

Why Eat Ajwain
esakal
Ancient Acidity Cure: आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्हींना नियंत्रित ठेवतात. यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मसाले म्हणजे प्रत्यक्षात निसर्गाची अनमोल औषधेच आहेत. पूर्वीच्या काळी आपल्या आजी-पणजी भाजीमध्ये किती जिरे किंवा किती हिंग टाकायचा, याची अचूक माहिती द्यायच्या. त्यामागे मोठे वैद्यकीय शास्त्र दडलेले आहे.