माझी रेसिपी :

ऋतुजा कदम
Saturday, 11 April 2020

उन्हाळा आणि कोरोनाच्या निमित्ताने आपण सर्वजण घरीच आहोत. त्यामुळे रोज काय नवीन करावे, असा प्रश्‍न पडतोय. उन्हाळ्यासाठी खास रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. अगदी सोप्पे आणि सध्याच्या सीझनसाठी योग्य असलेलं कैरीचं पन्हं!

साहित्य - ३ कैऱ्या, १ कप कैरी पल्प, १ कप गूळ, बर्फ, वेलची पावडर

कृती - पन्हं तयार करण्यासाठी कैरीचा पल्प तयार करून घ्यावा लागतो. त्यासाठी, कुकरमध्ये थोडं पाणी घ्या. तीन कडक कैऱ्या दोन शिट्ट्यांमध्ये उकडून घ्याव्यात. उकडून घेतलेल्या कैऱ्यांची साले काढावी. उरलेल्या कैऱ्यांचा गर काढून कुटून (स्मॅश) घ्यावे.

त्यामध्ये गूळ मिक्स करावा. साधारण एक कप गरासाठी तितकाच गूळ घ्यावा. कैरीचा पल्प आणि गूळ चांगलं एकजीव करून घ्यावं. तयार झालेल्या मिश्रणात अर्धा चमचा वेलची पावडर टाकावी. या मिश्रणाला गाळणीतून गाळून घ्यावं. त्यामुळं चुकून राहिलेला एखादा गुळाचा खडा वेगळा होईल. पल्प तयार आहे. तुम्ही पल्प फ्रिजमध्ये काचेबंद बरणीमध्ये ठेऊ शकता. तयार झालेल्या पल्पचं पन्हं तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी आणि बर्फ घ्यावा. त्यामध्ये आवश्यक तितका पल्प घावा. तुमचं गारेगार पन्हं तयार झालं.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rutuja kadam on kairiche panhe

Tags
टॉपिकस
Topic Tags: