
Actress Akshata Ukirde Reveals Her Foodie Life
Sakal
Actress Akshata Ukirde Reveals Her Foodie Life : माझं आणि खवय्येगिरीचं नातं हे अगदी खास आणि गहिरं आहे. मी स्वतःला ‘फुल्ल फुडी’ म्हणते, कारण मला प्रत्येक प्रकारचं खाणं प्रचंड आवडतं. एखादा ठरलेला आवडता पदार्थ नसेल; पण रोज काही ना काही नवीन खाण्याची वेगळीच क्रेव्हिंग असते. त्यामुळे चायनीज, नॉर्थ इंडियन, चाट, महाराष्ट्रीय अशा सगळ्याच प्रकारचं खाणं माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग झालं आहे.