15 मिनिटांत तयार होणारा परफेक्ट नाश्ता! जरा हटके पद्धतीने बनवा उरलेल्या इडलीतून रेस्टॉरंट स्टाइल फ्रायड इडली

Leftover Idli Makeover: उरलेल्या इडलीतून फक्त 15 मिनिटांत बनवा कुरकुरीत, मसालेदार आणि रेस्टॉरंट स्टाइल फ्रायड इडली; झटपट आणि चविष्ट नाश्ता!
Quick & Tasty: Restaurant-Style Fried Idli Recipe Using Leftover Idlis in 15 Minutes

Quick & Tasty: Restaurant-Style Fried Idli Recipe Using Leftover Idlis in 15 Minutes

sakal

Updated on

15-Minute Breakfast Hack: घरात रात्रीचे जेवण झाल्यानंतर उरलेले इडलीचे तुकडे तसचे फ्रिजमध्ये पडून राहतात आणि सकाळी नेहमीच “आता याचं काय करायचं?” असा प्रश्न पडतो. पण ह्याच साध्या उरलेल्या इडलीपासून तुम्ही काही मिनिटांत खमंग, मसालेदार आणि चविष्ट असा नाश्ता बनवू शकता, तो म्हणजे फ्राईड इडली.

दक्षिण भारतात प्रचलित असलेला हा पदार्थ आता संपूर्ण देशभरातील घरांमध्ये आवडीने केला जातो. कारण यात लागणारे साहित्य अगदी कमी, बनवण्याची प्रक्रिया झटपट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न वाया जाण्यापासून वाचवण्याची उत्तम सवय यात दडलेली आहे. खमंग कुरकुरीत इडली, सुगंधी मसाले आणि भाज्यांचा सुंदर संगम. हे सगळं मिळून सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता अगदी खास बनतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com