्हणजे गोमूत्र होय. 

निरोगी अवस्थेत गोमूत्र घेण्याने पोटात जंत होत नाहीत, भूक चांगली लागते, अन्नपचन व्यवस्थित होते, पोट साफ होते, वजन वाढत नाही, रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहते. यकृत, वृक्क (किडनी), प्लीहा (स्प्लीन) वगैरे महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता उत्तम राहण्यास हातभार लागतो, त्वचाविकारांना प्रतिबंध होतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मन शुद्ध राहण्यासही उपयोग होतो. 

गोमूत्राचा औषधात उपयोग
आता औषध म्हणून गोमूत्र कसे वापरता येते हे पाहू या. 

गोमूत्र सारक गुणाचे असते, त्यामुळे शौचाला झाली नसेल, पोट जड झाले असेल, तर पाव कप गोमूत्र त्यात पाव चमचा सैंधव मिसळून घेण्याने शौचाला होते व पोट हलके होते. लहान मुलांनासुद्धा कमी प्रमाणात गोमूत्र देऊन हा फायदा करून घेता येतो. 

लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्‍तींमध्ये जंत होतात. अशा वेळी रोज चार चमचे गोमूत्र त्यात दोन चिमूट डिकेमालीचे चूर्ण मिसळून रोज सकाळी दिल्यास आठ-दहा दिवसांत जंत कमी होतात. यामुळे जंत पडून जाण्यासही मदत मिळते. 
 यकृताचा आकार वाढला असला, तर शक्‍तीनुसार पाव ते अर्धा कप गोमूत्र थोडे सैंधव मिसळून घेण्याचा उपयोग होतो. प्लीहा आकाराने वाढली असेल, तर त्यावरही हा प्रयोग करता येतो. यासोबत वरून गोमूत्राचा शेक घेण्याचाही फायदा होते. यासाठी वीट निखाऱ्यावर गरम करायची असते, चांगली भाजली गेली की त्यावर गोमूत्र शिंपडायचे असते व गोमूत्रात भिजविलेल्या कापडात वीट गुंडाळून त्या विटेने गरम स्पर्श सहन होईल, अशा बेताने पोट शेकायचे असते. याने काही 

गोमूत्र औषध तयार करताना...
गोमूत्राचा औषध तयार करताना वापर केला जातो तेव्हा ताजे गोमूत्र वापरणे अपेक्षित असते, फक्‍त ते स्वच्छ सुती कापडातून गाळून घेणे गरजेचे असते. मात्र, नुसते गोमूत्र औषध म्हणून घ्यायचे असेल, तर त्यावर घरच्या घरी पुढील प्रक्रिया करायची असते. 
सकाळच्या वेळी ताजे गोमूत्र गोळा केले, की ते सात वेळा वेगवेगळ्या कोरड्या सुती कापडातून व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळून झाले, की त्यात समभाग प्यायचे पाणी मिसळावे आणि हे मिश्रण सकाळी नाश्‍त्यापूर्वी व पुन्हा संध्याकाळी पाच-सहा छोटे चमचे या प्रमाणात घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्याने या प्रमाणात काही बदल करता येतो; मात्र सरसकट सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना किंवा कोणताही विकार असला तरी सर्वांना याप्रकारे गोमूत्र घेता येते. निरोगी व्यक्‍तीला, अगदी लहान बालकालासुद्धा असे गोमूत्र घेता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special cover story family doctor