रोज नवीन काय करायचं हा प्रश्न तर असतोच; पण, रोजच्या जेवणात काहीतरी नवीन ट्राय करू शकतो. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी आणि चव येण्यासाठी लोणचं घेतो. हे लोणचंदेखील हेल्दी बनवता येऊ शकतं. अगदी झटपट होणारं, हेल्दी आणि तेवढंच चविष्ट असं मिक्स भाज्यांचं लोणचं कसं करायचं ते जाणून घ्या.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
साहित्य : गाजराचे तुकडे, फ्लॉवरचे तुकडे, मुळा, मटार, लिंबू, हिरवी मिरची, हळद, तिखट, मीठ, हिंग, जिरे, लवंग, काळीमिरी, मोहरीचं तेल (भाज्या आवडीप्रमाणे घेऊ शकता).
कृती : सर्व भाज्यांचे तुकडे एका भांड्यात घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित एकजीव करा. हे मिश्रण तीन ते चार तास झाकून ठेवावं. काही वेळानंतर या भाज्यांमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लिंबाच्या फोडी टाका. हे सर्व मिक्स करा. काही वेळासाठी ठेवून द्या.
मसाला तयार करण्यासाठी
एक चमचा जिरे, दोन-तीन लवंग, काळीमिरीचे तुकडे पॅनमध्ये भाजून घ्या. गॅस बंद करून यामध्ये मेथीचे दाणे भाजून घ्या (तुम्ही बडीशेपही टाकू शकता). हे सर्व मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या. साधारण पाव कप मोहरीचं तेल गरम करून घ्या आणि काही वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्या.
एका भांड्यात मिश्रण केलेल्या भाज्या, तयार केलेला मसाला, तिखट, हिंग, मीठ, २-३ चमचे मोहरीची डाळ आणि मोहरीचे तेल टाकून एकजीव करून घ्या. तुमचं चटपटीच मिक्स भाज्यांचं लोणचं तयार आहे. हे लोणचं तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता.